शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

खेड्यात जेव्हा शहर येते..

By admin | Updated: January 3, 2015 15:03 IST

पिकवणार्‍यापेक्षा विकणारा महत्त्वाचा आणि उत्पादकतेपेक्षा क्रयशक्तीला मोल! अशा परिस्थितीत शहरे विरुद्ध खेडी हा संघर्ष अटळ आहे.

 मिलिंद थत्ते

 
 
जगण्यासाठी, टिकण्यासाठी धडपड करणे हे प्रत्येक जीव करतच असतो. माणूसही त्यात आलाच. माणसांचे कुटुंब, माणसांचे वेगवेगळ्या कारणांनी होणारे समूह हेही एखाद्या जिवाप्रमाणेच वर्तन करतात. या समूहांनाही भूक असते. जसे देह राखण्यासाठी काही पेशी मरतात, तसे आपला समूह राखण्यासाठी माणसे जीवही द्यायला तयार होतात. या समूहांना जगण्यासाठी स्वत:ची ओळख, संस्कृती, अस्मिता वगैरे लागते. तसेच त्यांना आपला समूह राखण्यासाठी निसर्गसंपदेवरची मालकीही लागते. जमीन, पाणी, जंगल, जनावरे, खनिजे या सगळ्यातूनच संपत्ती निर्माण होते. संपत्तीतून सत्ता येते. त्यामुळे माणसाचा इतिहास हा या नैसर्गिक संसाधनांवरच रचलेला आहे. या संसाधनांची मालकी, उपलब्धता, अनुकूलता यानुसार मानवसमूह आणि  देश श्रीमंत किंवा दळिद्री होतात.
पण मानवसमूह हा एका देहाचा, एका मनाचा नसतो. एकत्र राहण्यात फायदा असतो, तोवरच तो एकत्र असतो. पूर्वी माणूस घनदाट जंगलात, वैराण वाळवंटात, दुस्तर पहाडात निसर्गाशी झुंजत जगत होता. तेव्हा सुरक्षित जगण्यासाठी समूहात राहणे गरजेचेच होते. समूहाने एकत्र रहायचे तर काही नियम काही रीती पाळाव्या लागतात. शिकार करणार्‍या समूहांमध्ये शिकारीचे समान वाटे करण्याची पद्धत आजही रूढ आहे. शिकारीत कोणी किती महत्त्वाची भूमिका पार पाडली, यानुसार वाटे लहान-मोठे होत नाहीत. समूहाने शिकार केली नाही तर कोणाचेच पोट भरणार नसते. सर्वांचा फायदा असल्यामुळेच यात समान वाटे स्वीकारले जातात. अशा समूहात प्रमुखाचा शब्द अंतिम असतो. ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ वगैरे भानगडी जगण्याच्या दृष्टीने कुचकामी असतात.
अशा समूहात शेतीचा प्रवेश झाला की जमिनीची मालकी येते. तुकडे पडतात, कुंपण येते. शेती एकेक कुटुंब करत असते, शिकारीप्रमाणे यात समूह एकत्र राहत नाही. फायदा झाला तरी कुटुंबाचा आणि झळ लागली तरी कुटुंबाला. समूहप्रमुखाचे स्वामित्व कमी होते. कुटुंबप्रमुखाचे वाढते.
शेती हा मुख्य व्यवसाय असणार्‍या समूहांमध्ये ज्याची जास्त जमिनीवर मालकी तो बलवान होतो. छोट्या जमिनी असणारे कमी बलवान आणि बिनजमिनीचे दुर्बल होतात. दुर्बलांना आपली जीविका चालवण्यासाठी अतुल्याबलुत्याची भूमिका घ्यावी लागते. जमीनमालकाला या ना त्या प्रकारे सेवा पुरवून त्यातून आपले पोट चालवण्याची त्यांची भूमिका असते. सेवा आणि शेती या परस्परपूरक असतात, तोपर्यंत दोघांचेही भले त्यातून होत असते. फायदा असतो तोवर हीही व्यवस्था टिकते. पण जमीनमालकाच्या गरजेपलीकडे सेवा उपलब्ध असतील, तर सेवेची किंमत कमी होते. सेवा देणार्‍यांचे शोषण सुरू होते. शोषणाने दबून पिचून तसेच जगत राहणे किंवा ती व्यवस्था भेदून बाहेर पडणे असे पर्याय शोषितांच्या हातात उरतात. अशाचवेळी शोषितांचा एखादा द्रष्टा नेता ‘शहराकडे चला’ म्हणतो. 
शहरे हे एक वेगळे जग असते. तिथे समूह नसतो. व्यक्तींची गर्दी असते. त्या गर्दीला स्वत:ची एक ओळख, अस्मिता वगैरे नसते. शिकार आणि शेती व्यवस्थेतल्या समूहांना टिकून राहण्याच्या गरजेतून स्वाभाविकच एक ओळख असते. तसे शहराला नसते. तशी काही अस्मिता तयार झालीच तरी ती कचकड्याची असते. सर्वजण एकेकटे स्पर्धा करत जगतात. जगण्यासाठी त्यांना एकमेकांची गरज नसते. एकमेकांकडून सेवा आणि वस्तू घेण्यासाठी त्यांच्याकडे एक अद्धूत माध्यम असते. या माध्यमाला स्वभाव-संस्कृती वगैरे काही नसते. फक्त रोकडा भाव असतो. ज्याच्या खिशात हे माध्यम खुळखुळते, त्याला काही कमी पडत नाही!
मी राहतो त्या गावात नळाने येणारे पाणी नाही. कुणाच्या घरी लग्न असले की सर्व घरातल्या मुली त्या घरी पाणी भरायला जातात. पुरुषमाणसे मांडव बांधायला, स्वयंपाक करायला, ताडी वाहायला मदत करतात. या कामांसाठी पैशाची अपेक्षा नसते. ‘फक्त माझ्या घरचे लग्न असेल, तेव्हा तुम्ही मदतीला आले पाहिजे’ अशी अपेक्षा असते. लेखी करार नसतो, सामाजिक समंजसपणा असतो. गावातले एक धनको दुकानदार आहेत. त्यांची मुले सरकारी नोकरीत आहेत. घरात पैसा खुळखुळतो आहे. त्यांच्या घरचे लग्न होते, तेव्हा त्यांनी मोटर लावली अन् पाणी भरले. मांडवासाठी कंत्राट दिले. त्यांच्या घरात शहरातले ते अद्धूत माध्यम आले आहे.
आता शहर आणि गाव ही दोन वेगळी ठिकाणे राहिली नाहीत. शहर गावातही आले आहे. गावात शेती आहे, पण व्यवस्था शेतीप्रधान नाही. माणसांचे ‘पोट’ आजही सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाने भरत नाही, ते अन्न आणि पाण्यानेच भरते. पण पिकवणार्‍यापेक्षा विकणारा महत्त्वाचा झाला आहे. उत्पादकतेपेक्षा क्रयशक्तीला महत्त्व आहे.
- हे एक युगांतर आहे. या युगांतरात अनेक गुंतागुंतीची चक्रे आहेत. त्या चक्रांना चालवण्याचा संघर्ष वेगवेगळ्या मानवसमूहांमध्ये होतो आहे आणि होणार आहे. 
शहरे आणि खेडी यांच्यातले आंतरसंबंध निश्‍चित करण्याच्या संघर्षात आपल्या देशात ही चक्रे कशी फिरतील? यात आपलेच बांधव पिळले जातील की सुखरूप निघतील? टिकण्याच्या स्पर्धेतून संघर्ष होईल की समन्वयानेही मार्ग निघेल? -अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सदरातून शोधायची आहेत. 
साकव म्हणजे पूल.
‘आम्ही’ विरुद्ध  ‘तुम्ही’ आणि  ‘शहरे’ विरुद्ध  ‘खेडी’ या आंधळ्या संघर्षाला पर्याय शोधून  ‘सर्वांच्या’ एकत्रित, परस्परपूरक शाश्‍वत प्रगतीकडे नेणार्‍या उत्तरांचे रस्ते नसले तरी पायवाटा जरूर सापडतात. त्या वाटेवरून पुढे गेले तर नवे साकव उभारणे कठीण नाही.
मी ज्या आडबाजूच्या आदिवासी पाड्यात राहातो, तिथून मला दिसणारे जग वेगळे का आहे, हेही थोडे सांगीन म्हणतो. कारण त्या  रोकड्या अनुभवांनीच प्रश्नांची आणि उत्तरांचीही वेगळी बाजू मला दाखवली आहे. 
(ठाणे जिल्ह्यातल्या कोगदा पाटील पाड्यात मुक्कामाला असणारा लेखक आदिवासी युवकांबरोबर काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचा कार्यकर्ता आहे)
(हे सदर दर १५ दिवसांनी प्रसिद्ध होईल.)