पुणो : घुमान येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यंदा नियोजित वेळेच्या एक महिना अगोदरच पोस्टाने मतपत्रिका पाठवूनही मतदारांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे, मतपत्रिका पाठविण्याची अंतिम मुदत आठवडय़ावर येऊन ठेपली असताना केवळ 4क् टक्केच मतपत्रिकाच उपलब्ध झाल्या असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली.
यंदा ‘रजिस्टर एडी’ पद्धत बंद करून पोस्टानेच एकूण 1क्7क् मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या. सर्व मतदारांना या मतपत्रिका मिळाल्या असून, मतपत्रिका हातात पडली नाही, अशी एकाही मतदाराची तक्रार अद्याप आलेली नाही. आजमितीला केवळ 38क् जणांच्या मतपत्रिका परिषदेकडे आल्या आहेत.
यामध्ये 1क्क्हून अधिक मतदारांना मागणीनुसार दुबार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. दि. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेर्पयत मतपत्रिका पाठविण्याची अंतिम मुदत आहे.
शंभर टक्के नसल्या, तरी आठवडाभरात सुमारे 6क्क् मतपत्रिका हातात पडतील, असा आमचा अंदाज आहे. तरी मतदारांनी लवकरात लवकर मतपत्रिका साहित्य परिषदेत पाठवाव्यात, असे आवाहन आडकर यांनी केले. (प्रतिनिधी)