शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

पर्यटनस्थळांचा विकास पालिका कधी करणार?

By admin | Updated: May 18, 2016 03:50 IST

पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

हुसेन मेमन,

जव्हार- पालघर जिल्ह्यात जव्हार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र तसेच दमण व गुजरात राज्यातील शेकडो पर्यटक येथे येत असतात. समुद्र सपाटीपासून १७०० फुट उंचीवर असलेल्या या शहरात व तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. पर्यटन विकास निधीतून काही स्थळांचा थोडाफार विकास झाला खरा परंतु शहरातील हनुमान पॉइंट , सनसेट पॉइंट , शिरपामाळ , जयसागर धरण , शिवाजी उद्यान , सूर्य तलाव , यांचा म्हणावा तितका विकास आजही झालेला नाही. १० वर्षा पूर्वी पालिकेत शिवसेनेची सत्ता असतांना त्यांनी खासदार निधीतून सनसेट व हनुमान पॉइंट येथे संरक्षक भिंत व पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून काही प्रमाणात कामे केली. मात्र मध्यंतरीच्या काळात या स्थळांकडे दुर्लक्षच झाले. लाल माती हे जव्हार चे विशिष्ट परंतु विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण केल्यामुळे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वास्तविक नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करावयास हवा होता.ओसाड ठिकाणी विविध आकर्षक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले असते तर प्रत्तेक ठिकाणी गर्द मोठे वृक्ष होऊन वनराई झाली असती. परंतु आजपर्यंत दरवर्षी नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या वृक्ष करातून पावसाळ्यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली पालिका निकृष्ट दर्जाची छोटी रोपे लावते व आपला कर सत्कारणी लावल्याचा देखावा निर्माण करते. त्याकडे नंतर ढुंकूनही पाहिले जात नसल्यामुळे ती रोपे मरून जातात. पुन्हा पुढील वर्षी त्याच ठिकाणी लाखोंचा खर्च करून वृक्षारोपण केले जाते. हा गोरखधंदा आजही चालू आहे. ।हिरवळ वाळली, खेळण्यांची झाली वाताहतवृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावयास हवे होते.ते काम डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दासांनी ५ वर्षापासून केल्यामुळे आज अनेक झाडांना नवी पालवी फुटली आहे. परंतु प्रत्येक स्थळांच्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी बसविणे , हिरवळ लावणे , हि कामे झालीच नाहीच उलट शिवाजी उद्यानातील खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेल्या हनुमान पॉर्इंट येथे तर महिन्यापूर्वी बसण्यासाठी एकही बाक नसल्यामुळे पर्यटकांत तीव्र नाराजी होती. जव्हार मर्चंट पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून तिथे ५ बाक बसविण्यात आलेत.परंतु ते पुरेसे नाहीत. लहान मुले , महिला , व जेष्ठ नागरिकांची त्यामुळे मोठी कुचंबणा होते. लहान मुले तेथील लोखंडी पाईप वर बसत असतात खाली मोठी दरी असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी तरी पालिकेने वृक्ष कराचा योग्य विनियोग करावा , सर्वसाधारण निधीतून प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय करावी व लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरण न करता निसर्ग सौंदर्य वाढवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे