- नम्रता फडणीस
‘फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) म्हणजे कलेचा समृद्ध वारसा जपणारी एक प्रतिष्ठित अशी संस्था.. आत्तार्पयत तरी त्याचा इतकाच काय तो परिचय सर्वसामान्यांना होता.. पण, विद्याथ्र्यानी व्यवस्थेच्याच विरोधात पुकारलेल्या आंदोलनाने ही संस्था अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. सगळ्यांच्याच मनात संस्थेसह तेथील विद्याथ्र्याविषयीची उत्सुकता जागृत झाली.. कोण कुठला ‘सी ग्रेड’ अभिनेता.. गजेंद्र चौहान, त्याला एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याचा संबंधच काय? याच प्रश्नावरून विद्याथ्र्यानी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि तब्बल 139 दिवस फक्त आणि फक्त ‘चिंगारी’ पेटवण्याचेच काम केले. महाविद्यालयाचा प्राचार्य कोण असेल, हे विद्याथ्र्यानी ठरवायचे इथपासून ते विद्याथ्र्याना ‘नक्षलवादी’, ‘अँटी सोशालिस्ट’ म्हणण्यार्पयतच्या अनेक घटनांची या आंदोलनात असंख्य आवर्तन झाली.. अगदी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप.. संचालकांना वेठीस धरण्यावरून अटकसत्रचे रंगलेले नाटय़.. इथर्पयत आंदोलनाने मजल मारली. एवढे सगळे घडल्यानंतरही या आंदोलनाची फलश्रुती काय? असा विचार केला, तर उत्तर ‘शून्य’ असेच मिळते. ज्या मूळ मुद्दय़ावरून हे आंदोलन सुरू झाले, त्याच प्रश्नावर आंदोलन मागे घेण्याची नामुष्की ओढवून विद्याथ्र्यानी काय साधले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. या आंदोलनाने कर्मचा:यांच्या नोकरीवर गदा आली.. त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार विद्याथ्र्याना मुळात दिलाच कुणी? यात ‘जय’ शासनाचा की ‘पराजय’ विद्याथ्र्याचा हा मुद्दा खरं तर गौण आहे. प्रश्न आहे तो मानसिकतेचा. या आंदोलनाकडे एक छोटासा दृष्टिक्षेप टाकला, तर लक्षात येते, की अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली बेबंद आयुष्य जगणा:या या विद्याथ्र्याना त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण असणोच अपेक्षित नाही. खरी गोम इथेच आहे. म्हणूनच त्याला विद्याथ्र्यानी जाणीपूर्वक डाव्या-उजव्या विचारसरणीचा रंग दिला. हे आंदोलन म्हणजे दंडेलशाहीने हिंदुत्ववादी विचारधारेची बीजे पसरविण्याचा प्रयत्न करणा:या शासनकत्र्यानाच वेठीस धरण्याचा विद्याथ्र्याचा प्रयत्न होता.. अशी अनेक मतमतांतरे समोर आली. मात्र, इथे एखाद्या मंत्र्याच्या विरोधात नव्हे, तर सत्ताधारी शासनाशी टक्कर होती.. त्यामुळे त्याचे गांभीर्य विद्याथ्र्याना कदाचित कळालेच नव्हते. त्यामुळेच ‘देर आये, दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणो आंदोलनाचा बोरियाबिस्तर गुंडाळण्याची वेळ अखेर विद्याथ्र्यावर आली. या आंदोलनाचा मुळातला वैचारिक पाया बळकट असता, तर चित्र कदाचित वेगळे दिसू शकले असते.. संस्थेत असलेल्या मूलभूत सुखसुविधांचा अभाव.. शैक्षणिक अभ्यासक्रमाला लागणारा अतिरिक्त कालावधी.. या मूलभूत मागण्यांच्या बाजूने आंदोलनाचा प्रवाह वाहणो अपेक्षित होते.. मात्र, चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती रद्द व्हावी, या मागणीवर घोडे अडल्यामुळे शासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. हेच आंदोलनाच्या अपयशाचे मूळ कारण ठरले. या अशा मागण्यांची दखल घ्यायला लागले, तर उद्या कोणीही उठून कुणालाही विरोध दर्शवेल.. जे काहीअंशी चुकीचेच आहे.. देशाची विचारसरणी काय असेल.? तो कसा घडवायचा आहे.? हे ठरविण्याचा अधिकार शासनकत्र्याना असला तरी त्याचा जाब विचारण्याचा हक्क सामान्य नागरिकांना आहे, यात कुणाचेच दुमत नाही.. मात्र, त्यासाठी ‘आंदोलना’चे असे पोकळ टेकू असता कामा नयेत.. कलाक्षेत्रच्या प्रांतात विहार करणा:या या विद्याथ्र्यानी आंदोलनाचे शस्त्र उगारण्यापेक्षा आपल्या कलाकृतींमधून त्याला विरोध करणो हे जास्त सयुक्तिक ठरले असते.. ज्याची उपरती त्यांना उशिरा का होईना झाली असावी. नाही तर न जाणो या आंदोलनाने अजून काय-काय दाखविले असते?