शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
6
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
7
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
8
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
9
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
10
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
11
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
12
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
13
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
14
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
15
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
16
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
17
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
18
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
19
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
20
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!

बळीराजा संकटात

By admin | Updated: December 1, 2014 00:51 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे.

दुष्काळाच्या झळा : ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आतनागपूर : यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे. जिल्ह्यातील ५२५ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रबी हंगामात पीक येण्याची शाश्वती नाही. या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आस हवालदिल शेतकऱ्यांना लागली आहे.सोयाबीन, धान व संत्र्याचे पीक बुडाले आहे. कापसाला उतारा नाही, त्यातच कवडीमोल भावाने कापसाची खरेदी सुरू आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १६४५ पैकी ५२५ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अद्याप अहवाल आलेला नाही. या अहवालानंतर दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. पीकनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तातडीने मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसोबच जमिनीची हानी झाली होती. मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली होती. जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारकडून मदत मिळालेली नाही. खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत पंचनाम्याची गरज राहणार नाही. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा सरसकट सर्व गावांनाच दुष्काळी गावे जाहीर करून तेथे मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीक कापणी प्रयोगावरून नुकसानीचा अंदाजपीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरून नुकसानीचा अंदाज काढला जातो. यात कृषी व महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. खरीप हंगामातील हा अहवाल अद्याप यावयाचा आहे. सोयाबीनचा हंगाम संपला आहे. या पिकाच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. धानाची काढणी पूर्णपणे व्हायची असून कपाशीचे पीक अद्याप उभे असल्याने या पिकाच्या कापणीचा अहवाल येण्याला विलंब आहे. या अहवालावरून पैसेवारी निश्चित केली जाते. यावरून दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील शहरी भागातही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार आहे. यासाठी नगरपालिका आणि नगर पंचायतींना नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषदांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. दोन लाख हेक्टरातील पीक बुडालेखरीप हंगामात जिल्ह्यात ५,०९,९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,०००, सोयाबीन १,९२,५०० तर धानाची ८५,००० हेक्टर लागवड करण्यात आली होती. याचा विचार करता जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पीक बुडाले आहे. रबी हंगामालाही याचा फटका बसला असून, १,४४,६३० पैकी ५,६८९३ हेक्टर क्षेत्रात रबी हंगामात पेरणी झाली आहे. यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. पिण्याच्या पाण्याची समस्यादरवर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५०० ते ६०० गावांत कमी-अधिक प्रमाणात टंचाई भासते. यंदाच्या हंगामात पाऊ स कमी झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. उपायोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे.