शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्हेंचर टूर, तोही ६०० किलोमीटरचा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:28 IST

आव्हाने हा जीवनाचा भाग आहे. मात्र आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आव्हानांना समर्थपणे घेतो तोच जीवनात यशस्वी होतो.

ठळक मुद्देग्वाल्हेरहून निघालेले सायकलस्वार दल नागपुरात दाखल : सिंधिया शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आव्हाने हा जीवनाचा भाग आहे. मात्र आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आव्हानांना समर्थपणे घेतो तोच जीवनात यशस्वी होतो. कोणत्याही अ‍ॅडव्हेंचरमधून यशस्वीतेचं हे तंत्र शिकता येते. शनिवारी ग्वाल्हेर येथील सिंधिया शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे अ‍ॅडव्हेंचर दल सायकलने ६०० किलोमीटरचा प्रवास करीत नागपुरात पोहचले तेव्हा प्रत्येक सदस्यांच्या चेहºयावर असाच यशस्वीतेचा भाव दिसून येत होता.या दलात २४ सदस्यांचा सहभाग होता. यामध्ये सिंधिया शाळेतील ११ व्या वर्गाचे १८ विद्यार्थी आणि सहा शिक्षकांचा समावेश आहे. ही अ‍ॅडव्हेंचर टूर ६ दिवसाची होती, त्यानुसार दलातील सदस्य २३ आॅक्टोबरला ग्वाल्हेरहून निघाले. दलातील सदस्य विद्यार्थी ध्रुव पेरिवाल याने लोकमतशी बोलताना या संपूर्ण टूरची माहिती दिली. अ‍ॅडव्हेंचर टूर ठरल्यानंतर या दलात सहभागी होणाºया प्रत्येक सदस्याची फिटनेस टेस्ट आणि सायकल अ‍ॅबिलिटी टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर २३ ला शाळेच्या पदाधिकाºयांनी सायकलस्वर दलाला रवाना केले. निघताना एक उत्साह होता. वाटेत अनेक समस्या आल्या. काही सदस्यांच्या सायकली पंक्चर झाल्या. मोठमोठ्या डोंगर घाटांचे अडथळे आले. मात्र या सर्वांमध्ये एक जिद्द होती. सोबत टीमवर्क आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे अशा समस्या व अडथळ्यांवर मात करून अखेर यशस्वीपणे नागपूरला पोहचल्याचे धु्रवने सांगितले. या सहा दिवसाच्या टूरमध्ये वाटेत ललितपूर, सागर, करेली, अमरवाडा आणि सौंसर अशा पाच ठिकाणी मुक्काम केल्याचे त्याने सांगितले.प्रत्येकाच्या सायकलवर कमीतकमी लगेज राहील याची काळजी घेण्यात आली. मात्र पाण्याची बॉटल, ओआरएस किंवा ग्लुकोज आदी साहित्य प्रत्येकाकडे होते. अत्यावश्यक वैद्यकीय साहित्या व इतर महत्त्वाचे सामान असलेली एक कार नियमित दलाच्या सोबत असल्याचे त्याने सांगितले. मात्र वाटेत कुणाच्याही प्रकृतीची समस्या निर्माण न झाल्याचे त्याने स्पष्ट केले. प्रत्येकाचा वेग सारखा नव्हता. मात्र एकमेकांसोबत हे अ‍ॅडव्हेंचर पूर्ण करण्याचा संयम होता. त्यामुळे अतिशय सहजपणे ६०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याची भावना दलातील प्रत्येक सदस्यांनी व्यक्त केली.हे सर्व सदस्य सीताबर्डीतील माहेश्वरी पंचायत येथे मुक्क ाम करणार असून रविवारी आयक्निल नागपूरच्या सदस्यांसोबत पाटणकर चौक, कामठी रोड येथे स्वच्छता अभियान व भिंत सुशोभीकरणाच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी रेल्वेने हे सदस्य ग्वाल्हेरसाठी रवाना होणार आहेत.दलातील सदस्यशिक्षक : रक्षा सिरिया, पूजा पंत या महिलांसह अनिल पठानिया, श्रीजित पिल्लई, विशेष सहाय, मनोज मिश्रा हे शिक्षक सहभागी होतेविद्यार्थी : धु्रव पेरिवाल, मोहित असानी, सोमांश गिरधर, प्रियांशु अग्रवाल, प्रणव पहावा, सिद्धार्थ अग्रवाल, कुशाग्र पटवारी, कुशाग्र गुप्ता, अतुल कुमार, वंश त्यागी, अनिकेत भाटी, क्लिओमल लिंबू, श्रेय अग्रवाल, शशांक किलोरे, दिवांश अग्रवाल, केविन चौधरी, रचित अग्रवालही तर सिंधिया शाळेची परंपराया दलात सहभागी शिक्षिका रक्षा सिरिया यांची ही १५ वी अ‍ॅडव्हेंचर टूर आहे. त्यांच्यासोबत इतरही शिक्षकांनी अनेकदा अशाप्रकारे सायकलने अ‍ॅडव्हेंचर ट्रीपमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी सांगितले, दरवर्षी अशाप्रकारे सायकलने अ‍ॅडव्हेंचर टूर काढणे ही सिंधीया शाळेची अनेक वर्षाची परंपरा आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सक्षमतेचे धडे देण्यासाठी इतरही अ‍ॅडव्हेंचर उपक्रम राबविले जात असून आमच्या दलाप्रमाणे शाळेतील इतर विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी झाले आहेत. यावर्षीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून पुढल्या वर्षी इतर विद्यार्थी या अ‍ॅडव्हेंचरसाठी उत्साहाने तयार होतात. शारीरिक सुदृढता, टीम वर्क आणि संयमाचे धडे देण्यासाठी असे उपक्रम राबविले जात असतात. पर्यावरण संरक्षणाचा संदेश ही सायकलिंग टूरची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.