नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी बाबुलाल प्रयागराज द्विवेदी (७६, रा. गंगानगर झोपडपट्टी) याला पाच वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत घडली होती. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास आरोपींनी ७ व ६ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केला. एका मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. तसेच, महिला पोलीस उपनिरीक्षक पी. टी. एकुरके यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे ॲड. वर्षा आगलावे यांनी कामकाज पाहिले.