मुक्त अर्थव्यवस्थेची दारं किलकिलीही झाली नव्हती, तो लालफितीचा एक काळ. ज्या काळात दूरध्वनी मिळवण्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी असायची! उद्योग करणं आणि धंद्यात पडणं
या दोन्ही गोष्टींना समाजात कायम नकारच, त्या काळात अफाट जिद्दीनं डॉ. आनंद देशपांडे
यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील ‘पर्सिस्टण्ट’ कंपनीची पायाभरणी केली आणि आज यशस्वी वाटचालीसोबतच ते अनेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन, पाठबळ देत आहेत. त्यांच्याशी हा एक विशेष संवाद.
डॉ. आनंद देशपांडे
खांत बळ असणा:या, स्वपAं पाहणा:या आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आसुसलेल्या युवा वर्गासाठी स्टार्टअप्स म्हणजे आशेची भरलेली पोतडीच. ज्यांना काहीतरी करायचं आहे, करून बघायचं आहे आणि अंगातल्या ऊर्मी अन् ऊर्जेला नवकल्पनेची जोड देऊन भरारी घ्यायची दुर्दम्य आकांक्षा आहे असे अनेक तरुण आज स्टार्टअप्सकडे वळताहेत.
पण स्टार्टअप किंवा काहीही नवं सुरू करायचं म्हटलं की निधीचं, पैशाचं काय हे प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतातच. पण प्रत्येक वेळी पैशांअभावीच तुमचं गाडं अडतं असं नाही, तुमच्या कल्पनेत जर दम असेल तर तुमची कल्पना हीच तुमचं सर्वात मोठं भांडवल असतं. केवळ पैसा उभा करणं म्हणजे व्यवसाय नव्हे, माङया मते व्यवसायाचा खरा अर्थ एखाद्या समस्येवर तोडगा काढणं.
तुमची कल्पना आश्वासक असेल आणि त्यामध्ये समस्या सोडविणारं लोकोपयोगी उत्तर दिसत असेल तर मदत करणारे हात आपोआपच्या आपल्या पाठीशी उभे राहतात.
मुळात चुकतं कुठे?.
आपला उद्योग कसा यशस्वी करायचा यापेक्षा त्यात अपयश येऊ नये, याच नकारात्मक मानसिकतेतून अनेक जण उद्योगाची सुरुवात करतात. प्रत्येक पावलाचा संबंध यशापयशाच्या व्याख्येशी जर आपण जोडत गेलो, या पावलावर धोका आहे, असेल असं समजून जर आपण भुई धोपटत राहिलो, तर आपलं पाऊल आणि तेही अपेक्षित वेगानं पुढे पडणार कसं? प्रत्येक पावलाला जर चाचपडत राहिलो तर जोखीम घेण्याची इच्छाही आपोआपच मरून जाते.
सिलिकॉन व्हॅली किंवा परदेशात मात्र याच्या नेमका उलट प्रकार मी पाहिला आहे. एखाद्याचा एखादा प्रयत्न फसला तरी त्याला नाउमेद न करता उलट त्याची पाठच थोपटली जाते. ‘प्रयत्न फसला, ठीक आहे, पण हाच धडा तुला यशाच्या पाऊलवाटेकडे घेऊन जाईल आणि काही अडचण आली तर आम्ही आहोतच’ म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या सकारात्मक वृत्ती नवउद्योजकाला नव्यानं उभारी मिळवून देते. नापास होण्याची भीती मनातून काढून फेकली आणि ‘अभ्यासा’त, कृतीत स्वत:ला झोकून दिलं तरच मुक्त विचारांना वाट मिळेल.
आणखी एक गोष्ट. ती सर्वस्वी आपल्या हातात नाही, पण आपल्यासारखेच नवविचारांनी झटलेली, समान ध्येयाची लोकं जर एकत्र आली तर आपल्या कल्पनांना अल्पावधीत पंख फुटतील आणि त्याला वास्तवाचंही कोंदण लगेचच मिळेल. भले आपली टीम लहान असू देत, पण ही सारीच मंडळी जर झपाटलेली असली तर एका चांगल्या कार्यसंस्कृतीची बांधणी आपोआपच होईल.
.पण हे सारं आपण कोणासाठी करतो आहोत?
भले त्याचा केंद्रबिंदू आपल्याकडे निर्देश करीत असला, तरी सारा फोकस मात्र ग्राहकावरच असला पाहिजे. आपण जे काही करतो आहोत, त्याचा अंतिम लाभार्थी ग्राहकच आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला सर्वोत्तम ते करायचं आहे याचं भान जर जागं असलं तर असा उद्योग यशस्वी होतोच.
आपला स्वत:वरचा आणि ग्राहकांचा आपल्यावरचा हा विश्वास हाच उद्योगाचा खरा पाया. हा पाया जर बळकट असला तर ना कोणाच्या शिफारशीची गरज, ना कुठल्या गैरलागू गोष्टींची. प्रयत्न प्रामाणिक आणि कृती विधायक असली तर लोकच आपली शिफारस करतात आणि तेच आपले जाहिरातदार असतात हे मी स्वानुभवानं सांगू शकतो.
ग्राहकाची गरज काय? त्याला नेमकं काय हवं आहे? आपण तयार करत असलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा त्याला परवडणार आहे का? आपण त्याला जे देत आहोत, त्यात नावीन्य काय? इतरांपेक्षा ते कसं वेगळं आणि अधिक लाभदायी आहे?. या सा:याचा विचार आपल्याला आपल्या उत्पादनाच्या आणि उपभोक्त्यांच्या अधिक जवळ नेत असतो.
हौसेला मोल नाही हे खरंच, पण नुसती हौस आणि एखादं तंत्रज्ञान आपल्याला अवगत आहे म्हणून कुठलाही विचार न करता उडी घेणं धोक्याचंच. अर्थात, अनेकदा या धोक्यांनाही आपल्याला कवेत घ्यावंच लागतं. रस्त्यातली आडवळणं आपली वाट रोखू शकणार नाही असा आत्मविश्वास असला तर हे धोकेही आडवळण घेऊन दूर जातात.
आज सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारतात तरुणांची संख्य़ा सर्वाधिक आहे. त्यांचे हात उद्योगी असणं गरजेचं आहे. त्याचसाठी सरकारनं प्राधान्य दिलेल्या स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमांची गरज आहे. कारण अशा योजनांतूनच मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. नोक:या शोधणा:यांऐवजी नोक:या निर्माण करणा:यांची संख्या वाढणं, वाढवणं हेच त्यावरचं उत्तर आहे. इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा आणि कृतीच नवभारताला ख:या अर्थानं उभारी देणार आहे.
स्टार्टअप सुरू करताना.
* दिशाहीन प्रयत्न नकोत.
* नुसताच उत्साहाचा बुडबुडा नको. ग्राहकाची गरज, आपलं कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र आपल्याला नीट अवगत हवं.
* विचारात लवचिकता हवी.
* समविचारी लोकांना शोधणं, निधी उभारणं. आवश्यक.
* सुयोग्य संशोधन, सातत्यानं प्रयत्न.
* आत्मविश्वासाला पर्याय नाही.
* ‘वाट पाहण्याची चिकाटी’ हा यूएसपी.
* आपल्यातली ‘होल्डिंग पॉवर’ महत्त्वाची.
* ‘माङयाच बाबतीत असं का? मी करतोय ते बरोबर की चूक?’. हे समजून घेण्यासाठी समव्यावसायिकांच्या अनुभवाची शिदोरी.
* ‘लढ’ म्हणून प्रेरणा देणारे आणि अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणारे मेंटर्स हवेतच.
* पुण्यामध्ये ‘देआसरा’ आणि ‘उद्योगमित्र’ या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नामंधून स्टार्टअप्सना मदत, मार्गदर्शन केले जाते.
स्टार्टअप मोहिमेची वैशिष्टय़ं
‘स्टार्टअप इंडिया, स्टॅण्डअप इंडिया’ अशी एक घोषणा पंतप्रधानांनी केली होती. देशात उद्यमी वृत्तीला पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी गेल्याच आठवडय़ात स्टार्टअप अॅक्शन प्लॅनचीही घोषणा करण्यात आली.
या योजनेची ही काही वैशिष्टय़ं.
स्टार्टअप या शब्दाची व्याख्या करण्यात येणार आहे. आता यापुढे हे स्टार्टअप हे ‘स्टार्टअप’ म्हणूनच ओळखले जातील, बिझनेस-व्यवसाय म्हणून नव्हे! भारताचं ग्रोथ इंजिन म्हणून या स्टार्टअपकडे पाहिलं जात आहे.
स्टार्टअप्सना 4 वर्षाच्या कालावधीसाठी 1क् हजार कोटी रुपयांची तरतूद.
नफ्यावर पहिली तीन वर्षे कर माफ.
स्व प्रमाणीकरणाला महत्त्व, इन्स्पेक्शन आणि इन्स्पेक्टर राजला सुट्टी.
एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याची सोय.
स्टार्टअप मोबाइल अॅप आणि पोर्टलची सोय. त्याद्वारेच रजिस्ट्रेशन, क्लिअरन्स असं सारं मिळू शकेल.
9क् दिवसांमध्ये स्टार्टअपमधून माघार घेण्याची मुभा.
भांडवली लाभावरील करातून सूट.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रच्या सहभागातून 35 नव्या इन्क्युबेटर्सची स्थापना, 31 इनोव्हेशन सेंटर्स, 7 संशोधन केंद्रे आणि 5 नव्या बायो क्लस्टर्सची निर्मिती.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन.
शब्दांकन : ओंकार करंबेळकर
(‘लोकमत’, मुंबई)
सहाय्य : अजिंक्य देशमुख
(‘लोकमत’, पुणो)