शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

दिवाळी कुणाची ?

By admin | Updated: October 19, 2014 01:02 IST

दिवाळीला काही दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे रविवारी १९ आॅक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांची

नागपूर: दिवाळीला काही दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे रविवारी १९ आॅक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार असून पहिल्या एक तासात निकालाचा प्रथम कौल आणि दुपारी २ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण २११ उमेदवारांचे भाग्य सध्या ईव्हीएममध्ये बंदिस्त आहे. त्यात प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. काही ठिकाणी चुरस आहे. त्यामुळे कोण जिंकणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. रविवारी या सर्वांच्या भाग्याचा फैसला होणार असून दुपारपर्यंत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दिवाळीच्या तोंडावरच विजयश्रीची माळ गळ्यात पडणार असल्याने त्याचा आनंदही फटाके फोडून साजरा करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.दरम्यान प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल व त्यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मध्य आणि रामटेक मतदारसंघात प्रत्येकी १४ तर इतर दहा मतदारसंघात प्रत्येकी २० टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघात १३८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि उपजिल्हा निवडणक अधिकारी अजय रामटेके यांनी मतमोजणीच्या कामाचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या. (प्रतिनिधी)कुणाचे भाग्य फळफळणारनागपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस (दक्षिण पश्चिम), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर), अनिस अहमद (मध्य नागपूर), सुबोध मोहिते (रामटेक), राजेंद्र मुळक (कामठी), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल), रमेश बंग (हिंगणा), विद्यमान आमदारांपैकी कृष्णा खोपडे (पूर्व), विकास कुंभारे (मध्य नागपूर), सुधाकर देशमुख (पश्चिम नागपूर), दीनानाथ पडोळे (दक्षिण), सुनील केदार (सावनेर), आशिष जयस्वाल (रामटेक), सुधीर पारवे (उमरेड), चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे समीर मघे, डॉ.मिलिंद माने, आशिष देशमुख, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, विकास ठाकरे, शिवसेनेचे किरण पांडव, शेखर सावरबांधे, राजू पारवे, बसपाचे किशोर गजभिये, राष्ट्रवादीचे प्रगती पाटील, दिलीप पनकुले, अमोल देशमुख यांच्याही भाग्याचा निर्णय रविवारी होणार आहे.