शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

By admin | Updated: August 10, 2015 02:34 IST

परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने जरीपटक्यातील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड घालून एका परप्रांतिय बुकीसह १० जणांना जेरबंद केले.

लॅपटॉप, मोबाईल जप्त : १० बुकी जेरबंद नागपूर : परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने जरीपटक्यातील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड घालून एका परप्रांतिय बुकीसह १० जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलसह सट्ट्याचा पाना जप्त करण्यात आला. हिरा नगरातील रमेश नानवानीच्या घरात संजय कलवानी क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालवतो, अशी माहिती कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त ईशू सिंधू यांचे पथक आज दुपारी ४ च्या सुमारास तेथे पोहचले. मात्र, मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे पाहून पोलीस चक्रावले. मात्र, खबर पक्की असल्याचे ‘टिपर‘कडून कळताच पोलिसांनी बाजूच्या इमारतीवरून नानवानीच्या घराचा वरचा माळा गाठत अड्डयावर धडक दिली. तेथे हरी टेकचंद केवलरामानी (वय ३३, रा. गुरुनानक कॉलनी), शेख इरफान शेख कदीर (वय २८, रा. आशीर्वादनगर सक्करदरा), चेतन भीकूलाल मालू (वय २७, रा. शांतिनगर लकड़गंज), सूरज नर्मदाप्रसाद शुक्ला (वय २५, रा. परेदशी तेलीपुरा बजरिया) चेतन सुरेश बांगरे (वय २६, रा. बोरकर चौक कामठी), अनिल तिलकराम गुजर (वय २५, हीरानगर जरीपटका), राहुल हर्षद सोनी (वय २१, रा. छापरूनगर, लकडगंज), तरुण शिवदयाल आमलानी (वय २८, रा. सिंधी कॉलनी, दुर्ग), संजय रमेश कलवानी (वय ३४, रा. मंगळवारी बाजार, जरीपटका) आणि भूपेश अशोक जग्गी (वय ४१, गुरुनानकपुरा पांचपावली) हे सर्व जण भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर खयवाडी करताना आढळले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अन् काही रोख रक्कमही जप्त केली. बुकींसोबत घरमालकावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)सर्वात मोठी कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुण्या अड्ड्यावर बुकी पकडल्याची ही दोन तीन वर्षातील पहिलीच कारवाई आहे. त्यात छत्तीसगडचाही बुकी हाती लागल्यामुळे नागपुरातील बुकींचे परप्रांतिय कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. लोकमतने नागपुरातील बुकीचे देशविदेशातील बुकीचे कनेक्शन आणि कोट्यवधींच्या उलाढालीचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले आहे, हे विशेष !