शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

१० हजार वाघांना सांभाळण्यास देशातील जंगल सक्षम

By admin | Updated: January 12, 2017 01:47 IST

जगाच्या तुलनेत भारतात वाघांची स्थिती खूप चांगली आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार आपल्या देशात सुमारे दोन हजार वाघ आहेत.

उल्हास कारंथ : प्राण्यांना उपचारासाठी जंगलातून हलविण्याला विरोध नागपूर : जगाच्या तुलनेत भारतात वाघांची स्थिती खूप चांगली आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार आपल्या देशात सुमारे दोन हजार वाघ आहेत. देशातील जंगलाचे क्षेत्रफळ बघितले तर सुमारे १० हजार वाघ येथे आरामात वास्तव्य करू शकतात. त्यासाठी हे जंगल सक्षम आहे, असे मत विश्व प्रमुख व्याघ्र संवर्धन वैज्ञानिक डॉ. उल्हास कारंथ यांनी व्यक्त केले. नागपूर दौऱ्यावर आले असता डॉ. कारंथ यांनी बुधवारी वन सभागृहात पत्रकार, वन अधिकारी आणि वन्यजीव संरक्षणाशी जुळलेल्या संस्थांशी चर्चा केली व त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. याप्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीभगवान, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंह, विनयकुमार सिन्हा, प्रवीण श्रीवास्तव, शेषराव पाटील, डॉ. एन. रामबाबू, डीएफओ गिरीश वशिष्ठ उपस्थित होते. डॉ. उल्हास कारंथ यांनी मागच्या ३० वर्षांत विशेषत: कर्नाटकच्या जंगलासोबतच देश व विदेशातील विविध व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षे टायगर इकोलॉजीवर संशोधन केले आहे. डॉ. कारंथ पुढे म्हणाले, वाघ आणि इतर वन्यजीवांची खाद्यस्थिती सुधारली पाहिजे. वाघाचे खाद्य वाढविण्यासाठी तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली पाहिजे. याशिवाय देशभरातील व्याघ्र प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली तर वाघांची संख्या आणखी वाढू शकते. माझ्या मते, वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांना आजाराच्या स्थितीतही जंगलातच राहू दिले पाहिजे. त्यांना येथेच आरोग्यलाभ मिळू शकतो. त्यांना उपचारासाठी ट्रँक्यृूलाईज करून रेस्क्यू सेंटर वा प्राणिसंग्रहालयात हलविणे योग्य नाही. यावर गंभीरतेने विचार झाला पाहिजे. कारण, इथून या प्राण्यांना परत जंगलात सोडताना यश मिळण्याची शक्यता कमी असते व मग नाईलाजाने त्या प्राण्यांना आयुष्यभर पिंजऱ्यात कैद व्हावे लागते.(प्रतिनिधी) एक वाघ बघायला डझनभर जिप्सी नकोत व्याघ्र प्रकल्पात वेगाने वाढणाऱ्या पर्यटनाबाबत बोलताना डॉ. कारंथ म्हणाले, एक वाघ बघायला त्याच्यामागे डझनभर जिप्सी घेऊन फिरणे योग्य नाही. वाघाचे क्षेत्र खूप मोठे असते आणि अनेकदा तो आपले क्षेत्र बदलूनही इकडे तिकडे जात असतो. वाघ नेमका कुठे कुठे जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी रेडियो कॉलर हा चांगला पर्याय आहे. परंतु त्यातही तांत्रिक अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनक्षेत्रात निरंतर भ्रमण आवश्यक आहे. टायगर कॉरीडोरला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सरकारी संस्थांसोबत समन्वय स्थापित करून योजना तयार करायला हवी.