न्यायालयात खटला सुरू होता.. एका महिलेवर हवालदाराची पँट पेटवण्याचा आरोप होता..
न्यायाधीश- तुम्ही हवालदाराची पँट पेटवली हे खरं आहे..?
महिला- होय जजसाहेब...
न्यायाधीश- तुम्ही असं का केलंत..?
महिला- मी आणि माझा नवरा कारमधून जात होतो. त्यानं चुकून सिग्नल तोडला.. तितक्यात हवालदार साहेबांनी आम्हाला अडवलं..
न्यायाधीश- म्हणून तुम्ही त्यांची पँट पेटवून दिलीत..?
महिला- मी पेटवणार नव्हते.. पण तेच आम्हाला म्हणाले, दंड भरायचा नसेल, कारवाई टाळायची असेल तर माझा खिसा गरम करा..