शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

यशस्वी वाटचालीची ५० वर्षे

By admin | Updated: July 16, 2016 02:59 IST

शहरातील काही जुन्या आणि ऐतिहासिक शिक्षण संस्थांमध्ये विजयनगर, भरतवाडा येथील शाळेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

नागपूर : शहरातील काही जुन्या आणि ऐतिहासिक शिक्षण संस्थांमध्ये विजयनगर, भरतवाडा येथील शाळेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हिरामण बावनकुळे यांनी १९६५ साली नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय व उच्च प्राथमिक शाळेच्या लावलेल्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज शाळेत केजीपासून दहावीपर्यंत १६०० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. महेंद्र एज्युकेशन सोसायटीद्वारे शाळेचे संचालन करण्यात येते. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण येथे उपलब्ध आहेत. भरतवाडासारख्या कामगारबहुल परिसरात असलेल्या या शाळेत ८० टक्के विद्यार्थ्यांचे पालक हे छत्तीसगडी कामगार आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात शिक्षकांनी कुठलीही कसर सोडली नाही. दहावीत १०० टक्के निकाल व गुणवत्ता यादीत विद्यार्थी आणून दाखविले आहे. दहावीच्या निकालाबरोबरच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत कित्येक वर्षापासून शाळेचा प्रथम क्रमांक येत आहे. शाळेने शिक्षणाच्या राबविलेल्या पॅटर्नमुळे एकाही विद्यार्थ्याला खासगी शिकवणी लावण्याची गरज भासत नाही. परीक्षेच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवले जाते. येथे खरोखरच विद्यार्थी घडत असल्याचा पालकांनाही विश्वास आहे. शिक्षणाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दर शनिवारी परिपाठ, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, गोष्ट सांगणे असे उपक्रम राबविले जातात. सर्व धर्माचे सण अतिशय उत्साहात साजरे करण्यात येतात. राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनाचे कार्य परिसरात करण्यात येते. मुले परिसरात आरोग्यदूत म्हणून कार्य करतात. लक्ष वेधून घेणारी इमारत, आकर्षक आणि कलरफुल क्लासरूम, वाचनालय, आयसीटी कॉम्प्युटर लॅब, विज्ञानाच्या सुसज्ज प्रयोगशाळा, ई-लर्निंग आदी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.