शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

VIDEO - थेट मालविक्रीमुळे शेतक-यांना दुप्पट फायदा

By admin | Updated: July 12, 2016 13:46 IST

फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विकण्यास सरकारने शेतक-यांना परवानगी दिल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ -  फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विकण्यास सरकारने शेतक-यांना परवानगी दिल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतक-यांकडून घेतली जाणारी सहा टक्के अडत वसुल करण्यास व्यापा-यांना बंदी घातल्याने शेतक-यांना पुर्वीपेक्षा दुप्पट फायदा मालाची विक्री करताना होत आहे. शेतक-यांना रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना माफक दरात फळे-भाजीपाला मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडुन मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे. 
बाजार समिती कायद्यातून फळे, भाजीपाला वगळल्यानंतर अडतबंदी झाल्याच्या निषेधार्थ पुणे  कृषी Þउत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यांनी सोमवार पासुन बंद पुकारला आहे. त्यामुळे शेतक-यांनी स्वत:च फळे व भाजीपाल्याची विक्री केली. 
  शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत मंगळवारी पहाटेपासूनच शेतक-यांची लगबग दिसत होती .  शेतकºयांचीअडत,हमाली, तोलाई मापाई व इतर कारणास्तव कापले जाणारे पैसे वाचले त्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंदाचे भाव दिसत होते. शेतक-यांना फळ व भाजीपाला विक्र मध्ये आज दुप्पट भाव  मिळत होता. ग्राहकाला फळे भाजीपाला थेट विक्री होत असल्यामुळे  ग्राहकाशी थेट संपर्क येत असल्यामुळे शेतक-यांना अडत तोलाइ मापाइचा भुर्दंड शेतक-यांना आज सोसावा लागला नाही. सकाळी  सातपर्यंतच  शेतक-यांच्या सगळ्या मालाचा उठाव झाला.  
अडत बंदीमुळे शेतक-यांचा नफा होत असुन शेतमालाला मनासारखा भाव मिळत आहे, टॉमॅटोच्या प्रत्येक  पंचवीस किलो कॅरेटला सातशे ते आठशे रूपये भाव मिळत आहे. तसेच कॅरेट मागे तीस ते चाळीस रूपये बचत होत आहे. बारामतीहुन टॉमेटो विक्रीला घेवुन आलेले शेतकरी संदीप जगताप म्हणाले. 
 अडतबंदीमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होणार आहे. भाजीपाला खरेदी मध्ये ग्राहकाचे किलोमागे दहा ते पंधरा रूपये वाचतात .  सहा टक्के अडत व दोन टक्के हमाली वाचल्यामुळे आनंदी आहे.   शिरूरहुन आलेले भाजीपाला विक्रीसाठी घेवुन आलेले शेतकरी रंगनाथ पवार म्हणाले. 
 अडतबंही शेतक-यांच्या फायद्याची असल्याने शेतक-यांनी स्वत: मालविक्री साठी ठाम राहीले पाहीजे अडत बंदीमुळे शेतक-यांना त्यांच्या मालाचा अचुक भाव कळतो, वजन मापे कळतात त्यात होणारी फसवणुक आडतबंदी मुळे होणार नाही त्यामुळे शासनाता हा निर्णय स्वागतार्ह आहे. कांद्याला पंन्नास किलो मागे पंन्नास रूपये वाटले त्यामुळे आनंदी आहे असे कांदा विक्री साठी घेवुन आलेले दामोदर शेवाळे म्हणाले. 
  माळशिरसवरुन विक्रीसाठी वांगी घेऊन आलेले शेतकरी अर्जुन रुपन्वर म्हणाले, अडत पद्धती असताना एका कॅरेट मागे केवळ दोनशे रुपये मिळायचे, त्यामध्ये वाहतुक खर्च पस्तीस रुपये प्रति कॅरेट. पुर्ण खर्च वगळता हातात केवळ दिडशे रुपये मिळत होते. आता मात्र प्रति कॅरेट कमीत कमी पाचशे रुपये मिळत आहेत. सरकारची अशीच मेहरबानी राहिली तर बळीराजा आत्महत्येचा विचार सुद्धा करणार नाही. 
 बारामतीचे रविंद्र गाडवी म्हणाले, पुर्वी कांदा, बटाटा, भाजीपाला, टोमॅटो यासह मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक बाजार समित्यात झाल्यावर बड्या व्यापाºयांनी कोंडी करुन त्या मालाचे भाव पाडायचे आणि शेतकºयांची कोंडी करायची, असे प्रकार बाजार समितीत सर्रास सुरु होते. अशा बाबींना अडतबंदी मुळे चांगलाच चाफ बसला आहे.
 वडकी भागातून आलेले शेतकरी भिवाजी कोळपे म्हणाले, पुर्वी एक भाजीची पेंडी पंधरा रुपयाला विक ली गेली तर अडत सहा टक्के व हमाली दोन टक्के अशी एकुण आठ टक्के रक्कम कापली जात होती. आता मात्र संपुर्ण फायदा आम्हाला होत आहे. शिवाय हमालीची कामे स्वत: केल्याने त्याचे सुद्धा पैसे वाचत आहेत. 
 
 
शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या अडतबंदीचे स्वागत व शेतक-यांना संरक्षण देण्याच्या हेतुने शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालटकर यांनी मोर्चा काढुन जोरदार घोषणाबाजी केली. शेतक-यांनी खचून न जाता आपला शेतमाल विकावा व स्वत: नफा कमवावा असे आव्हान केले. यावेळी तोलणार संघटनेने या अंदोलनाला पाठिंबा घोषीत केला.  शेतक-यांना मदत म्हणून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपले काम सुरळीत चालू ठेवले.