शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी दूतावासाचा ‘व्हिसा डे’ दिमाखात

By admin | Updated: June 10, 2016 02:23 IST

जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्ही यश संपादन करू शकता

मुंबई : जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्ही यश संपादन करू शकता, हे सिद्ध करून दाखवत मुंबईतील श्वेता कठी आणि अकील चिनॉय या विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाची संधी मिळवत देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची अनेकांची इच्छा असते. दरवर्षी शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी हजारो मुले परीक्षा देतात. पण त्यातील काहीच मुले अनेक स्तर पार करत प्रत्यक्ष शिक्षण घेतात. अशाच हरहुन्नरी विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा उलगडण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील यूएस व्हिसा काऊंसिलेट येथे ‘व्हिसा डे’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या ५ विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवास उलगडून सांगितला.कामाठीपुरासारख्या रेड लाइट परिसरात वाढलेल्या श्वेता कठीचा प्रवास आदर्श आहे. श्वेताने महापालिकेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. दहावीनंतर काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून यूएस दूतावासाशी तिचा संपर्क आला. मुलाखतीनंतर तिच्यातील अभ्यासाची चुणूक ओळखून तिला अमेरिकेतील बोर्ड महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. शिवाय तिला महाविद्यालयाची शिष्यवृत्तीदेखील मिळाली. विशेष म्हणजे कामाठीपुरासारख्या परिसरात राहून अमेरिकेत शिकणारी ती एकमेव मुलगी आहे. तिच्या या कार्याबद्दल तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या श्वेता वॅटसन विद्यापीठात सोशल इंटरप्रिनरशिप विषयाचा सखोल अभ्यास करत आहे. आयटी क्षेत्रात स्वत:ची वेगळीच ओळख प्रस्थापित केलेला अकील चिनॉय मूकबधिर आहे. त्याचे आई-वडीलदेखील मूकबधिर आहेत. पण शिक्षणाचे महत्त्व पालकांना असल्यामुळे असलेल्या परिस्थितीवर मात करत त्याने शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने थेट अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने कॉम्प्युटर सायन्स विषयातील पदवी मिळवली आहे आणि सध्या तो मुंबईतील आयटी कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. याशिवाय सृष्टी आचरेकर (अ‍ॅग्रिकल्चरल अ‍ॅण्ड बायोलॉजीकल इंजिनीअरिंग), मनमोहन थोरात (मेकॅनिकल इंजिनीअरिंग), सखी भुरे (अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विषयाचे शिक्षण अमेरिकेतील विद्यापीठांमधून घेत आहे. याप्रसंगी मुंबईचे यूएस काऊंसिलर चिफ मायकल इवान्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)इतर विषयांना प्राधान्य अमेरिकेत करिअरसोबतच अन्य विषयांना प्राधान्य दिले जाते. तुमच्या आवडीच्या विषयाच्या वर्गात तुम्ही हवे तेव्हा बसू शकता. त्यामुळे करिअरसोबत आवडही जोपासण्याची मुभा अमेरिकेतील शिक्षणात दिली जाते.