- ओंकार करंबेळकर
नवा विचार, नवी कल्पना आणि नवी मांडणी.
अशा नव्या गोष्टींचं स्वागत होतंच.
सरकारनंही उद्योगांच्या बाबतीत या नव्या धोरणाला आता इंधनपुरवठा सुरु केला आहे.
उद्योग काय, आपल्याकडे आधीही स्थापन होत होतेच की. मग आता त्यात असं काय नवीन आलंय, की त्याचा एवढा उदोउदो आणि कौतुक सरू झालंय असंही वाटण्याची शक्यता आहेच.
उद्योगांच्या या नव्या स्मार्ट प्रकाराचं नाव आहे ‘स्टार्टअप’.
स्टार्टअप म्हणजे अशा उद्योगाचा आरंभ जो नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्याची काम करण्याची पद्धतीही अत्यंत नावीन्यपूर्ण अशी आहे.
पारंपरिक उद्योगांचे सर्व मार्ग हाताळून झाल्यावर सध्या जगभरात या स्टार्टअप्सचं युग आलं आहे. भारतातील तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोक:या पाहता भारतालाही या नव्या संकल्पनेपासून फार काळ आणि फार दूर राहणं शक्य नव्हतंच.
त्यामुळेच आपल्याकडेही इतर देशांच्या तुलनेत संथ गतीनं का होईना, पण स्टार्टअप्सकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया- स्टँडअप इंडिया’ची घोषणा केली आणि त्यानुसार 16 जानेवारी रोजी त्यासंबंधीचं धोरणही जाहीर केलं.
बदलत्या काळात नवे रोजगार नव्या उद्योगांमधूनच निर्माण होतील आणि नोक:या मागणा:यांची फौज निर्माण होण्यापेक्षा नोक:या देणारे कसे वाढीस लागतील याकडे सरकारनं लक्ष वेधलं आहे. या धोरणाच्या माध्यमातून नवउद्योग स्थापन करण्यात पूर्वीप्रमाणो येणारे अडथळे आता दूर होतील आणि युवक उद्योगांकडे वळतील अशी अपेक्षा आहे.
इन्स्पेक्टर राजची भीती, करांची डोक्यावर उभी असलेली टांगती तलवार, भांडवल कमतरता, गुंतवणुकीतील अडथळे. यातल्या कोणत्याच कारणामुळे तरुणांची पावलं अडखळू नयेत आणि जास्तीत जास्त संख्येनं तरुणांनी स्टार्टअप्सकडे वळावं यासाठीचा हा जाणीवपूर्वक प्रय}.
आज कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी आपल्या डोळ्यांसमोर नाव येतं ते फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडीलचं. आपल्याला हव्या त्या रोगासाठी हवा तो डॉक्टर शोधून देणारं ‘प्रॅक्टो’सारखं अॅप, मोबाइलवरून घरगुती कामांसाठी माणसं पुरविणारी व्यवस्था, सिनेमाची तिकिटं बुक करणारें अॅप. अशा नवकल्पना सा:यांनाच आकर्षित करताहेत. स्टार्टअप ही आपल्या देशासाठी नवी सुरुवात आहे. 1991 साली लायसन्स राजला दिलेल्या तिलांजलीनंतरही त्याचे काही अवशेष उरले होते, त्या अवशेषांमधून बाहेर पडण्याची आपल्यासाठी ही एक नवी संधी चालून आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी आपल्याला उपलब्ध नाही आणि त्यामध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे स्टार्टअप्स. त्याचाच हा लेखाजोखा.