लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना सावनेर- खानगाव मार्गावरील मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
निखिल बबनदास महंत (३२, रा. खानगाव, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, निखिल मानकर (२०, रा. नाग मंदिर चाैक, सावनेर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मृत निखिल व त्याचा मित्र निखिल मानकर हे दाेघेही एमएच-४० एबी-९०९२ क्रमांकाच्या दुचाकीने सावनेरकडे जात हाेते. दरम्यान खानगाव राेडवरील मंगल कार्यालयाजवळ अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुण गंभीररीत्या जखमी झाले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दाेघांनाही सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी निखिल महंत यास मृत घाेषित केले. जखमी तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. या मार्गाने २४ तास रेतीच्या अवैध वाहतुकीची वाहने सुसाट धावतात. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टरही रेती वाहतुकीचा असावा, असा अंदाज घटनास्थळावरील नागरिकांनी व्यक्त केला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे.