शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

काशाची परात आणि झाव!

By admin | Updated: May 30, 2015 15:03 IST

खान्देश आणि विदर्भ. पन्नाशीर्पयत पोहोचणारा पारा. मेंदूलाही उकळी फुटू पाहणा:या या वातावरणात माणसं स्वत:ला थंड राखतात तरी कशी?

48 अंश सेल्सिअसर्पयत पोहोचलेल्या पा:यात कशी जगतात विदर्भातल्या ग्रामीण भागातली माणसं?
 
 
 
ज्ञानेश्वर मुंदे
 
काशाची परात आठवते?
एखाद्याला ऊन लागलं की काशाच्या मोठय़ा परातीत पाणी भरून ऊन लागलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ती थंडगार परात फिरविली जायची. अंगातली उष्णता कमी व्हावी म्हणून काशाची वाटी तळपायावरूनही फिरवली जायची.
आणि झाव काढणं?
ऊन लागलेल्या व्यक्तीच्या अंगावर शेला ओला करून टाकायचा. दोन ते तीन मिनीट हा शेला अंगावर ठेवायचा. यालाच ग्रामीण भागात झाव काढणो असेही म्हणतात..
चिकण मातीचा अजून एक प्रकार. चिकण माती पाण्यात भिजवायची आणि हातापायाला लावायची. चिकण माती म्हणजे शेतातील काळी कसदार माती. ही माती पाण्याने ओली केल्यावर लोण्यासारखी मऊ होते. तळ हात, तळपाय आणि कपाळालाही या मातीचा लेप लावला जातो. ही थंडगार माती संपूर्ण शरीरातून उन्हं ओढून घेते. वर्षानुवर्षे हा उपाय ग्रामीण भागात केला जायचा. (श्रीमंत व्यक्ती मात्र चंदन उगाळून हात-पाय आणि कपाळाला लावायचे.)  काळाच्या ओघात अनेक ठिकाणी हे प्रकार कालबाह्य झाले, काहींना ते फक्त ऐकूनच माहीत आहे, तर ब:याच ठिकाणी नव्या पिढीला तर त्याबद्दल काहीच कल्पना नाही.
विदर्भाचा उन्हाळा म्हटला की भल्याभल्यांना घाम फुटतो. यंदा तर सूर्य जणू आग ओकतोय. रस्ते भट्टीसारखे धगधगत असतात. अंगाची लाहीलाही होते. दुपारच्या वेळी रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही.
आज घराघरांत एसी, कूलर, पंखे दिसत असले तरी पूर्वी मात्र यातलं काहीही नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरीही आजच्यासारखे उन्हाचे बळी जात नव्हते. शहरी भागात अत्याधुनिक उपायांद्वारे उन्हाची तलखी शांत करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ग्रामीण भागात मात्र आजही कासे, शेला आणि चिकण मातीसारख्या पारंपरिक उपायांचा अवलंब केला जातो. गेल्या कित्येक दशकांपासून विदर्भ आणि धगधगणारा उन्हाळा असे समीकरण झाले आहे.  विदर्भातील प्रत्येक शहर आणि गावाचा मे महिन्यातला पारा दररोज तब्बल 45 अंशाच्या वर असतो. यंदा तर तपमानाने कहरच केला. पारा 47.5 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला. एसी आणि कूलरही काम करेनासे झाले. उष्माघाताच्या बळींची संख्या वाढायला लागली. अशावेळी विदर्भातील माणसं या उन्हाचा सामना कसा करत असतील असा प्रश्न पडतोच.
पूर्वी मे महिन्यात सकाळपासून दुपार्पयत मशागतीची कामे शेतात केली जायची. डोक्याला केवळ शेला बांधून नांगरणी करूनही कधी ऊन लागले नाही. उन्हापासून बचावासाठी केवळ हिरव्यागार झाडाचा आधार असायचा. टीनपत्र्याच्या घरावर तु:हाटय़ांचा मांडव टाकला जायचा. अलीकडे एसी आणि कूलरची शरीराला सवय झाली; मात्र त्याचाही मोठा धोका असतोच. कूलरच्या थंडाव्यातून अचानक उन्हात गेल्यास ऊन लागण्याची शक्यता अधिक असते; मात्र सकाळपासूनच उन्हात काम करणा:यांचे शरीर तपमानाशी जुळवून घेते आणि त्यांना ऊन लागत नाही. ग्रामीण माणसापेक्षा शहरी माणसांना उन्हाचा तडाखा अधिक बसतो याचं कारण हे आहे. दिवसभर उघडय़ा अंगाने शेतात राबणा:यांना उन्हाची तमाच नसते. एखादं दिवशी ऊन लागले तर त्यावर कासे आणि चिकण मातीचा घरगुतीच उपाय आहेच. जोडीला दररोज सायंकाळी थंडगार पाण्याने आंघोळ, कैरीचे पन्हे आणि खिशात ठेवलेला पांढरा कांदा!
उन्हाची तलखी कमी झालीच पाहिजे!
 
हिरवाईतली आग!
 
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे चिखलदरा. पण अलीकडे तिथलाही पारा 42 अंशाच्या आसपास! नागपूर आणि चंद्रपूरसारख्या शहरांचा तर विचारच न केलेला बरा. 
राज्यात सर्वाधिक जंगल आणि अभयारण्यं विदर्भात आहेत. अशा वनश्रीने नटलेल्या विदर्भात मात्र मे महिन्यात सूर्य आग ओकतो. काही दिवसांपूर्वी नागपूरचा पारा तब्बल 47.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. वर्धा, चंद्रपूरातही पारा 47 अंशावर! - थंडाव्यासाठी आधुनिक उपकरणांचीही जिथे फारशी डाळ शिजली नाही, तिथे पारंपरिक उपाय हाच निदान ग्रामीण विदर्भवासीयांसाठी तरी एकमेव त्रता आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत सहाय्यक उपसंपादक आहेत.)
 
' सकाळ'चा दिवस रात्रीची आंघोळ 
मिलिंद कुळकर्णी
 
खान्देशच्या उन्हाळ्याची अख्ख्या महाराष्ट्रात ख्याती! इतकी की जळगावकरांपेक्षा राज्यातील इतर भागातील रहिवाशांनाच इथल्या उन्हाळ्याची काळजी!
‘जळगावचं आजचं तपमान किती?’ 
क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणो तपमानाचा आकडा जाणून घेण्यात सगळ्यांना रस. अर्थात त्यात तथ्य आहे. सकाळी आठ वाजेपासून सूर्यदेव डोळे वटारायला सुरू करतो, ते अगदी मावळल्यानंतरही त्याची धग शांत होत नाही. दिवसभर अंगाची लाही लाही, घाबराघुबरा झालेला जीव आणि घामाच्या धारा!
सूर्याला चकवा देण्यासाठी जळगावकरांनी आपलं रुटिनच बदलून टाकलं आहे. जळगावकरांची कामे सुरू होतात सकाळी सहापासून! ऊन तापायच्या आता आपापली कामं आवरायची आणि उन्हाचे चटके बसण्यापूर्वीच घरी परतायचं. उन्हाच्या वेळी सूर्याला घरातूनच रामराम! नोकरदार आणि व्यावसायिकांना तो पर्याय नाही; मात्र तेही पुरा जामानिमा करूनच घराबाहेर पडतात. दुपारी एकदम सामसूम. सायंकाळी 7 नंतर मात्र रस्ते पुन्हा वाहू लागतात. उद्याने, बाजारपेठ आणि मॉलमध्ये गर्दी होऊ लागते. खिडकीला बाहेरून लावल्या जाणा:या डेझर्ट कूलरला जळगावकरांची सर्वाधिक पसंती आहे. एसी आता चैन राहिलेली नाही. चारचाकी एसीच असली पाहिजे ही गरज झाली आहे. जुन्या गावात मात्र अद्यापही रस्त्यांवर खाटा किंवा गच्चीवर झोपायला पसंती दिली जाते.  उन्हापासून बचाव करण्यासाठी गच्ची, गॅलरी, पोर्चवर ‘ग्रीन नेट’ म्हणजे हिरवे  कापड लावले जाते. बाजारपेठेतही अशीच हिरवळ! रात्री झोपण्यापूर्वी परत एकदा आंघोळ आणि मगच दिवस संपतो!
फॅशनची व्याख्याही जळगावकरांनी आपल्यासाठी बदलून टाकली आहे. ज्यामुळे तलखी कमी होईल ती फॅशन! फुलबाह्यांच्या शर्टऐवजी हाफ शर्ट, शर्ट म्हणून बंडीचाच वापर. खादीचा बागायती रुमाल, उपरण्याने झाकलेला चेहरा आणि कान, डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल आणि पॅण्टच्या खिशात फोडून ठेवलेला किंवा छोटा आख्खा कांदा ! मुली आणि महिला तर ओळखू येणो मुश्कील. त्यांचा चेहरा स्कार्फने पूर्ण झाकलेला. नदीपात्रऐवजी शेतात टरबूज-खरबूज पीक घेतले जाऊ लागल्यापासून त्याचीही रेलचेल. जोडीला उसाचा रस, कोल्ड्रींक्स, आईसक्रीम-लस्सी, जलजिरा आणि लिंबू सरबत! पानटप:यांप्रमाणो रसवंती, मठ्ठयाची दुकाने चौका-चौकात लागली आहेत. सामाजिक व स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून मुख्य रस्त्यांवर पाणपोई सुरु केल्या आहेत. जळगावकरांनी तर उन्हामुळे आपल्या समारंभांच्या वेळाही बदलून टाकल्या. 
उन्हाळ्यात सभा, समारंभांच्यावेळा सकाळी 9 किंवा सायंकाळी 7! दुसरी वेळ निवडल्यास श्रोत्यांच कार्यक्रमाकडे पाठ! उन्हाळा अटळ आहे, त्यामुळे त्याला नावे ठेवण्यापेक्षा त्यातून सुखाचे, आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रय} जळगावकर करतात. 
 
आम्ही नाही, तुम्हीच या! 
 
उन्हाळ्याच्या भीतीने मुंबई-पुण्याच्या पाहुण्यांची संख्या रोडावते. दिवाळीचा वायदा करून पाहुणो उन्हाळ्यात येणो टाळतात. जळगावकरच मग चार दिवस का होईना, मुंबई-पुण्याला जाऊन येतात. ज्यांची मुले मुंबई-पुण्यात राहतात, अशी सेवानिवृत्त मंडळी उन्हाळ्याचे दोन-तीन महिने मुलांकडे रहायला जातात. उन्हाळी सुटय़ांमध्ये पर्यटनाची संधीदेखील काही जण साधतात. तेवढीच उन्हापासून सुटका! 
 
सामिष ‘तहान’ ताकावरच!
 
झणझणीत, तिखळजाळ खाण्यात जळगावकर माहीर आहेत. मिसळ, फौजदारी डाळ, दाळगंडोरी, शेवभाजी, मांसाहारी पदार्थ हे तर जळगावकरांचे आवडीचे खाद्यपदार्थ आहेत. पण जीभ कितीही चुरचूर करीत असली तरी उन्हाळ्यात या सगळ्याच सामिष पदार्थाना चाट मारण्याकडे कल! अगदी लग्नसोहळ्यातही पहायला मिळतं ते म्हणजे मठ्ठा, कैरी व काकडीची कोशिंबीर! चहाच्या गरम पाण्याऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे आणि ताकाला पसंती! 
 
(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीत संपादकीय विभागप्रमुख आहेत.)