स्वरशिल्प संस्थेचे आयोजन : गीतांचे सादरीकरण नागपूर :विविध वयोगटातल्या हौशी गायिकांनी तयारीने सादरीकरण करीत आज रसिकांना नव्या-जुन्या हिंदी-मराठी गीतांनी स्मरणरंजनात रमविले. जुन्या लोकप्रिय गीतांपासून ते आत्ताच्या गीतांपर्यंतचे हे सादरीकरण रसिकांची दाद घेणारे होते. सर्वच गायिका हौशी, नवोदित असल्याने त्यांनी मूळ गायकाची कॉपी न करता स्वत:च्या स्वतंत्र शैलीत गीत सादर केल्याने हा कार्यक्रम वेगळा ठरला. भावपूर्ण गीतांचे शिल्प साकारणारा हा कार्यक्रम रसिकांच्या वन्समोअरने रंगला. भाग्यश्री बारस्कर संचालित स्वरशिल्पतर्फे ‘भावतरंग’ हा नवोदित आणि जुन्या कलावंतांचा हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नल जोग आणि पद्मिनी जोग यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमतचे संपादक (समन्वय) कमलाकर धारप प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध गायिका भाग्यश्री बारस्कर यांची होती. कार्यक्रमाचा प्रारंभ वेदिका पाटीलच्या ‘चांदोबा चांदोबा भागलास का...’ या गीताने झाला. आर्या बारस्करने आपल्या गोड आवाजात ‘चंदामामा दूर के...’ हे गीत सादर केले. या कार्यक्रमात राधा बुटी, नील बुटी, संगीता करंदीकर, वैशाली तालेवार, सरिता पुराडभर, रंजना पुरणकर, अंजली इंगळे, पल्लवी उपदेव, प्राची कुकडे, तन्मया मुंडले, कोमल श्याम, अंकिता शृंगारपुरे, खुशी कक्कड, मंजुषा जोशी, गौरी गोडसे, सरिता पंडित, विद्या काणे, वृषाली छत्रे, चंदना पाल, मल्लिका बुटी, आयुष बुटी, उषा महिन्द्रा, नीता भावे, प्राची दाणी, श्रद्धा पारखी, मंजिरी ठाकूर, देविका बुटी, लिला फुलझेले, मेघना जोशी, शिवांगी बुटी, निता शर्मा, पौर्णिमा गोखले, नंदिनी पारणकर आणि भाग्यश्री बारस्कर यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन रंजना पुरणकर यांनी केले. याप्रसंगी ‘मालवून टाक दीप.., मला जाऊ द्या न घरी..., सोळावं वरिस धोक्याचं..., अप्सरा आली..., ढोलकीच्या तालावर..., नगाडे संग ढोल बाजे..., ढल गया दिन.., रात अकेली है..., कांटो से खीच के ये आँचल.., झुमका गिरा रे.., जाता कहां है दिवाने.., सवांर लुं..., छोड दो आँचल..., अजी रुठकर तुम कहा जाईएगा..., पान खाये सैया हमारो.., बुगडी माझी सांडली ग..., कपुरी पान...मिले सूर मेरा तुम्हारा...’ आदी गीते सादर करण्यात आली. गायिकांना महेंद्र ढोले, अशोक टोकलवार, सुभाष वानखेडे, सलिल मुळे यांनी साथसंगत केली.(प्रतिनिधी)
भावपूर्ण गीतांचे शिल्प साकारणारा भावतरंग
By admin | Updated: June 22, 2014 01:05 IST