पुणो : विविध क्षेत्रंत आपली गुणवत्ता सिध्द करून जगाचे वेधून घेणा:या मान्यवर महिला लोकमत माध्यम समुहाच्यावतीने आयोजित चौथ्या ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये विचारमंथन करणार आहेत. मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी हॉटेल हयात येथे ही समिट होणार असून त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पाकिस्तानातील प्रसिध्द पत्रकार, चित्रपट निर्मात्या बीना सरवर, प्रसिध्द अभिनेत्री रविना टंडन आणि भिन्न लिंगीच्या हक्कांसाठी झटणा:या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या विविध विषयांवर समिटमध्ये वक्त्या म्हणून सहभागी होणार आहेत. या वक्त्यांची ओळख आजपासून देत आहोत.
बीना सरवर :
बीना सरवर
या पाकिस्तानातील प्रसिध्द पत्रकार, चित्रपट निर्मात्या, कलाकार आहेत. मानवी हक्क, स्त्री-पुरूष समानता, माध्यम आणि शांती या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्या सध्या ‘अमन की आशा’ (होप फॉर पिस) या मोहिमेच्या पाकिस्तानातील संपादक म्हणून काम पाहत आहेत. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणो, हा या मोहिमेचा उद्देश आहे. या माध्यमातून सरवर या सातत्याने दोन्ही देशांमधील शांततेसाठी प्रयत्न करीत आहेत. याआधी त्यांनी द स्टारच्या सहायक संपादक, द फ्रन्टीअर पोस्टमध्ये पुरवणी संपादक म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्या द न्युज ऑन सन्डेच्या संस्थापक संपादिकाही होत्या. पाकिस्तानातील जिओ टिव्हीवर त्यांनी विविध कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. सरवर यांच्या ब्लॉगला 2क्11 मध्ये ‘बेस्ट ब्लॉग फ्रॉम अ जर्नालिस्ट’ हा पुरस्कार मिळालेला आहे. नाहिद्स स्टोरी, कराची डायरी, फोस्र्ड मॅरेज, मिलने दो - लेट काश्मीरीज मिट अशा विविध माहितीपटांची निर्मिती व दिग्दर्शन करून त्यांनी विविध सामाजिक प्रखरपणो भाष्य केले आहे. त्यांच्या काही माहितीपटांना पुरस्कारही मिळाले आहेत.
रविना टंडन : भारतातील प्रसिध्द सिने अभिनेत्रींमध्ये रविना टंडन यांचे नाव घेतले जाते. मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेल्या रविना यांनी 1992 साली ‘पत्थर के फुल’ या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ठ अभिनयाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 199क् च्या दशकांत त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटांबरोबरच तामिळ, कन्नड आणि तेलगु चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय
केला आहे. 2क्क्1 सालच्या
‘दमन’ या चित्रपटासाठी त्यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित
करण्यात आले आहे. तसेच मधुर भांडारकर यांच्या ‘सत्ता’ या चित्रपटामधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. यावेळी त्या यशाच्या शिखरावर होत्या. अक्स, शुल, संध्या अशा विविध चित्रपटांमधून त्यांची कारकीर्द बहरत गेली.
लक्ष्मी नारायण त्रिपाठी : लक्ष्मी म्हणून प्रसिध्द असलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या भिन्नलिंगीच्या हक्कांसाठी झटणा:या सामाजिक कार्यकत्र्या आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, उपहास टीकेचा सामना करीत त्यांनी भिन्नलिंगीसाठी आपला लढा सुरू केला. युनायटेड नेशन्समध्ये एशिया पॅसिफिकचे प्रतिनिधित्व करणा:या त्या पहिल्या भिन्नलिंगी व्यक्ती आहेत. समलिंगी, भिन्नलिंगी (एलजीबीटी) व्यक्तींसाठी काम करणा:या विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी म्हणूनही त्या सध्या काम पाहत आहेत. दक्षिण आशियामध्ये भिन्नलिंगींसाठी काम करणा:या ‘दाई वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या त्या 2क्क्2 मध्ये अध्यक्ष झाल्या. ‘एलजीबीटी’ यांच्या न्यायहक्कांसाठी विविध माध्यमातून मुलाखती व कामातून त्या लढा देत आहेत. ‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ ही त्यांची आत्मकथा भिन्नलिंगींकडे निरपेक्षपणो माणूस म्हणून पाहायला लावणारी आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. भरतनाटय़म नृत्यातही त्या पारंगत आहेत.