शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

पहिली लाट रोखलेल्या १६७२ गावांत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST

नरखेड/कळमेश्वर/कामठी/काटोल : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या ३,०२,४८० वर पोहोचली. नागपूर शहरात ३,८१३ तर नागपूर ग्रामीणमध्ये २,३७५ रुग्णांची भर ...

नरखेड/कळमेश्वर/कामठी/काटोल : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या ३,०२,४८० वर पोहोचली. नागपूर शहरात ३,८१३ तर नागपूर ग्रामीणमध्ये २,३७५ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखणाऱ्या जिल्ह्यातील १६७२ गावांतही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील १,९०४ गावांपैकी ८६९ गावेच कोरोनामुक्त आहेत. यात कमी लोकसंख्या आणि विरळ वस्ती असलेल्या गावांची संख्या अधिक आहे. गाव कोरोनामुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायतींनी आखलेल्या उपाययोजना व त्यास गावकऱ्यांनी केलेले सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. नागपूर जिल्ह्यात (ग्रामीण) ७६८ ग्रामपंचायती आहेत. याअंतर्गत १,९०४ गावांचा कारभार चालतो. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतरच उपराजधानीत कोरोनाने शिरकाव केला. याच काळात गावाच्या वेशी सील करण्यात आल्या. गावाच्या वेशीवर बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोखण्यात आले. प्रसंगी वादही झाले. गावकरी आणि सरपंच त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यावेळी जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. मात्र, डिसेंबरनंतर अनलॉकच्या प्रक्रियेनंतर संक्रमण वाढीला वेग आला. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात १,०३,६८९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर १७४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ७१,८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात ३०,५४९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे. यात सावनेर, उमरेड, कामठी, कन्हान, कळमेश्वर, वानाडोंगरी, हिंगणा, काटोल नगर परिषद क्षेत्रात स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. गतवर्षी गावातील व्यक्ती गावात आणि बाहेरील व्यक्ती बाहेरच हा मंत्र ग्रामपंचायतींनी अवलंबल्याने एप्रिल आणि मे महिनाअखेर जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्त राहिले. मेनंतर ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर अखेर ही परिस्थिती आटोक्यात येत असतानाच अनलॉकनंतर गावातील कामगार, मजूर, नोकरदार रोजगारासाठी बाहेर पडल्यानंतर गावात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला.

जिल्ह्यात एकूण गावे : १,९०४

सध्या कोरोना रुग्ण असलेले गाव : १०३५

कोरोनामुक्त गाव : ८६९

आमचे काय चुकले?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेरच्यांना गावबंदी होती. मात्र, अ‍ॅनलॉकनंतर गावातील कामगार व मजूरवर्ग बाहेर पडला. अशात या परिसरात कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे. परत गेलेला कामगार पुन्हा परतला. मात्र, यातील काहींनी बाधित असतानाही प्रशासनाकडून माहिती लपविली. त्यामुळे गावात कोरोनाचे संक्रमण वाढले.

- प्रांजल वाघ, सरपंच, कढोली, ता. कामठी

----

पहिल्या लॉकडाऊननंतर गावात बाधितांची संख्या नव्हती. ग्रामपंचायतीने बाहेरच्यांना प्रवेश देताना कडक निर्बंध लावले होते. अ‍ॅनलॉकनंतर वर्दळ वाढली. लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे रुग्ण वाढले. गावात आजही कडक निर्बंध असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे.

- उषा मनीष फुके, सरपंच, येनीकोनी, ता. नरखेड

---

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लगेच बाहेरच्यांना गावबंदी करण्यात आली. गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात आली. घरोघरी जनजागृती करण्यात आली. आजही हे कार्य सुरू आहे. मात्र, अनलॉकनंतर गावातील कामगार आणि नोकरदार रोजगारासाठी बाहेर पडले. यासोबतच सार्वजनिक समारंभही वाढले. त्यामुळे गावात संक्रमण झाले.

- दिलीप डाखोळे, सरपंच, वरोडा. ता. कळमेश्वर

या गावांत संक्रमण अधिक

पहिल्या लाटेनंतर कोरोनामुक्त असलेल्या अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यात तालुकानिहाय संक्रमण झालेल्या काही प्रमुख गावांची नावे - भिवापूर : नांद, सेलोटी, भिवापूर, जवळी, कारगाव, सोमनाळा, शिवापूर, बोर्डकला, बेसूर. कामठी : येरखेडा, रनाळा, कोराडी, महादुला, वडोदा, आजनी. पारशिवणी : पारशिवणी, कन्हान, कांद्री, नयाकुंड, तामसवाडी, पारडी. हिंगणा : निलडोह, डिगहोह देवी, हिंगणा, रायपूर, कान्होलीबारा, गुमगाव, टाकळघाट. सावनेर : सावनेर, चिचोली, खापा, पाटणसावंगी, केळवद, बडेगाव, वाघोडी, वाकोडी. नरखेड : मन्नाथखेडी, सिंदी (उमरी), अंबाडे (दे), खंडाळा, सारडी, पिठोरी, सिंगारखेडा, सिंजर, मायवाडी, पिपळा केवळराम. उमरेड : वायगाव घोटुर्ली, भिवगड, बेला, पाचगाव, सिर्सी, चनोडा. कळमेश्वर : मोहपा, धापेवाडा, तिष्ठी, कोहळी, तेलगाव, गौंडखेरी. काटोल : कोंढाळी, रिधोरा, सोनखांब, पारडसिंगा, मेंढेपठार. मौदा : कोदामेंढी, भांडेवाडी, बोरगाव, मारोडी, कोटगाव. कुही : मांढळ, वेलतूर, गोन्हा, कुचाडी, आंभोरा, हरदोली राजा, सोनपुरी. रामटेक : मनसर, देवलापार, शीतलवाडी, क्रांदी माईन्स. नागपूर ग्रामीण : दवलामेटी, लाव्हा, खापरी, डिफेन्स.