शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध; कोविड रुग्णांसाठी नवी उमेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 09:57 IST

वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत.

ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी चाचणीला येणार गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात कुठेच अँटिव्हायरल उपचार उपलब्ध नसलेल्या ‘कोविड-१९’वर ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत.

यांच्याकडून आतापर्यंत ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या आहेत. यातील १२ ते १३ बॅग याच धर्तीवर सुरू असलेल्या ‘आयसीएमआर’च्या संशोधनातील आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारातील सर्वात मोठा प्रकल्प प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायलचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पात राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व मुंबईतील बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाची चार महाविद्यालये अशा एकूण २१ केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जाणार आहे. सर्व गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जाणार आहे.

प्लाझ्मा हा कोविडच्या गंभीर किंवा सौम्य लक्षणातून बरे होऊन पुढील २८ दिवसांपर्यंत कुठलीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून घेतला जातो. अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटिबॉडीज मुबलक असतात. हे अँटिबॉडीज गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढा देत असल्याने अशा व्यक्तींना प्लाझ्मा दान केले जात आहे. असेच संशोधन ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वतीने देशातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. परंतु ही चाचणी मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर आहे. यातही साधारण २५० रुग्णांचा समावेश केला जाणार आहे. या दोन्ही संशोधनात मदत करण्यासाठी कोरोनाला हरविलेले दाते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत असल्याने दोन्ही संशोधनाला वेग आला आहे.कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावेसौम्य लक्षणे असताना ‘कोविड-१९’ आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी कोरोनाला हरविण्यासाठी पुढे यायला हवे. शासकीय रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करायला हवे. प्लाझ्मा दान केल्यावर अशक्तपणा येत नाही. विशेष म्हणजे, चार आठवड्यांनंतरही पुन्हा प्लाझ्मा दान करता येऊ शकते.-डॉ. एम. फैजल, प्रकल्प इन्चार्ज व स्टेट नोडल अधिकारी, ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस