शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण
3
जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 
4
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
5
Stock Market Today: सेन्सेक्स २०७ अंकांच्या तेजीसह उघडला, Nifty २५ हजार पार; 'या'मुळे बाजारात जोरदार तेजी
6
२०२५ मध्ये जगन्नाथ रथयात्रा कधीपासून होणार सुरू? लाखो भाविक येतात; पाहा, अद्भूत वैशिष्ट्ये
7
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
8
अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की
9
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
10
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
11
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
12
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
13
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
14
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
15
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
16
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
17
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
18
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
19
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
20
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

वाशिम जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा!

By admin | Updated: July 5, 2014 23:49 IST

कुपोषित बालकांची संख्या हजारावर : मानोरा तालुक्यात सर्वाधिक कुपोषण

वाशिम : राज्यात विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या वाशिम जिल्हा कुपोषाच्या विळख्यात सापडला असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. मानोरा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असून वाशिम तालुक्याचा याबाबत दुसरा क्रमांक आहे. बालकांचे कुपोषण ही आज सार्वत्रिक समस्या बनली आहे. केवळ ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातच बालकांचे कुपोषण आहे असे नव्हे तर विकासात पुढे असणार्‍या शहरी भागातही आता बालकांचे कुपोषण आढळून येत आहे. ** महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे वय व वजनाच्या आणि उंची व लांबीच्या अशा दोन निकषानुसार दरमहा सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात वाशिम जिल्हय़ात जून महिन्यात शुन्य ते सहा वयोगटातील ९२,३७२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात वाशिम तालुक्यातील १७८८९, रिसोड १५१७५, मालेगाव १८३७४, मंगरुळपीर १३,८१0, कारंजा ११३८७ व मानोरा तालुक्यातील १५७३७ बालकांचा समावेश होता.यापैकी वय व वजनानुसार ८४९८0 बालक सामान्य श्रेणीत आढळले. किमान वजन निकषाखाली कुपोषित श्रेणीत ६३२२ तर कमाल वजन निकषाखालील तीव्र कुपोषित बालकांच्या श्रेणीत १0७0 बालक असल्याचे आढळून आले.** याचप्रमाणे लांबी उंचीनुसार ९२,३७२ बालकांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९१,४७२ बालक सर्वसाधारण श्रेणीत असल्याचे आढळून आले. यापैकी किमान लांबीव उंचीच्या निकषाखालील कुपोषित श्रेणीत ७२१ तर कमाल लांबी व उंचीच्या निकषाखालील तीव्र कुपोषित श्रेणीत १७९ बालक असल्याचे आढळून आले.यात कुपोषणाच्या सर्वेक्षणाच्या दोन्ही पद्धतीत मानोरा तालुक्यात सर्वाधिक तर वाशिम तालुक्यात त्या खालोखाल कुपोषित बालक आढळून आले आहेत.** मागीलवषी जिल्ह्यामध्ये पावसाळय़ात अतवृष्टीने तर हिवाळय़ात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांची स्थिती यंदा हलाखीची झाली आहे. अशा स्थितीचा परिणाम बालक कुपोषित होण्यावर झाला आहे.वाशिम जिल्हय़ात मानोरा तालुका जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांपेक्षा विकासाच्या प्रक्रियेत मागासलेला आहे. जिल्हय़ातील कारंजा तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात एमआयडीसीने औद्योगिक वसाहती विकसित केल्या असल्या तरी तेथे एकही मोठा उद्योग आजस्थितीत सुरु नाही. परिणामी, शेती व लहान-मोठे व्यवसाय हेच लोकांचे रोजगाराचे साधन आहे. त्यातही जिल्हय़ातील लागवडीयोग्य ४ लाख ३१ हजार शेतजमिनीपैकी केवळ ६८ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली असल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कोरडवाहू शेती व रोजमजुरी हे आहे.