नरखेड : स्थानिक शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांचे वसतिगृह येथे साेमवारी (दि.३) काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. याठिकाणी ३२ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांना उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या हस्ते काेविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार डी. जी. जाधव, पं. स. सभापती नीलिमा रेवतकर, ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. पुरुषाेत्तम बालपांडे, डाॅ. स्वप्निल बारई, नगरसेवक संजय चरडे, प्रा. नरेश तवले, सतीश रेवतकर, मनीष फुके, अमोल आरघोडे, जाकीर शेख, सुनील बालपांडे, नितीन कडू, गौरव पोतदार, जितेंद्र घ्यार, अमित गायधने, योगेश मांडवेकर, प्रशांत क्षीरसागर, नरेंद्र मानकर, प्रशांत शेंडे उपस्थित होते. नरखेड येथे लोकमान्य मतिमंद व कर्णबधिर विद्यालय येथे वर्षभरापासून कोविड केअर सेंटर सुरू आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता नव्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त काेविड सेंटर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नरखेड येथे काेविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:12 IST