शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

शहरं सोडून जाणार्‍या माणसांचे लोंढे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 06:05 IST

शहरं त्यांच्याकरता नसतात; कधीच नव्हती.  शहरांना त्यांची गरज असते, त्यांनाही शहरांची असतेच.  एकमेकांना ते वापरून घेतात, पुरेपूर; पण संकटकाळात शहर कधीच त्यांच्या पाठीशी उभं राहात नाही. 

ठळक मुद्देहाकलल्या गेलेल्या या माणसांच्या वेदनेला, अस्वस्थतेला, अडचणींना समजून घ्यायला  चित्र -भाषेइतकं समर्थ दुसरं माध्यम नाही : पूर्वार्ध

- शर्मिला फडके

शहरं त्यांच्याकरता नसतात; कधीच नव्हती. शहरांना त्यांची गरज असते, त्यांनाही शहरांची असतेच. एकमेकांना ते वापरून घेतात, पुरेपूर, पण संकटकाळात; मग तो दंगलींचा काळ असो, पुराच्या लोंढय़ाचा असो किंवा करोनाच्या महामारीचा; शहर कधीच त्यांच्या पाठीशी उभं राहात नाही. शहर त्यांना विश्वासही देऊ शकत नाही की आम्ही तुम्हाला आसरा पुरवू, मजुरी नाही मिळाली तर पोटाला अन्न देऊ. शहर फक्त निर्विकारपणे त्यांचे जाणारे लोंढे बघत राहातं. पुन्हा येतीलच हे, शहर सुस्थितीत आलं की याची स्वार्थी खात्नी शहरातल्या प्रत्येकाला असते. कलेच्या इतिहासाने शहरं सोडून जाणार्‍या माणसांचे असे अनेक लोंढे वेगवेगळ्या कालखंडात पाहिले. 1939 मध्ये  मरियन ऐन्डरसनने लिंकन मेमोरियलच्या पायर्‍यांवर उभं राहून ‘ट्रेन इज कमिंग.’ गायलं ते अशाच लाखो- हजारो आफ्रिकन अमेरिकनांचे लोंढे पाहून. जे उपाशीपोटी दक्षिणेकडची गावं सोडून उत्तरेकडच्या शहरांकडे निघाले होते, पोट भरायला, काम मिळवायला, जगण्याचा सन्मान मिळवायला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या या स्थलांतराने अमेरिकन समाजावर असंख्य दुरगामी, कायमस्वरूपी परिणाम झाले, अमेरिकन समाजाचा तळ मुळापासून ढवळून निघाला. सामाजिक, राजकीय, आर्थिक, आणि सांस्कृतिक असा हा बहुपदरी परिणाम होता. आणि काहीच वर्षांनी स्थलांतरितांचे लोंढे पुन्हा दक्षिणेकडच्या आपल्या खेड्यांच्या दिशेने. त्यामागचं कारण होतं दुसर्‍या महायुद्धाची झालेली सुरु वात, त्यामुळे उत्तरेकडच्या शहरांची झालेली दैना. हाताला काम राहिलं नाही, राहायच्या जागा परवडत नाही, पोटापुरते अन्न मिळत नाही, वाढलेल्या कुटुंबाला पोसता येत नाही आणि याहीपेक्षा भयंकर युद्धामुळे जिवाला निर्माण झालेला धोका. अशावेळी मग आपल्या जन्मगावाकडे परतून जाण्यावाचून दुसरा मार्गच शिल्लक नव्हता. हे पुनस्र्थलांतर केवळ पोट भरण्याकरिता नव्हतं, जिवाची भीती, असुरक्षितताही त्यात सामील होती. जाताना मनात निर्धार होता, जगण्याची आस होती, दुर्दम्य आशावाद होता, परतताना केवळ हताशा होती, हार होती, नैराश्य होते.या दोन्ही स्थलांतरांचा साक्षी होता जेकब लॉरेन्स हा तरुण चित्नकार. लाखोंच्या लोंढय़ामधील एक असलेल्या लॉरेन्समधल्या कलाकाराने या स्थलांतरणांचं सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व अचूक जाणलं. मानवामधल्या जगण्याच्या सनातन धडपडीने, जगण्याकरिता केलेल्या या स्थलांतराने संवेदनशील लॉरेन्स मुळापासून हादरून निघाला होता. तो स्वत:ही त्या अजस्र मानवी लोंढय़ाचा एक भाग होताच. लॉरेन्सने स्थलांतराच्या या गदारोळात आपली ‘वन वे टिकट- द मायग्रन्ट्स केप्ट कमिंग..’ ही 60 लहान टेम्पेरा पेंटिंग्ज असलेली मायग्रेशन सिरीज रंगवली. त्यातलं प्रत्येक चित्न प्रचंड अस्वस्थ करून टाकणारं आहे. माणसांच्या हातातल्या जीर्ण ट्रंका, गाठोडी, अंगावरचे अस्ताव्यस्त, मळके कपडे, पायातल्या फाटक्या वहाणा, हाताखांद्यांवर पोरं लटकलेली. लोंढय़ातल्या माणसांना वेगळे चेहरे नाहीत, महत्त्वाचं आहे त्यांचं चालणं. सतत आणि अविरत चालणं!1930 मध्यं एलिस आयलंडवरून ओक्लाहोमाला जाणार्‍या युरोपिअन्सच्या लोंढय़ावर आधारित युरोप-अमेरिकेतील वेगवेगळ्या चित्नकारांनी रंगवलेल्या आजवरच्या असंख्य चित्नांचं एक मोठं एकत्रित प्रदर्शन गेल्या वर्षीच न्यू यॉर्कच्या म्युझियम ऑफमॉडर्न आर्टमध्ये भरवलं गेलं होतं.“The Warmth of Other Suns: Stories of Global Displacement,”. राहातं शहर, गाव सोडून दुसरीकडे जावं लागणं मग ते कोणत्याही कारणाने का असेना, कायम अस्वस्थ करणारी, अस्थिर करणारी घटना असते. ती स्वीकारणं सोपं नसतंच. त्या मागची कारणंही अनेक असतात, वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, वांशिक. आणि एक खोलवरचं कारण या सगळ्यापेक्षा जास्त खरं आणि शाश्वत असतं,  ते म्हणजे आर्थिक. पोट भरायला, जगायला, आपला आणि कुटुंबीयांचा जीव तगवायला लोक सर्वात जास्त स्थलांतर करतात. अर्थात धार्मिक, वांशिक कारणंही तितकीच ताकदवान ठरलेली जगाने आजवर पाहिलेली आहेत. स्थलांतरितांचं स्वागत फारशा उत्साहाने कधीच केलं जात नाही. मूळच्या सांस्कृतिक-सामाजिक वस्राच्या विणीवर स्थलांतरित ठिगळांसारखे असतात. त्यांच्या अनेक पिढय़ा प्रवाहात सामावले जाण्याकरिता खर्ची पडतात.केवळ कलाकारच या उलथापालथीकडे सहानुभावाने पाहू शकतो. स्थलांतरितांच्या वेदनेला, अस्वस्थततेला, अडचणींना समजून घ्यायला चित्न-भाषेइतकं सर्मथ दुसरं माध्यम नाही. नव्या जागी रु जताना सैरभैर झालेली, अनेकदा कायमची हरवून गेलेली आपली ओळख, मूळ संस्कृतीचे धागे केवळ कलेच्या माध्यमातून पुन्हा जिवंत होऊ शकतात, जपले जाऊ शकतात, रंग आकारांच्या रचनेत ते कायमचे बद्ध होऊ शकतात. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतात. स्थलांतरितांच्या पुढच्या पिढय़ा जेव्हा प्रश्न विचारतात, ‘आम्ही कोण आहोत?’ तेव्हा उत्तर द्यायला आधीच्या पिढय़ा जिवंत असतातच असं नाही; पण कला असते. रंग-रेषा-आकारांच्या भाषेतली उत्तरं सहज समजून घेता येतात. स्थलांतरितांच्या प्रश्नांना, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्याकरिता एकाचवेळी जहाल, कठीण आणि संवेदनशील, मृदु असं माध्यम चित्नकलेशिवाय दुसरे नाही.स्थलांतरणासोबत त्या व्यक्तीची, समूहाची संपूर्ण ओळख, परंपरा, संस्कृतीही वाहत येते, त्यातले काही अवशेष टिकून राहातात, संक्रमित होतात, काही विरून जातात, फिकट होतात, बरेचसे विखरून जातात, नव्या परंपरा, ओळख, संस्कृतीची निर्मिती होते, हे नैसर्गिक आहे आणि आवश्यकही; पण जे सुटून गेलं, ते नेमकं काय होतं हाही एक प्रश्न शिल्लक उरतोच. या प्रश्नाचा वेध अनेक चित्नकारांनी घेतला.फेलिप बेझा या मेक्सिकन चित्नकाराच्या चित्नांमधून परिघाच्या कडेला ढकलल्या गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या आयुष्याचा शोध घेतला गेला. बराचसा अंधार, काही तपकिरी छटा त्याच्या चित्नांमध्ये असतात. स्थलांतरित मजुरांकडे, र्शमिकांकडे कायम गुन्हेगार म्हणूनच पाहिलं जातं,  याची अस्वस्थता फेलिप बेझाच्या चित्नातून जाणवते. आपल्या चित्नांमधून मानवी संघर्षाच्या कहाण्या पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.स्थलांतर म्हणजे केवळ गाव, शहर, देश, खंड ओलांडणं नाही, स्थलांतर केवळ शारीरिक, भौतिक स्वरूपाचं नसतं, तसं असतं तर सगळंच सोपं होतं. खाण्यापिण्याच्या, रहनसहनच्या सवयी बदलून, तडजोडी करून भागलं असतं. पोटाकरिता, आर्थिक प्रगतीकरिता, जीव तगवण्याकरिता तेवढं करणं तर भागच असतं; पण स्थलांतर म्हणजे प्रवास करून दुसर्‍या जागी जाऊन स्थिरावणं-वसणं नाही. स्थलांतराला केवळ वैयक्तिक आयाम नसतात. स्थलांतरामध्ये माणसाची सामाजिक, सांस्कृतिक, वांशिक मुळं उखडली जातात, नव्या जागी पुन्हा रु जताना त्याची आयुष्यभराची ऊर्जा पणाला लागते. स्थलांतरानंतर माणसाच्या वैयक्तिक धारणा बदलतात, जगण्याचे संदर्भ मुळासकट बदलतात. असे अनेक लोंढे जगभरच्या चित्रकारांनी नोंदवून ठेवलेले आहेत. त्यातले आणखी काही : पुढच्या रविवारी!

वैयक्तिक आणि वैश्विक संदर्भ ब्रिटिश आर्टिस्ट लुबेना हिमीद हिच्या Ankledeep या 1991 साली काढलेल्या भव्य चित्नामध्ये दोन स्रिया एका काळ्या कापडी फलकामागे उभ्या आहेत, त्या काळ्या कापडावर विरत चाललेल्या नकाशाच्या रेषा आहेत. या दोघी स्रिया कृष्णवर्णीय आहेत, आखूड केसांच्या, त्यांच्या माना डावीकडे वळलेल्या, चेहरे निर्विकार. लुबेना हिमीद मूळची टांझानियात जन्मली आणि लगेचच आपल्या पालकांसोबत ब्रिटनला आली, तिथेच लहानाची मोठी झाली. चित्नकलेमधल्या स्थलांतराच्या चित्नणाला वैयक्तिक आणि वैश्विक संदर्भ आहेत, ते असे! काही चित्नकार स्वत:ची ओळख रंगांमधून शोधू पाहतात. --

sharmilaphadke@gmail.com(लेखिका ज्येष्ठ कला समीक्षक आहेत.)