- तीन लेखांच्या मालिकेच्या समारोपाचे निरूपण
डॉ. रामचंद्र देखणे
पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. विठाई माउलीच्या दर्शनातच सर्व सुख मानणा:या सकल संतांनी श्रीविठ्ठलाला माउलीरूपात पाहिले आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून माउलीरूपातच अनुभवले. धर्म, पंथ, संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून अद्वैताच्या भूमिकेतून या लोकदेवतेला स्वीकारले. ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली विठाई माउली आपल्या सा:या भक्तांना माहेरपण देत राहिली. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर मानून पंढरपुरी माहेर अनुभवावे हे स्वाभाविक आहे.
माङो माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तिरी।
असे अभिमानाने सांगत पंढरपूरच्या ठायी माहेरपणाचे भावनिक नाते जोडले आहे आणि अभंगवाणीच्या शब्दवैभवाने पंढरीला तसेच पंढरीनाथाला सारस्वतात मिरविले आहे. तुकोबाराय म्हणतात -
आनंद अद्वय नित्य निरामय।
जे का निजध्येय योगियांचे।
आनंदरूप, नित्य, निरूपाधिक, शुद्ध आणि योगीही ज्याचे ध्यान करतात, तेच सावळे सुंदर रूप भीमातीरी विठ्ठलरूपात उभे आहे आणि हेच विठ्ठलाचे श्रुतिसिद्ध लक्षण आहे. पंढरीचा विठ्ठल हे साक्षात परमब्रह्म म्हणजे अविनाशी, ब्रह्म म्हणजे बृहत्तम होणो, व्यापक होणो, वैश्विक होणो. जशी ज्ञानभक्तीच्या समचरणावर ही सावळी विठ्ठलमूर्ती उभी आहे, तसे सद्विचार आणि सदाचार याच्याही समचरणावर हे विश्वकल्याणाचे मूर्तरूप पंढरपुरी विठ्ठलाच्या रूपात साकारले आहे. याच वाळवंटात नामसंकीर्तनाने सर्वानी एकात्मतेचा आविष्कार घडविला. वर्ण, अभिमान, उच्च-नीचपणा संपवून सर्वानीच समतेची अनुभूती घेतली आणि वैश्विक समतेचे रूप म्हणून पांडुरंगाकडे पाहिले म्हणून साने गुरुजी म्हणतात, ‘पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्रीय जनशक्तीचा मुका अध्यक्ष’. प्रेमाची कृष्णछटा आणि ज्ञानाची शुक्लछटा, म्हणजे ज्ञान आणि प्रेम याच्या एकवटण्याने जो रंग उभा राहतो, तीच पांडुरंगाची सावळी कांती होय. हा पांडुरंग आपल्या भक्तांना स्वच्छ जीवनकांती देण्यासाठी उभा आहे. पांडुरंगाची ही कांती पाहून ज्ञानदेव हरखून गेले आणि म्हणू लागले -
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळ फाकती प्रभा।।
पंढरपूर आणि विठ्ठल हेच संतांनी आपल्या अभंगरचनेचे साध्य समजले. आपल्या अभंगरचनेने विटेवरच्या सावळ्या शिळेतून चैतन्याचे मळे फुलविले आणि त्याच्या सुगंधाने मराठी मनाचे गाभारे दरवळून गेले. ज्ञानदेवांच्या भावविश्वातील विठ्ठल हा सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. तो दृश्यही आहे, अदृश्यही आहे. तो स्थूलही आहे आणि सूक्ष्मही आहे. तो अनुमान प्रमाणाच्या पलीकडचा आहे. ज्ञानदेवाचा विठ्ठल हा द्वैताद्वैताच्याही पलीकडचा आहे. तत्त्वचिंतक त्याच्या निगरुण तत्त्वाचे ज्ञानचिंतन घडवतात; पण वैष्णव मात्र त्याच्या सगुण दर्शनासाठी आर्त असतो. ज्ञानदेव म्हणतात -
द्वैत दुजे सांडी एक तत्त्व मांडी।
अद्वैत ब्रrांडी पै सुकीजे।।
ते रूप पंढरी पुंडलिकाद्वारी।
मुक्ती मार्ग चारी वश्य तया।।
अद्वैताच्या भूमिकेतूनही परमात्म्याचे रूप उभे करताना ज्ञानदेव द्वैतात येतात आणि द्वैतभावनेने अद्वैताचे सगुणरूप मांडतात. त्यांचा पांडुरंग जसा गुणरूपधारी आहे, तत्त्वरूपधारी आहे, तसा तो लीलारूपधारी आहे. ज्ञानदेव हे भक्तिमंदिराचे प्रवर्तक, तर नामदेवराय हे त्याच भागवत धर्माचे प्रवर्धक . आपल्या पांडुरंगभक्तीला नामदेवरायांनी मातृभक्तीचे अधिष्ठान दिले. योगिया दुर्लभ असलेले, ध्यानालाही न आतुडणारे, अगम्य परतत्त्व नामदेवांच्या आर्तभावाने पराजित केले आणि आपला सारा मोठेपणा विसरून आई बनून ते नामदेवरायाकडे ङोपावले.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल।।
असे म्हणत नामदेवरायांचे साधनही विठ्ठल झाले आणि साध्यही विठ्ठलच, तर संत एकनाथ महाराजांनी लोकसंग्रहाच्या भूमिकेतून श्रीविठ्ठलाला लोकसमन्वयाचे प्रतीक मानले. सगुण साकार सावळे परब्रrा विठ्ठलाच्या रूपात समोर विटेवर उभे असलेल्या आनंदात संत एकनाथांचे अवघे पारमार्थिक भावजीवन सुस्नात होऊन निघाले. पंढरी आणि पांडुरंग यांच्याशी अभेद्य नाते जोडत नाथांनी माहेरचे रूपक उभे केले. ब्रrानंदाच्या दिव्य दृष्टीने चिन्मयावस्था प्राप्त झालेल्या तुकोबारायांचा आत्मा विश्वाकार झाला. ‘अहंसोहं ब्रrा आकळले’ अशी अवस्था प्राप्त झाली आणि
‘कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा झाला पंढरीनाथ।’ अशी अनुभूती आली आणि ते स्वत:च पांडुरंगमय झाले. संत नामदेवांच्या संगतीत लडिवाळ प्रेमाने विठ्ठलाला आळवणा:या संत जनाबाईने
धरिला पंढरीचा चोर।
गळा बांधोनिया दोर।।
असे म्हणत, हृदयाचा बंदिखाना करून, सोहं शब्दाचा मारा करून नामाच्या दोराने घट्ट बांधून त्याला आपल्या हृदयातच बंदिवान करून टाकले. तर सावतोबांनी - ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।’ असे म्हणत म्हणत शेतमळा पिकवितानाच भक्तीचाही मळा फुलविला.
संतवाणीच्या विलक्षण प्रभावाने ज्ञान, प्रेम, तत्त्व आणि भाव-दर्शनाने विठ्ठल हा महाराष्ट्राच्या जनमानसाला ख:या अर्थाने ज्ञात झाला, तर लोकवाणीच्या प्रभावाने लोकमानसाने आपलासा केला. लोकवाणीतील ओव्या, लोकगीते, लोककथा यातून उभे राहिलेले विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर हा महाराष्ट्राचा खरा लोकदेव आहे आणि मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे, हे लक्षात येते. लोकवाणीतील विठ्ठलवर्णनात सहजता आहे. स्वाभाविकता आहे. कुठेही कृत्रिमता नाही. विठ्ठल, रुक्मिणी, पंढरपूर, पुंडलीक, भक्तगण, साधुसंत, ¨दडय़ा-पताका, दिंडीरवन, गरुडखांब, चंद्रभागेचे वाळवंट, तुळस, बुक्क्याची आवड, रुक्मिणीचं रुसणं, देवाचं हसणं या सा:या गोष्टी भावदर्शनार्थ लोकसाहित्यात येतात आणि युगानुयुगे विटेवर उभा राहिलेला विठ्ठल, त्यातील भावदर्शनाने खूपच जवळ येतो.
पंढरपुरामध्ये आषाढीला-कार्तिकीला खूप मोठी यात्र भरते. सगळीकडे माणसंच माणसं. वारकरी, पताका, पडशी, टाळ-मृदंगाचा गजर. मग विठ्ठलाला शोधायचं कुठं? एक खेडूत स्त्री जवळच्या बाईला विचारते -
पंढरपुरामंदी देवाची कंची आळी।
इट्टलदेव बोले, दारी बुक्याची रांगोळी।।
बुक्क्याची रांगोळी ज्या दारात, ती विठ्ठलाची आळी. आळंदीहून निघालेली पालखी, अद्वैताच्या महाद्वारात स्थिरावते. हे अद्वैत केवळ सांगायचे नाही, तर कृतीत उतरावयाचे आहे. खरेतर, अद्वैत कृतीत उतरविणो म्हणजेच अध्यात्म होय. सारा भेद मावळून पंढरीनाथाच्या ठायी अद्वैत कसं उभं राहतं, हे सांगताना एक खेडूत वारकरी म्हणतो -
असं आपुन तिरथं करू वारंवार।
हितं देवासंग जेवतो चोखा महार।।
सावता माळी घाली फुलांचा हार।
देवाचे सोयरे निघाले,
खांद्यावर पताकांचा भार।।
जनलोकांचा पांडुरंग जनलोकांचाच सगा-सोयरा झाला आणि भागवत धर्माच्या ङोंडय़ाखाली सर्व समाज एकवटला. संतसाहित्यातील ग्रंथाच्या प्रबंधरचनेपासून प्रासादिक अभंगरचनेर्पयत, संशोधकांच्या शोधप्रबंधापासून लोकगीतांर्पयत, कीर्तनरंगापासून लोकरंगार्पयत ‘पंढरीचा पांडुरंग’ हा सर्वाच्या प्रतिभेचे लक्ष्य ठरला आहे. शाहीर वरदी परशरामाने तर पंढरीनाथाची लावणी लिहिली आहे-
साक्षात पंढरी देव दिगांबर मूर्ती।
जनमूढा तारितो रोकड तुर्तातुर्ती।।
असे वर्णन करीत शाहीर परशरामाने लावणीतून पांडुरंगाचे लीलादर्शन मांडले आहे. लावणीच्या लावण्यालाही प्रासादिकतेचा स्पर्श देण्याचे सामथ्र्य पंढरीनाथाच्या गुणवर्णनात आहे. ज्ञानमूर्ती असणारा पांडुरंग भावमूर्ती होऊन लोकवाणीतून प्रगटतो आणि परब्रrाच भावरूप अवस्थेला येऊन लोकमानसाशी बोलू लागते. पांडुरंगाशी सांधलेला हा लोकभावनेचा महापूर म्हणजेच पंढरीची वारी होय.
(लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.)