शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

घनकचरा व्यवस्थापनावर ठरणार आयुक्तांचा ‘सीआर’

By admin | Updated: May 25, 2017 18:01 IST

आयुक्तांनी केलेली कामगिरी राज्यस्तरावर तपासण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक ३० गुण घनकचरा व्यवस्थापनासाठी असून या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर आयुक्तांचा वार्षिक गोपनीय अहवाल (सीआर) लिहिला जाणार आहे.

प्रदीप भाकरे। अमरावती : महापालिका आयुक्तांसाठी विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र ‘केआरए’ निश्चित करण्यात आले आहे. वसुली, घनकचरा व्यवस्थापन, महापालिकेच्या स्वउत्पन्न वाढीसाठी विशेष उपाययोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १०० गुण देण्यात आले आहेत. या सहा घटकांमध्ये आयुक्तांनी केलेली कामगिरी राज्यस्तरावर तपासण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक ३० गुण घनकचरा व्यवस्थापनासाठी असून या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर आयुक्तांचा वार्षिक गोपनीय अहवाल (सीआर) लिहिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात विविध सहा घटकांमधील कामकाज व त्यांच्या प्रगतीच्या आधारे सन २०१७-१८ वर्षाचा कार्यमूल्यांकन अहवाल व वार्षिक गोपनीय अहवालासाठी मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. मालमत्ता कर व इतर करांच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसुलीसाठी १० गुण देण्यात आले आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोताचा पाया बळकट करून उत्पन्नात वाढ करणे, यात मालमत्ता करवसुलीसाठी जीआयएस प्रणालीचा अवलंब करणे, सर्व मालमत्ता कराच्या जाळ्यात आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आयुक्तांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार दुकान गाळे भाड्याच्या दरांचे पुनर्विलोकन करणेही आयुक्तांच्या केआरएमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नगरोत्थान, अमृतमधील योजना पूर्ण करणे, स्मार्ट सिटीसह २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत शह हागणदारीमुक्तीवरही आयुक्तांचा ‘सीआर’ अवलंबून आहे. याशिवाय घनकचरा विलगीकरण मोहीम, घनकचऱ्याचे ९० टक्के विलगीकरण तसेच ३१ मार्च २०१८ पर्यंत ओल्या कचऱ्याचे कम्पोस्टिंग करणेही आयुक्तांनाच बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थात महापालिका आयुक्तांना ‘काम’ करून दखवायचे असून उद्दिष्ट्यपूर्तीवरच त्यांचे पुढील प्रशासकीय भवितव्य अवलंबून आहे.