शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कौन गुरुमुखी? कौन मनमुखी?

By admin | Updated: September 12, 2015 18:21 IST

प्रश्न फक्त पैसा-सत्ता-ग्लॅमरचाच नाही, तर आखाडय़ांच्या अस्तित्वाचा, प्रतिष्ठेचा, कमाईचाही आहे. ‘बाहेरच्यांनी’ आधीची व्यवस्था नाकारून एक समांतर जग निर्माण केलं, तेही अधिक वैभवशाली! पारंपरिक व्यवस्थेला हे कसं रुचावं? का पटावं?

- मेघना ढोके
 
मागच्या पर्वणीच्या आदल्या दिवशीची गोष्ट. 
त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामात एका गरीबशा अंधा:या खालशात बसलो होतो.
साधूबाबा ‘योग-भोग’ वाली नेहमीची माहिती देत होते.
टीव्हीवरच्या एका ‘फेमस’ बाबांचा विषय निघाला. 
‘ते’ मोठे योगगुरू. अत्यंत लोकप्रियही. केवढा त्यांचा शिष्यपरिवार. असं काहीसं बोलणं सुरू होतं.
तेव्हा हे खालसावाले बाबाजी म्हणाले, ‘‘वो तो हमारे गुरुबंधू है, जितना योग वो जानते है, उतना हम भी जानते है, ये अलग बात है की, अब उनका बडा नाम है..!’’
अच्छा, एकाच गुरूकडे शिकले तुम्ही सारा योगाभ्यास. पण मग ते फार पुढं निघून गेले आणि आपल्याला तितकंसं नाव मिळालं नाही याचा खेद वाटतो का, असंच खरं तर थेट विचारायचं होतं. पण तसं विचारलं असतं तर साधूबाबा भडकले असते. म्हणून विचारलं, ‘‘अब तो वो बहौत बडे है, आप से कभी फोन पे तो बात होती होगी.?’’
‘‘क्यूं नहीं होगी बात? उन्हे जिन्होने ग्यान दिया, वो गुरुजी अब इसी वक्त इसी खालसा में है. शिष्य कितना भी बडा बन जाए गुरू से बडा तो नहीं होगा ना?’’ -बाबाजी सांगतात. ‘‘संपर्क बनाए है वो अभी भी इन गुरुजी से?’’ जरा अतिच शुगरकोटेड शब्दात विचारलं.
‘‘क्यूं नहीं करेंगे. करते है ना, संपर्क. करना ही है उन्हे तो.’’ - बाबाजींनी गोलमोल उत्तर दिलं. 
त्या उत्तरातून जाणवत होतंच की, कसला संपर्क नी कसलं काय? उगीच वेळ मारून नेताहेत. खरंच ते मोठे ‘योगगुरू’ या बाबाजींच्या गुरूंकडे शिकलेत का, ते दोघे गुरुबंधू आहेत का, हे काही त्यानंतर तपासून पहायला वेळ मिळाला नाही. त्या गुरुजींनाच आम्हाला भेटू द्या म्हटलं तर बाबाजींनीही ‘अभी वो सो रहे है’ म्हणत सायंकाळी 7 वाजता त्यांना भेटू दिलं नाही, ते वेगळंच!
मात्र त्या सा:या चर्चेत ‘त्या’ अतिफेमस योगगुरूंविषयीची असूया उघड जाणवत होती. त्यांचा पैसा, त्यांचं ग्लॅमर, त्यांच्याइतका शिष्यपरिवार खालसा नी आखाडय़ावाल्या साधूंकडे नाही हे तर उघडच! त्यात  साधू समाजात साधूचं वजन कशावर मोजतात तर साधूच्या शिष्यपरिवारावर आणि त्याच्या खालसा, आखाडा आणि स्थानाकडे असलेल्या चलअचल संपत्तीवर! एखाद्या साधूचं वर्णन करताना दुसरा साधू चटकन सांगतो, ‘‘वो भी बडे महात्मा है, सौ-दोसौ चेले है उनके भी.’’
जिथं सौ-दोसौ चेले असणं मोठं ताकदीचं मानलं जातं, तिथं हजारो लाखो भक्त असणं, नव्हे भक्तपरिवारच असणं याकडे कसं पाहिलं जात असेल असा प्रश्न पडतोच.
हा प्रश्न विचारत विचारत खालसांमधून फिरलं आणि टीव्हीवरच्या ब:याच फेमस बाबांचा आणि माताजींचा विषय काढला की काही साधू विषयच बदलतात. काही स्पष्ट सांगतात, ‘‘उनके बारे में क्या बात करना, वो थोडी ना साधू समाजी है!’’ रोज सकाळी टीव्हीवर दिसणारे काही साधू खरंतर नुस्ते कथा सांगतात, तरी त्यांना लोक मानतात याचा विषादही दिसतोच. बोलता बोलता कुणीतरी म्हणतोच, ‘‘वो तो सिर्फ कथावाचक है, वो काहे का साधू.!’’ मग अलीकडेच चर्चेत असलेल्या एका ‘मां’चा विषय काढलाच तर काही गप्पच होतात. एक बडे गुजरातकडचे बाबाजी तर सांगतात, ‘‘वो हमारे आश्रम में रही थी ना चार दिन. अच्छी है, ग्यानी है वो भी.’’ ते सांगतानाही त्या ‘मां’ला लाभलेलं ग्लॅमर आणि त्याविषयीचं कौतुक चेह:यावर दिसतंच. त्याला लागून पालुपद येतंच की, ‘‘हम तो खैर कभी अखबार भी नहीं पढते. नहीं आया हमारा फोटो, क्या फर्क पडता है साधू को.’’
- पण खरं सांगायचं तर फरक पडतो हे पदोपदी जाणवत राहतं. टीव्हीवर झळकणारे साधू, बडा भक्तपरिवार असलेले, श्रीमंत वातावरणातले, चकाचक बाबा, महाराज, बापू, गुरुजी, माता, मय्या या सगळ्यांविषयी बोलताना आकस जाणवतो. कधी कधी तर त्यांची व आपली कशी दोस्ती आहे, ते आपल्याला कसे मानतात हे सांगताना आपलं महत्त्व अधोरेखित केलं जातं. आणि काही काही सटकसाधू तर सांगतात पण की, वो अमुक ना, वो तो फर्जी है, वो काहे का बाबा, वो सिर्फ बडबोला है.
आपण ऐकत राहायचं. पण ते ऐकताना प्रश्न पडतो की, हे नेमकं प्रकरण आहे काय?
शोधलं, बरंच खणलं की कानावर येतात दोन शब्द.
गुरुमुखी, मनमुखी.
गुरुमुखी म्हणजे हे सारे साधूसमाजी, साधू परंपरेतले साधू. जे त्या व्यवस्थेत येतात. गंडाधारी शिष्य होतात. मग पुढे जाऊन महंत, महामंडलेश्वर आदि होतात. जे आखाडय़ांशी, खालसांशी बांधलेले असतात. संसार सोडून पूर्णत: साधू समाजाचा भाग बनलेले असतात.
साधू समाजात गुरुमुखी साधूंना मोठा मान. गुरू कोण हे साधू फार मानानं सांगतात. अमुक मोठा साधू पहिले आपला शिष्यच कसा होता हेदेखील मोठय़ा गर्वानं सांगतात. मुद्दा काय, गुरूनं दीक्षा दिल्यानं साधू बनलेले गुरुमुखी. या साधूंचीही मग वंशावळ बनते. त्यांचेही पंडे असतात. कोण कुणाचा शिष्य, कोण कुणाचा गुरू हे सारं सहज कळू शकतं. आखाडा, खालसांची बांधिलकी असते ती वेगळीच!
आणि मनमुखी?
ते एक दिवस स्वत:च्या मनानंच ‘साधू’ बनतात. मनात आलं, झाले साधू. म्हणून ते मनमुखी साधू. त्यांचा कुणी गुरू नसतोच. आणि या आखाडय़ांच्या व्यवस्थांशी ते जोडलेलेही नसतात. पूर्वी फक्कडभाई छाप, पोटभरू जे साधू असतं त्यांना हिणवून बोलण्यासाठी हा मनमुखी शब्द वापरला जात असे. त्यांच्याविषयी बोलताना गुरुमुखी साधूंच्या शब्दात राग असतो, तिरस्कार असतो आणि ते कुणीतरी किल्लस आहेत असा एकूण आवेशही असतो. इतकी वर्षे हे असंच चाललं होतं. पण टीव्ही आला आणि अनेक बडे बाबाबुवा, जे या साधूसमाजी परंपरेतले नव्हते, म्हटलं तर मनमुखीच होते ते एकदम ‘स्टार’ झाले. त्यांचा भक्तपरिवार, शिष्यपरिवार वाढला. त्यांच्याकडे पैसा आला. एकावेळी लाखो लोक त्यांच्यामागे वेडे होऊ लागले. बडे राजकारणी, उद्योगपती या बाबा/मातांना मानू लागले. त्यांना ग्लॅमर आलं आणि साधूसमाजींकडे, आखाडय़ांकडे येणा:या धर्मादाय दानाचा आणि लोकांचाही राबता कमी झाला.
संघटित क्षेत्रत एकदम असंघटित लोकांनी दाखल होऊन वर्चस्व गाजवायला लागावं आणि बलशाली व्हावं असंच झालं. उघड बोलत नसला तरी साधू समाज अशा मातब्बर मनमुखी साधूंमुळे हादरला हे खासगीत बोलताना कळतंच. आणि मग ठिकठिकाणी होणा:या कुंभमेळ्यात त्यावरून वाद होऊ लागले. आखाडय़ांशी संबंधित नसलेल्या बाबाबुवांना, संस्थांना साधुग्रामात स्थान देऊ नये म्हणून भांडणं होऊ लागली. कज्जे सुरू झाले. पण असे बिगर आखाडा, बिगर खालसा साधू मातब्बर, राजकीयदृष्टय़ा अधिक प्रभावशाली. त्यांच्यापुढे काही यांचा टिकाव लागत नाही.
त्यांची ताकद यांच्यापुढे किती जास्त आहे, हे साधुग्रामातल्या पेंडालांची नुस्ती तुलना केली तरी दिसतं. नाशिक साधुग्रामात आखाडय़ाशी संबंधित नसलेल्या बाबाजींचे मंडप लखलखीत, श्रीमंत, महालासारखेच आलिशान. तिथली गर्दीही सुशिक्षित, शहरी, पैसेवाली. तिथं सारंच उंची दर्जाचं. आणि खालसा, त्यामानानं फारच गरीब. खालशात ‘पंगत’ धरून बसणारे गरीब, देहातीच जास्त!
इतके दिवस फक्त असूया, हेवा अशा भावना होत्या. आता आपल्या अस्तित्वावरच गदा आल्यासारखे साधू धास्तावलेत हे खरंय! गेल्या आठवडय़ात आखाडय़ावाले साधू लाठय़ाकाठय़ा घेऊन एका मोठय़ा महाराजांच्या भव्य मिरवणुकीवर धावून गेले. मोठा संग्रामच झाला. त्याचं कारण काय, तर ते महाराज आखाडा व्यवस्थेतले नाहीत. पण प्रचंड मोठा भक्तपरिवारवाले. साधुग्रामात साधू खुलेआम सांगतात, उनका खालसा नहीं है, ‘कॅम्प’ है! खालसाओ में संघर्ष नहीं हुआ, बाहरवालों को तो रोकनाही था. ते महाराज आपल्या भव्य भक्तपरिवारासह वाजतगाजत साधुग्रामातून निघतात, याचा त्रस आखाडा-खालशांना होणार हे उघड होतं.
कारण प्रश्न फक्त पैसा-सत्ता-ग्लॅमरचाच नाही, तर आखाडय़ांच्या अस्तित्वाचा, प्रतिष्ठेचा, कमाईचाही आहे.
बाहेरच्यांनी येऊन आधीची व्यवस्था नाकारून, समांतर जग निर्माण केलं, तेही अधिक वैभवशाली पारंपरिक व्यवस्थेवर उभं राहिलेलं हे एक प्रश्नचिन्हच आहे.
आणि साधू समाजाकडे आज तरी त्यावर काही उत्तर आहे, असं दिसत नाही.
 
 
पहाटेचं साधुग्राम
 
साधुग्रामातली पहाट.
ही एक भन्नाट गोष्ट असते. खरंतर दिवसातल्या कुठल्याही प्रहरापेक्षा,
पहाटेचं साधुग्राम ही ‘पाहावी’ अशी व्यवस्था असते.
त्यातून कळतं साधूंचं एक रुटीन!
कुठल्याही खालशात जा, महंत एकच असतात.
ते म्होरके. बाकी त्यांचे सहायक.
आणि त्याखालोखाल तरुण साधू. जे सेवक.
पण त्यातही प्रकार असतात. 
पहिल्या टप्प्यात साफसफाई, भांडी घासणं, गर्दीचं नियोजन असं काहीसं काम असतं. 
त्यानंतर असतात आचारी.
ज्यांच्याकडे मुख्यत्वे स्वयंपाकाची जबाबदारी असते.
काही हजार माणसांचा स्वयंपाक असतो. भाज्या चिरणो, कणीक मळणो, स्वयंपाक करणो इथपासून ते सुरू होतं. त्यापुढे असतात भंडारी आणि कोठारी. जे सगळं नियोजन पाहतात. अन्नधान्याचा स्टॉक सांभाळणं, ते कोठारातून  काढून देणं, भाज्या आणून देणं हे सारं त्यांचं काम.
एकेक प्रमोशन मिळत साधू वरच्या पाय:या चढतात. सगळ्यात मोठी ङोप म्हणजे पुजारी होणं. देवाची सजावट, श्रंगार, पूजा, नैवेद्य हे सारं त्यांचं काम! या टप्प्यात पोहचलं की मग पुढची वाट तुलनेनं सोपी होते. म्हणजे कथावाचक, प्रवचन, मग कुणीतरी महंताईकडे यथावकाश जातो. थोडे नशीबवान आणि प्रतिभावान मुख्य महंतांचे कृपापात्र होतात, ते डायरेक्ट पुढे जात पुजारी, कथावाचक होतात.
मात्र या सा:यात दिनक्रमातली शिस्त कसोशीनं पाळली जाते. अनेक साधू पहाटे चारलाच उठतात. ब्रrामुहूर्त. स्नानादि नित्यकर्म उरकून मग सुरू होतो गंध लावण्याचा कार्यक्रम. आखाडा, संप्रदाय यांच्याप्रमाणो गंध लावण्याच्या पद्धती बदलतात. साधूचं नुस्तं गंध पाहून सांगता येऊ शकतं की, हा कुठल्या संप्रदायाचा! कपाळावर चंदन लावणं, रक्तचंदन लावणं, गंध लावणं हे सारं कोरीव काम बराच वेळ चालतं. मग हात-पाय, मान यांच्यावर चंदनाची बोटं फिरवली जातात. जटा काही साधू सावरतात. काहींनी कायमच्या बांधलेल्याच असतात. मग काही साधू जप करतात. काही पूजा. काहींचा नित्यपाठ असतो. काहींचं दैनंदिन व्रत असतं. हे सारं करता करता उजाडतं. मग न्याहारी करून साधू आपापल्या कामाला लागतात.
पहाटे सा:याच खालशांत अति लगबग असते. आरत्यांचे आवाज, घंटांचे निनाद, भजनं, श्लोक, धूप-उदबत्त्यांचे सुवास, देवाला चढवलेले ‘भोग’ हे सारं लांबून पाहण्यासारखं असतं.
त्या पहाटच्या साधुग्रामची ही एक चित्रमय झलक..
आज पर्वणी, शाहीस्नान हा उत्सवच. आजच्या दिवशी तर ही सारी लगबग अतिउत्साहात असते आणि अनोखीही!
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
 
meghana.dhoke@lokmat.com