शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘टीसीके’!

By admin | Updated: April 29, 2016 22:08 IST

‘पासपोर्ट कंट्री’ हाच या मुलांचा देश. आज इथे तर उद्या तिथे. ते सगळ्या जगाचे, पण त्यांची स्वत:ची अशी एक जागा नसते.

- सुलक्षणा व:हाडकर
 
‘पासपोर्ट कंट्री’ हाच 
या मुलांचा देश.
आज इथे तर उद्या तिथे. 
ते सगळ्या जगाचे, पण त्यांची 
स्वत:ची अशी एक जागा नसते. 
जगभरात त्यांची मित्रमंडळी असतात. 
दोन-तीन जागतिक भाषा येणो,
त्यातील भाषिक बारकावे समजणो 
ही या मुलांसाठी 
सहजसोपी गोष्ट असते.
जिथे जातील, 
तिथे  मिसळून जातात! 
 
 
टीसीके!
म्हणजे काय?
- थर्ड कल्चर किड्स!
ही एक संकल्पना आहे. ती फक्त मुलांशी निगडित नसून मोठय़ांशीही आहे. याचा सोप्पा सरळ अर्थ म्हणाल तर तुम्ही ज्या देशाचे नागरिक असता तो देश सोडून जेव्हा दुस:या देशात, संस्कृतीत तुम्ही मोठे होता, तिथे अधिक काळ / दीर्घकाळ राहाता त्या संस्कृतीचा प्रभाव तुमच्या जडणघडणीवर होतो, त्या व्यक्तींना किंवा त्या मुलांना तिस:या संस्कृतीतील मुले म्हटले जाते. 
जागतिक खेडय़ाकडे आपल्या सर्वांचा प्रवास चालू आहे त्या टप्प्यावर टीसीके मुले दिवसेंदिवस वाढत आहेत. एक संमिश्र संस्कृती जन्माला येतेय. ओबामासुद्धा ‘टीसीके’ आहेत असे म्हटले जाते. सुप्रसिद्ध पत्रकार क्रिस्टीना अमानपॉर हीसुद्धा ‘टीसीके’ आहे.
सांस्कृतिक मानववंशशास्त्रचा अभ्यास करणारे संशोधक यावर बरेच संशोधन करीत आहेत. आपल्याकडे भारतात या मुलांना सरसकट एनआरआय म्हणून हिणवले जाते किंवा डोक्यावर बसवले जाते. किंवा परकीय संस्कृतीचे आंधळे अनुकरण करणारे, ग्लोबल देसी, हायब्रीड, गोंधळलेले, मूळ हरवलेले, रंग बदलणारे असेही म्हटले जाते.
अर्थात, ‘टीसीके’ ही संज्ञा भारतीयांना किती लागू होते, हा एक वेगळाच विषय! कारण घेटो करून राहण्याची, कुठेही गेले तरी  ‘माङिाये जातीचा मज भेटो कोणी’ यासाठी तळमळण्याची सवय! या मनोवृत्तीमुळे कितीही वेगळ्या वातावरणात / देशात राहात असताना आपल्या आतले भारतीयत्व हट्टाने जपण्याची धडपड सुरू राहाते. भारतीय माणसे भोवतीचे बदल कामापुरते स्वीकारतात, पण मनाने बदलत नाहीत. आपल्याला सोयीचे तेवढेच बदल स्वीकारतात, असे मानले जाते, आणि ते खरेही आहे.  
195क् च्या दरम्यान  ‘टीसीके’ ही सामाजिक संज्ञा वापरली गेली.
स्वत:च्या मुळांचा शोध घेणो ही आदिम प्रेरणा आहे. त्याला कुणीही अपवाद नाही. ‘तुम्ही कुठचे?’ हा प्रश्न कोणत्याही भाषेत तोच अर्थ घेऊन येतो जो विचारण्याला अभिप्रेत असतो. ‘टीसीके’ मुलांना  मात्र या प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर देता येत नाही. ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असे त्यांचे उत्तर असू शकते.
‘नक्की कोणत्या देशाचे नाव घेऊ?’ असा प्रश्नही त्यांच्या मनात उभा राहू शकतो. ‘कोई सरहद न इन्हे रोके’ त्यांची अशी काहीशी अवस्था होऊन जाते. 
भारतीय पासपोर्ट असणारा माझा 15 वर्षांचा मुलगा वयाची आठ वर्षे जपानमध्ये राहिला. दोन वर्षे चीनमध्ये राहिला आणि आता दीड वर्षापासून ब्राझीलमध्ये राहतोय. त्याच्यासाठी भारत म्हणजे त्याच्या जेमतेम एक तृतियांश आयुष्याच्या - फक्त  तीन वर्षाच्या आठवणी आहेत. 
‘तू कुठला?’ असे त्याला विचारले, की तो विचारात पडतो. अवघा पाच वर्षाचा असताना इतर जपानी मुलांप्रमाणो एकटा मुंबई ते जपान विमान प्रवास करून आला होता. तीन वेळेस त्याने एकटय़ाने असा विमान प्रवास केलेला आहे. त्याचे त्याला त्या वयातही काही वाटले नव्हते. कारण त्याच्या आजूबाजूची जपानी मुले असा प्रवास करतातच, हे त्याने अनुभवले होते.
जपानचे परफेक्शन, नम्रता, स्वच्छता, संस्कृती प्रेम, सोफेस्टिकेशन हे त्याला त्याचे स्वत:चे वाटते. त्याची खाद्यसंस्कृती, सुमो खेळणो, फुलांच्या बागा पाहणो ही सगळी सगळी त्याची संस्कृती. चीनमधली भव्यता, अखंड काम करण्याची वृत्ती त्याला आवडते. चीन, जपानमधील ‘कलेक्टिव्हिस्ट कल्चर’ म्हणजे स्वत:पेक्षा स्वत:चे कुटुंब आणि कामाशी बांधिलकी असणो त्याला जवळची वाटते. ब्राझीलचे आनंदी असणो, व्यायाम करणो, मनसोक्त मैदानी खेळ खेळणो, समुद्राचा उपभोग घेणो. हे सगळे आता त्याला प्रिय आहे.
त्याच्या सारख्या 3-4 देशात राहिलेल्या त्याच्या समवयीन मुलांमध्ये हे सगळे गुण मला दिसतात. ही मुले कोणतीही परदेशी भाषा सहा महिन्यात अचूक उच्चाराने बोलायला शिकतात. तिथले लोकल जेवण जेवतात, हवामानाशी समरस होतात. लोकांचे रंग, भाषा, पेहराव, आहार संस्कृती, बदलते नातेसंबंध सगळ्याशी एकरूप होतात. त्यांना ‘क्रॉसकल्चरल अॅस्पेक्ट’ समजतो. दुस:यांना समजून घेण्याची वृत्ती दिसते. जात, धर्म यापेक्षा देश ही ओळख त्यांना पटते. त्यांची बांधिलकी फक्त एका देशाशी राहत नाही, तर जिथे जिथे, ज्या देशात ते राहतात त्या त्या देशाशी ते एकरूप होताना दिसतात.  त्यांना कल्चरल शॉक बसत नाही.
‘टीसीके’ मुलांची स्वत:ची सांस्कृतिक ओळख ठळकपणो दिसत नसली तरी ज्या पाहुण्या देशात ते स्थलांतर करतात तिथल्या सांस्कृतिक जाणिवा  आपल्याशा करतात. या मुलांकडे सांगण्यासाठी खूप काही असते. अगदी दहा वर्षाचा मुलगासुद्धा त्याच्या आयुष्याचे समृद्ध आणि आंतरराष्ट्रीय अनुभव सांगू शकतो. यांच्याकडे कायमस्वरूपी पत्ता नसतो. आज इथे तर उद्या तिथे. ते सगळ्या जगाचे असतात, पण त्यांची स्वत:ची अशी एक जागा नसते. कोणत्याही राजकीय विचारप्रवाहाबद्दल ते तितक्याच स्वतंत्रपणो बोलू शकतात, त्याची मित्रमंडळी जगभरात असतात. त्यांच्या शाळेत किमान पन्नास देशांतील मुले शिकत असतात. जगाचा नकाशा तिथे प्रत्यक्ष चालताबोलताना दिसतो. दोन किंवा तीन जागतिक भाषा येणो, त्यातील भाषिक बारकावे समजणो ही ह्या मुलांसाठी सहज सोप्पी गोष्ट असते.
परदेशात राहताना ही मुले त्यांचा पासपोर्ट ज्या देशाचा आहे, त्या देशाची असतात. पण त्यांच्या मायदेशात सुट्टीसाठी येतात तेव्हा त्यांना उपरेपणा जाणवतो. त्यांच्याशी बोलले तर जाणवते, की  ‘मायभूमी’ या संकल्पनेशी त्यांचे नाते नाही. आपण जिथे जन्मलो त्या देशाला या मुलांच्या भाषेत एक नाव आहे : ‘पासपोर्ट कंट्री’!