शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून केरळच्या वेशीवर! आज कोणत्याही क्षणी दाखल होणार; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
6
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
7
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
8
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
9
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
10
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
11
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
12
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
13
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
14
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
16
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
17
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
18
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
19
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
20
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच

उडती नजर

By admin | Updated: July 18, 2015 13:55 IST

‘थ्री इडियट्स’मध्ये आमीर खानने उडवलेला ड्रोन सगळ्यांनी नवलाने पाहिला होता, पण त्याच्या कितीतरी आधी भारतात या ‘उडत्या खेळण्या’चा लपूनछपून वापर करून पाहणारे क्रेझी लोक होते.. आणि आता तर ही क्रेझ भलतीच वाढली आहे! - आता प्रतीक्षा आहे, ती नियम-निश्चितीची!

- पवन देशपांडे
 
 
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर काही तासांतच चार पंख असलेलं एक खेळणं भुर्र्र भुर्र्र करत वर गेलं. कॅमेरा घेऊन हवेत उडालं. त्यानं जे टिपलं ते भयावह होतं. त्याआधी कुणालाही न दिसलेलं, जाणवलेलं. कारण भूकंपाचा विध्वंस इतका भयानक होता, की नेमकी परिस्थिती काय आहे हे समजण्यासाठी ना कुणी माणूस आतवर पोचू शकत होता, ना कुठली लष्करी तुकडी! 
नजरेच्या टप्प्यापलीकडे असलेले ढिगारे ओलांडून नक्की काय घडलं आहे अणि नुकसानीचं स्वरूप किती खोलवर आहे, हे पहिल्यांदा शोधून काढलं ते एका उडत्या खेळण्याने!
कॅमेरा पोटाशी बांधून हवेत ङोपावलेलं ते खेळणं होतं ‘ड्रोन’ (इंग्रजीत त्याला अनमॅनड् एरिअल व्हेहिकल असंही म्हणतात). 
अगदी ‘दीड फूट बाय दीड फूट’ अशा चौकोनी आकाराचं. तुम्ही त्याला हवं तर मानवविरहित छोटं हेलिकॉप्टर म्हणू शकता. रिमोटवर चालणारं. 
भूकंप झाल्याला चोवीस तास उलटत नाहीत, तोच भारताचं मदत पथक नेपाळमध्ये पोचलं होतं आणि याच पथकाद्वारे ड्रोनचा वापर करण्याचा विचार झाला तोही भीषण स्थिती नजरेच्या टप्प्यात येऊन मदतकार्याला वेग देता येईल या उद्देशानं. 
आपल्यासाठी ड्रोन हा शब्द खरं तर शत्रुराष्ट्रावर वा दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवण्यासाठीचं अस्त्र म्हणून माहीत होता. पाकिस्तानात, अफगाणिस्तानात आणि आता इराक/सीरियात धुमाकूळ घालणा:या दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने याचा मोठय़ा प्रमाणात वापर चालवला आहे. 
पण ड्रोन छोटय़ा स्वरूपाचंही असतं अन् ते आपल्यासारख्यांनाही वापरता येतं, याचा साक्षात्कार घडवला तो ‘ऑल इज वेल’ म्हणत नाचणा:या थ्री-इडियट्समधल्या आमीरनं. त्या चित्रपटात दाखवलेला आणि आताच्या टीव्हीवरच्या एका जाहिरातील अंडी घेऊन उडत येणारा ड्रोन किती उपयोगी आहे, हे आता सा:यांनाच कळू लागलंय. शिवाय त्याची क्रेझही वाढतेय. 
केवळ आपत्तीच्या काळात वापर केला जाईल असं नाही, तर आता लोकांर्पयत एका वेगळ्या अँगलनं दृश्य रूपात एखादं ठिकाण पोहोचण्याचं, वस्तू पोहोचवण्याचं साधन म्हणून ड्रोनकडे पाहिलं जाऊ लागलंय. 
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेचं चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन वापरण्यात आला होता. एका चॅनलनं हा प्रयोग करून पाहिला. तो भारतात किती यशस्वी झाला याबाबत मतप्रवाह असू शकतात, पण अशा प्रकारच्या ड्रोन जर्नालिझमची सुरुवात आता झाली आहे. विदेशात तर अशा प्रकारचं खास शिक्षणही दिलं जातं.
दुसरीकडं याचाच वापर फिल्म आणि अॅडव्हर्टायङिांग क्षेत्रतही होऊ लागला आहे. ड्रोन वापराची माहिती असणारे प्रेशीत जोशी म्हणतात,  ‘‘ड्रोनचा वापर म्हणावा तेवढा सोपा नाही. पण भारतात खासकरून मुंबईत त्याचा ट्रेंड वाढतो आहे. अनेक क्षेत्रत ड्रोन वापरला जातोय. चित्रीकरणासाठी याचा सध्या मोठा उपयोग होतोय. लगAकार्यामध्ये व्हिडीओ शूटिंगसाठीही छुप्या पद्धतीनं ड्रोन वापरलं जातंय. पण ते हाताळणं सोपं नाही. त्यासाठी अनेकदा प्रयत्न करावा लागतो, सराव असावा लागतो. तो असेल तरच फोटोग्राफी अन् व्हिडीओग्राफीचे रिझल्ट्स चांगले पाहायला मिळतात.’’ 
मुंबई आणि पुण्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या कबड्डी सामन्यातही ड्रोन कॅमे:यांचा वापर करण्यात आला होता. पण हा झाला कॅमेरा आणि चित्रीकरणापुरता वापर. 
याच उपकरणाचा आणखी एक उत्तम वापर म्हणजे एखाद्या वस्तूची होम डिलिव्हरी. 
काही वर्षापूर्वी मुंबईत एका कंपनीनं ड्रोनद्वारे पिङझा घरपोच केला होता. त्याचा व्हिडीओ कंपनीनं यूटय़ूबवर जारीही केला. पण त्यानंतर हे सारंच नियमांमध्ये अडकलं अन् मुंबईतल्या ड्रोनच्या उपयोगितेबद्दलही शंका घेतली जाऊ लागली. कारण मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील इमारतींची संख्या, त्यांची घनता, फ्लॅट सिस्टिम आणि घरात ड्रोन पोहोचवण्याची अशक्यता असे सारेच प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यामुळे मुंबईतील अशा प्रकारच्या पिङझा डिलिव्हरी अजूनतरी स्वप्नवतच राहिल्या आहेत. 
 
परदेशात अॅमेझोन या ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रतील दिग्गज कंपनीनं काही वर्षापूर्वी असाच एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात अॅमेझोननं ग्राहकानं ऑनलाइन खरेदी केलेलं ‘टूल’ थेट त्यांच्या दारात ड्रोनच्या माध्यमातून पुरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. अॅमेझोननं या कामासाठी खास ‘अॅमेझोन प्राइम एअर’ ही उपकंपनीही सुरू केली. पण हे सारं काम करण्यात अॅमेझोनपुढेही परवान्यांचे अडथळे आले. अमेरिकेनं अॅमेझोनला 4क्क् मीटर उंचीर्पयत आणि 161 किलोमीटर प्रतितास अशा वेगानं ड्रोन उडवण्याची परवानगी देऊ केल्याचं कळतंय. पण प्रत्यक्षात अॅमेझोनचं काम अजूनही वेगात आलेलं नाही. पण भविष्यात परदेशात का होईना अशा प्रकारे वस्तूंची डिलिव्हरी नक्कीच केली जाईल. 
भारतात मात्र कोणत्याही प्रकारच्या ड्रोन वापराला सध्यातरी बंदी आहे. मुंबईत पोलिसांनी नुकतंच नव्यानं पत्रक काढून ही बंदी अधिक कठोरपणो लादली आहे. त्याला कारण आहे, सुरक्षेचं. भारतावर टपून असलेले दहशतवादी या खेळण्याचा वापर करून सहज कोणत्याही शहराची रेकी करू शकतील, अशी सा:यांनाच भीती आहे आणि ती रास्तही आहे. कारण जमिनीवरून रेकी करणा:यांना आपल्याकडे ओळखता येत नाही, त्यांच्यावर पाळत ठेवता येत नाही, तर अशा कोण कुठून उडवत असलेल्या आणि हवी ती दृश्य टिपत असलेल्या ड्रोनवर कोण आणि कशा प्रकारे लक्ष्य ठेवू शकेल?
नागरी विमान उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) गेल्या वर्षी ऑक्टोबर (2क्14) महिन्यात भारतात परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी घातली. कोणत्याही बिगर सरकारी संस्थेस, कोणत्याही व्यक्तीस हवेत ड्रोन उडवता येणार नाही, अशी कडक तंबी डीजीसीएनं दिली आहे. 
कारण तेच ! 
राष्ट्रीय सुरक्षेचं आणि विमान अपघातांचं.
ड्रोन तयार करण्याचे काही मापदंड ठरलेले नाहीत. शिवाय कोणकोणत्या परवानग्या आवश्यक असतात, त्याचं प्रशिक्षण कुठं मिळतं अशा सा:यांचाच पत्ता नाही. त्यातच विमानतळ असणा:या शहरांत जर असे ड्रोन उडू लागले तर अपघातांची शक्यता वाढण्याची भीती आहेच. ड्रोनसाठी उंचीचे सध्यातरी कुठे नियम नाहीत. अशा वातावरणात ड्रोन वापरू देणं योग्य नसल्याचं डीजीसीएचं म्हणणं आहे.
आणखी एक घातक गोष्ट म्हणजे, दहशतवादी त्यांच्या फायद्यासाठी अशा ड्रोनचा वापर करून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकतात. ते आपल्या अत्यंत संवेदनशील परिसराची ड्रोनद्वारे टेहळणी करू शकतात, गुप्त माहिती मिळवू शकतात. ते जर टाळायचं असेल तर नियम होईर्पयत त्यावर बंदी घालणंच चांगलं, असा विचार डीजीसीएनं केला असावा. झालं ते योग्य झालंच. 
परंतु, डीजीसीए एवढय़ावरच थांबली नाही. त्यांनी ड्रोन वापरासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियमांचा विचार सुरू केला आहे. भारतात ड्रोनसारखं तंत्रज्ञान वापरू इच्छिणा:या क्रेझी लोकांसाठी ही एक सुखद गोष्ट म्हणावी लागेल.
अर्थात, अजून तरी ड्रोनची विक्री आणि उत्पादन प्राथमिक स्तरावरच सुरू आहे. कारण ड्रोन वापराचं खास असं प्रशिक्षण दिलं जात नाही. उड्डाणाची परवानगीच नसल्यानं ड्रोन तयार करणा:या कंपन्याही फारशा पुढे येत नाहीत, असं भारतातलं चित्र आहे. 
तरीही भारतात ड्रोनची क्रेझ वाढतेय हे नक्की. कारण स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटने जारी केलेले जगभरातील ड्रोन विक्रीचे आकडे पाहिले तर अमेरिकेलाही भारतानं मागे सोडल्याचं दिसून येतं. गेल्या वर्षार्पयत जगभरात पंधराशेहून अधिक ड्रोनची विक्री झाली आहे. त्यातली 22.5 टक्के विक्री भारतात झाली. ही केवळ वरवर दिसणारी आकडेवारी. छुप्या पद्धतीने ड्रोन विकत घेऊन ते अनधिकृतपणो वापरणारे अनेक जण आहेतच. अशा लोकांचीच संख्या मोठी असावी. कारण ड्रोन हे एक खास उद्योगक्षेत्र बनू पाहत आहे आणि त्याची वार्षिक उलाढाल अब्जावधीच्या घरात पोहोचली आहे. येत्या काही वर्षात ती आणखी वाढेल, याबाबत ड्रोन तयार करणा:या कंपन्यांच्या मनात तीळमात्र शंका नाही. पण या उद्योग वाढीसाठी आवश्यक असेल ते ड्रोन वापराचे नियम, त्याचं रीतसर शिक्षण आणि डीआरडीओची परवानगी. 
नियमांचं आकाश मोकळं मिळालं की भारतात विमानांसारखेच असंख्य ड्रोन उडताना दिसतील. आकाशातले हे डोळे तुमच्या-आमच्यावर नजर ठेवून असतील.. दंगली घडवणा:यांचे मनसुबे धुळीस मिळवतील अन् अपघात, नैसर्गिक आपत्तींसारख्या अडचणीत सापडलेल्या असंख्य गरजूंना मदतही करतील.. अगदी लग्नसोहळा टिपत थाटानं उडतील. 
 
- कॅमेरा लावून त्याद्वारे लाइव्ह चित्र पाहिलं जाऊ शकतं. एखादी छोटी-कमी वजनाची वस्तू वाहून नेली जाऊ शकते. 
 सरळ रेषेत ङोप घेऊ शकतं. हेलिकॉप्टरसारखं उडू शकतं. जीपीएसद्वारे त्याची दिशा ठरवली जाऊ शकते. एखाद्या ठिकाणाची माहिती त्यात साठवल्यास त्या ठिकाणी जाऊन परत येऊ शकतं. 
 ड्रोनमधील सॉफ्टवेअर रिमोटशी जोडलेलं असतं. त्याद्वारे कोणत्या फॅनला किती ऊर्जा हवी, हे त्याच्या वेग आणि दिशेच्या दृष्टीनं ठरवतं. 
 ड्रोन हवेत असतानाच त्यानं टिपलेली दृश्य पाहता येतात.
 
 
वापराचे मार्ग आणि प्रकार 
लष्करात वापरले जाणारे अस्त्रवाहू ड्रोन
 
- शत्रूवर मानवरहित विमानातून हल्ले करणारं  साधन म्हणजेच ड्रोन. अमेरिका अशा प्रकारचे ड्रोन हल्ले करण्यात अग्रेसर आहे.
 
वस्तूची डिलिव्हरी करणारे ड्रोन
 
- एखादी वस्तू दुस:या ठिकाणी पोहचवण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन. अॅमेझॉन या कंपनीनं याचा प्रयोग केला आहे. आता फक्त नियामक परवानगीची गरज आहे. 
 
खेळण्याच्या आकाराचे 
छोटे-छोटे ड्रोन
 
-  किडे, पक्षी, फुलपाखरू अशा आकाराचेही ड्रोन बनविले जातात. त्याचा वापर नजर ठेवण्यासाठी केला जातो. छायाचित्रण करणारे ड्रोन
 
- या प्रकारातील ड्रोन कॅमेरा घेऊन आकाशात ङोप घेतात. हव्या त्या अँगलने या ड्रोनद्वारे चित्रण केलं जाऊ शकतं.
 
मदत पोहोचवणारे ड्रोन
 
- आपत्तीकाळात लोकांर्पयत छोटय़ा स्वरूपात खाण्यापिण्याचं सामान पोहोचवण्यासाठी अशा ड्रोनचा वापर होतो. 
 
अॅम्ब्युलन्स ड्रोन
 
- महापूर, भूकंप यासारख्या आपत्कालीन स्थितीत औषधींची तातडीने वाहतूक करून अन्य मार्गे दुर्धर अशा ठिकाणी पोचायचं पडल्यास अशा अॅम्ब्युलन्स ड्रोनचा वापर केला जातो.
 
..उडणार का?
 
 जगभरातल्या इतर देशांमध्ये ड्रोनच्या वापराविषयी काय नियम आहेत?
 भारत सरकारच्या सुरक्षा यंत्रणा
याविषयी कोणता आराखडा करत आहेत?
 भारतात ड्रोनच्या सरसकट वापराला
परवानगी मिळू शकते का?
 दहशतवादी गटांच्या हाती हे तंत्रज्ञान गेल्याने उद्भवणारे धोके
 
उत्तरार्ध : 
मंथन, रविवार दि. 26 जुलै
 
 
इस्त्रायलची आघाडी
 
जगभरात ड्रोन पुरवठा करण्यात इस्नयल आघाडीवर आहे. गेल्या तीस वर्षातील आकडेवारी पाहिली तर इस्त्रायलने एकूण विक्रीच्या 60 टक्के ड्रोनची विक्री जगभरात केली आहे. 
भारतातही पहिला ड्रोन 1998 साली इस्नयलमधूनच आयात करण्यात आला होता. तेव्हापासून भारतातच मोठय़ा प्रमाणात ड्रोनची मागणी आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)