मुंबई : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या रोडावताना दिसत आहे. पण, गुरुवार, २ मार्चला स्वाइनचा अजून एक बळी मुंबईत गेला. अलिबागच्या २८वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईबाहेरून स्वाइन फ्लूचे २२० रुग्ण उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी ३० जणांचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. अलिबाग येथे राहणाऱ्या महिलेला एनएमएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला २९ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच या महिलेचा मृत्यू झाला. शनिवार, ४ एप्रिलला मुंबईबाहेरून चार रुग्ण उपचारासाठी आले आहेत. चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत मुंबईत नवे २३ रुग्ण आढळून आले आहेत. २३ रुग्णांपैकी १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत.
अलिबागमध्ये स्वाइनचा बळी
By admin | Updated: April 5, 2015 01:45 IST