मुंबई : कुठे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात, तर कुठे रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांत 15 जणांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली़ विशेष म्हणजे एका अपघातातील मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आह़े
पहिला अपघात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील महामार्गावरील मधापुरी फाटय़ाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजता घडला़ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अमरावतीहून अकोलाकडे जाणा:या भरधाव ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिली़ या भीषण अपघातात क्रुझरमधील आठ जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आह़े दुसरा अपघात लातूर जिल्ह्यातील चापोली येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घडला़ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेने महिलेला रुग्णालयात नेणा:या रिक्षातील 7 जण ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली़ तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत़ रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणो आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)