शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

गुन्हेगारांचा हल्लाबोल !

By admin | Updated: July 9, 2014 01:06 IST

गुन्हेगारीला आळा घालण्याच्या शहर पोलीस दलाच्या उपाययोजनांची वाट लावत गुन्हेगारांनी हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

दोन फूल, दोन हाफ मर्डर : हुडकेश्वर, अजनीतील घटनानागपूर : गुन्हेगारीला आळा घालण्याच्या शहर पोलीस दलाच्या उपाययोजनांची वाट लावत गुन्हेगारांनी हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. सोमवारी हुडकेश्वरमध्ये पाऊणतासात दोन खुनाच्या घटना घडल्या. तर, एकाच्या खुनाचा प्रयत्न झाला. अजनीतही एकावर प्राणघातक हल्ला झाला. उंबरगाव (कुही) येथील दिलीप दुधराम खंगार (वय २७) याचा विजय मोहोड (वय २०, रा. नरसाळा) आणि सचिन मानकर (वय १९, रा. उमरगाव) या दोघांनी चाकूचे घाव घालून खून केला. नरसाळा येथील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली. या घटनेपूर्वी दिलीप, आरोपी विजय, सचिन तसेच त्यांचे दोन मित्र असे पाच जण स्रेहल बियर बारमध्ये दारू पित बसले होते. तेथे जुन्या वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली. दिलीपने यावेळी विजय आणि सचिनला धमकी दिली. दिलीप सनकी स्वभावाचा असल्यामुळे त्याची कशीबशी समजूत काढत हे सर्व बाहेर आले. दोन मित्र निघून गेले. तर, दिलीपचा काटा काढण्याच्या इराद्याने विजय आणि सचिनने त्याला नरसाळ्यात आणले. विजय धावतच घरी गेला. त्याने घरातून चाकू आणून दिलीपवर सपासप घाव घातले. आरडाओरडीमुळे गाव जमा झाला. ते पाहून आरोपी पळून गेले. माहिती कळताच हुडकेश्वरचे पीआय ज्ञानेश्वर मुंढे, एपीआय विशाल जयस्वाल आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. दिलीपचे वडील दुधराम कोंडबा खंगार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच तिकडे बाजूच्या बेलतरोडी बाजारात आनंद वामनराव बावनकर (वय २७) या तरुणाचा भीषण खून झाला. आनंद आॅटो चालवायचा. एसबीआयच्या एटीएमसमोर तिघांनी त्याचा खून केल्याची चर्चा आहे. मात्र, कुणीही आरोपीबाबतची माहिती पोलिसांना दिली नाही. एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेरेही पोलिसांनी तपासले.खुनाचा आरोपी बीएचा स्टुडंटदिलीपच्या खुनाच्या १२ तासातच हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून त्यांना अटक केली. मृत दिलीप विमानतळावर खासगी टॅक्सी चालवायचा तर, आरोपी विजय मोहोड हासुद्धा खासगी वाहनचालक आहे. आरोपी सचिन मानकर महाविद्यालयीन (बीए प्रथम वर्ष) विद्यार्थी आहे. त्याचे वडील प्रॉपर्टी डीलिंग करतात तर, आई ग्रामपंचायत सदस्य आहे. सचिन खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकल्याने त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. दारूच्या नशेत दिलीप नेहमी धमकावत असल्यामुळे विजय आणि सचिनने त्याला कायमचे संपविले.