शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

काही अनुत्तरित प्रश्न.

By admin | Updated: January 23, 2016 15:12 IST

अमेरिकेतले गोरे पोलीस कृष्णवर्णीयांना बघून जास्त सावध का होतात? ते गुन्हेगार आहेत अशी पोलिसांची समजूत का होते? कातडीच्या रंगावरून मनातले ग्रह कळत-नकळत कार्यरत का होतात? - हे पूर्वग्रह पुसण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण का द्यावं लागतंय?.

- शशिकला लेले
 
2014 सालच्या नोव्हेंबरची 22 तारीख. क्लीव्हलंड (ओहायो)मधली हिवाळ्यातली गारठलेली दुपार. 88 किलो वजनाचा आणि 1.70 मीटर उंचीचा, 12 वर्षांचा टामीर (टामीरच्या आकारमानाचं अमेरिकेत नवल वाटत नाही, कारण साधारणपणो कृष्ण्वर्णी लोक अंगा-पिंडानी मजबूत  असतात) आपल्या मोठय़ा भावाबरोबर आणि बहिणीबरोबर घराच्या जवळ असलेल्या कडेला रिक्रि एशन सेंटरमधे गेला. मित्रबरोबर आधी झालेल्या डीलप्रमाणो स्वत:कडच्या दोन मोबाइल फोन्सपैकी एक त्याला देऊन टामीरनी त्याच्याकडून खेळातलं पिस्तूल थोडय़ा वेळाकरता घेतलं. 
वागण्या-बोलण्यात जरा बालिश असलेल्या टामीरची शाळेतली काही आगाऊ मुलं चेष्टामस्करी करीत. त्याला त्रस देत. घरात चार मुलांच्यात टामीर सगळ्यात धाकटा. चारी मुलांचे वडील वेगवेगळे. टामीरच्या वडिलांनी त्याच्या आईला खूप मारहाण केल्याने तिने त्यालाही सोडलंच आहे. आईही ड्रग ट्रॅफिकिंगच्या आरोपामुळे तुरु ंगात जाऊन आलेली आहेच. दारू, अमली पदार्थांचं सेवन, पिस्तूल वापरून खून करणं या आणि अशा त:हेच्या घटना कृष्णवर्णीयांच्या वस्त्यांमधल्या बहुतेक सर्व घरांमधे  (इनर-सिटीमधे) नित्याच्याच! अशा ठिकाणी मोठं होत असताना मुलं सगळं टिपत असतात. गन्स मुलांनी वापरू नयेत म्हणून मोठी माणसं त्या मुलांच्या हाती येणार नाहीत, याची थोडीफार काळजी घेतात. तरी मुलांच्या नजरेतून गन्सची पॉवर निसटलेली नसते. तेव्हा हुबेहुब ख:या गनसारखी दिसणारी गन हाती आल्यावर टामीरला खूपच आनंद झाला. तिथे खेळत असलेल्या काही चिल्ल्या-पिल्ल्यांना गनचा धाक दाखवून झाला. बागेत थोडी-फार माणसं होती. एक जण बाकावर जरा लांब बसला होता. त्याने जरा लांबूनच टामीरला बघितलं, आणि 911ला फोन केला. (ही अशी प्रतिक्रि या अमेरिकन लोकांची अगदी सहज दिसणारी प्रतिक्रि या आहे. सर्वसाधारण अमेरिकन्स आजूबाजूला घडणा:या घटनांच्या बाबतीत नेहमीच दक्ष असतात.) फोन करणा:या गृहस्थाने 911च्या ऑपरेटरला बागेचा पत्ता सांगून सांगितलं, इकडे एक तरुण लोकांवर गनचा नेम धरून गोळ्या घालायच्या विचारात आहे. कदाचित गन खेळातली असेल आणि तरुण माणूस कदाचित लहान मुलगा असेल. ऑपरेटरनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना गृहस्थाने संशयित कृष्णवर्णी असल्याचं सांगून त्याच्या कपडय़ांच्या रंगाची माहितीही दिली. पोलीस ऑफिसर्सना जेव्हा माहिती कळवली गेली, तेव्हा मूळ फोन कॉलमधले दोन महत्त्वाचे डीटेल्स वगळले गेले होते. एक म्हणजे गन कदाचित खेळातली असेल आणि दुसरी म्हणजे गन हातात घेतलेला कदाचित लहान मुलगा असेल. 
 पेट्रोलमन टिमथी लोमन आणि फ्रॅँक गार्मबॅक (दोघं गोरे) बागेच्या जवळच्याच भागात होते. 911च्या ऑपरेटरनी फोन करून बागेचा पत्ता, नाव देऊन सांगितलं, एक ब्लॅक तरुण गन ताणून उभा आहे. बागेतल्या माणसाने फोन करण्यापासून पोलिसांची गाडी बागेत येण्यामधल्या काळात कंटाळून टामीरनी गन शर्टच्या खाली, पॅँटच्या कमरेच्या पट्टय़ात अडकवून टाकली होती. बागेत पोलिसांची सायरन वाजवीत येणारी गाडी बघून क्षणभर टामीर बावचळून बघतच राहिला. दुस:याच क्षणी गाडी त्याच्या जवळ आली. गाडी पूर्ण थांबायच्या आधीच ऑफिसर लोमन टामीरला दोन्ही हात वर करायला सांगत होता. टामीर गोंधळला, पण दुस:याच क्षणी त्याला कळलं की ऑफिसर त्याच्याकडच्या गनवरून संशय घेतो आहे. शर्टाच्या आत पॅँटच्या कमरेच्या पट्टय़ात अडकवलेली गन बाहेर काढायचा टामीरचा प्रयत्न पुरा मात्र झाला नाही. लोमनच्या गोळ्यांनी टामीर प्लॅस्टिकच्या गोळ्या असलेल्या खेळातल्या गनसह खाली कोसळला.. 
टामीरच्या मृत्यूमुळे कितीतरी अनुत्तरित प्रश्न पुन्हा नव्यानं उभे राहिले आहेत. 
गेल्या दोन वर्षात गो:या पोलिसांनी काळ्या गुन्हेगारांवर केलेल्या अत्याचारांमुळे अमेरिकन समाजाला अस्वस्थ केलेलं आहे. एक नजर आकडेवारीवर टाकली, तर असं दिसतं की अमेरिकेच्या लोकसंख्येत 13 टक्के लोक कृष्णवर्णी, 63 टक्के लोक गोरे, 17 टक्के हिस्पॅनिक आणि उरलेले 7 टक्के इतर (एशियन वगैरे). परंतु अमेरिकेतल्या सगळ्या गुन्ह्यांपैकी अर्धे गुन्हे कृष्ण्वर्णीयांच्या नावांवर नोंदवले गेले आहेत. गुन्हेगारांना अटक करताना गोरे पोलीस नको तितका फोर्स (जो ब:याच वेळा गुन्हेगाराकरता जीवघेणा होतो) वापरतात. नि:शस्त्र कृष्ण्वर्णी गुन्हेगारांवर होणा:या अत्याचारांना वाचा फोडण्याच्या उद्देशानं कृष्णवर्णीयांनी ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ नावाची चळवळ सुरू केली आहे. 
अमेरिकेतली गुन्हेगारी, कृष्ण्वर्णीयांच्या समस्या, गो:या पोलिसांनी गेल्या दोन-अडीच वर्षात नि:शस्त्र, कृष्णवर्णी गुन्हेगारांवर केलेले अत्याचार या सर्वांची सध्या मीडियामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. 
पोलीस (जास्तीकरून गोरे) काहीही हत्त्यार नसलेल्या कृष्णवर्णीयांना बघून जास्ती सावध का होतात (त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा ते गुन्हा करणार आहेत अशी पोलिसांची समजूत का होते) या विषयाला धरून केलेले लिखाण अलीकडे बरंच वाचायला मिळतं. विचारवंत म्हणतात, कुणालाही शिक्षा देताना माणसांच्या कातडीच्या रंगावरून मनात पाळलेले ग्रह कळत, नकळत काम करत असतात. वर्णविद्वेषाच्या या सुप्तावस्थेतल्या मुळांना इंप्लिसिट बायस (सुप्त पूर्वग्रह) असं म्हणतात. 
या पूर्वग्रहाचे दुष्परिणाम पोलिसांचा नि:शस्त्र कृष्णवर्णीय गुन्हेगारावर संशय घेणो, संशयितांवर बळाचा अतिरिक्त वापर करणो यात दिसतात. आपला जीव वाचवण्यासाठी संशयावरून समोरच्या नि:शस्त्र गुन्हेगारावर बंदुकीचा वापर करायची परवानगी पोलिसांना असते. परंतु असा संशय पोलिसांच्या मनात येतो त्याला कारण मात्र कृष्णवर्णीयांबद्दलचा मनात बाळगलेला पूर्वग्रह असतो. या पूर्वग्रहाचं निर्मूलन करणं हा पोलीस ट्रेनिंगचा फार महत्त्वाचा भाग असतो. 
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोमध्ये एका रीसर्चमध्ये एका गुन्ह्याच्या ठिकाणी एक तरुण कृष्णवर्णी इसम आणि एक गोरी, वृद्ध महिला यांना संशयित आरोपी म्हणून उभं केलं. पोलिसांची संशयाची सुई तरुण इसमावरच गेली. याचं कारण अर्थातच पूर्वग्रह. 1क् वर्षांचा गोरा मुलगा जरी निष्पाप म्हणून बघितला जातो, तरी त्याच वयाचा कृष्णवर्णी मुलगा पोलिसांना निष्पाप वाटत नाही. (काही अंशी हे कृष्ण्वर्णी मुलांच्या खूप मोठय़ा आकारमानामुळेही होते.) पोलिसांना रंग- रूपाला जोडलेले पूर्वग्रह मनातून काढून टाकण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग (अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये) देण्यास सुरु वात झाली आहे. कृष्णवर्णी पोलीस अधिका:यांनीही या  पूर्वग्रहाविषयी कबुली दिली आहे. नील फ्रॅँक्लीन हा स्वत: कृष्णवर्णी पोलीस अधिकारी 34 वर्षांच्या नोकरीनंतर रिटायर झाला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की पोलिसांना पूर्वग्रह काढून टाकण्याकरता ट्रेनिंग दिलं की सगळं सुरळीत होईल हा आपला भ्रम आहे. फेडरल गव्हर्नमेंटकडून प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटला जास्तीत जास्त पैसा हवा असतो. दंड वसुली करून जास्तीत जास्त पैसा प्रत्येक ब्रॅँच ऑफिसला मिळवावाच लागतो. 
दंड वसुलीचं सगळ्यात सोयीचं ठिकाण म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटी. या वस्त्यांमध्ये राजकीय आणि आर्थिक - दोन्ही पॉवर्सचा अभाव असतो. ही एक त:हेची कृष्णवर्णीयांची आर्थिक पिळवणूकच आहे. याला सगळ्यात जास्त जबाबदार मात्र ते स्वत:च आहेत. 
परिस्थितीवर मात करत स्वत:ची उन्नती करणं हे आव्हान जरी मोठं असलं, तरी अशक्य नाही हे बराक आणि मिशेल ओबामांनी त्यांना आपल्या उदाहरणांनी दाखवून दिलेलं नाही का?
(लेखिका अमेरिकास्थित निवृत्त शिक्षिका आहेत.)
naupada@yahoo.com