मुंबई : विलेपार्ले येथे स्त्री जातीच्या अर्भकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सहार पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ताज कॅटरर्ससमोर एका नाल्यात हे अर्भक शनिवारी आढळून आले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या परिसरातील एका रहिवाशाला एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत हे अर्भक दिसले. त्याने ही बाब सहार पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन पाहणी केली. हे अर्भक हे स्त्री जातीचे असून, अज्ञात इसमाने रुमालाने गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अर्भकाच्या डोक्याला आणि डोळ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्याने त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी हे अर्भक शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले असून, याबाबत अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
विलेपार्ल्यात अर्भकाची गळा आवळून हत्या
By admin | Updated: October 6, 2014 12:05 IST