शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

‘मेट्रो’च्या वाढीव खर्चास मंजुरी

By admin | Updated: August 7, 2014 01:04 IST

उपराजधानीचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या मेट्रो रेल्वेला शासकीय पातळीवर गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या आराखड्यास

दोन हजार कोटींची वाढ : आज केंद्राकडे सुधारित प्रस्ताव नागपूर : उपराजधानीचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या मेट्रो रेल्वेला शासकीय पातळीवर गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मंजुरी दिली. शासनाच्या मंजुरीसह वाढीव खर्चाचा प्रस्ताव उद्या, गुरुवारी तातडीने केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे. नासुप्रने २०१२ साली या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाचे आकलन केले होते. त्यानुसार ८ हजार ६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या खर्चाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी देत केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. मात्र, नुकतेच केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आजच्या परिस्थितीत किती खर्च येईल, याचा सुधारित आराखडा तयार करून पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी महागाई निर्देशांकानुसार आॅगस्ट २०१४ चे दर विचारात घेत १० हजार ५२६ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार केला. बुधवारी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खर्चाच्या वाढीव आराखड्याबाबत बैठक झाली. तीत पालकमंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार आदी उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांसह सचिवांनी वाढीव खर्चाच्या आराखड्यास मंजुरी दिली. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री चव्हाण यांनी दराडे यांना दिल्या. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत मेट्रो रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्प आराखडा बदलण्याचे निर्देश दिले होते. याची तातडीने दखल घेत सभापती दराडे यांनी सुधारित आराखडा सादर केला होता. त्यामुळे खर्चात ८०० कोटींची कपात झाली होती. (प्रतिनिधी)केंद्राकडूनही त्वरित मंजुरीची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ आॅगस्ट रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे १० दिवसात केंद्र सरकारकडून वाढीव खर्चाच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.