शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

टॉपवर्थ समूहाने स्पर्धेत मिळवले दोन कोल ब्लॉक्स

By admin | Updated: August 23, 2015 00:06 IST

मुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अ‍ॅण्ड मेटल्स कंपनीने

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरमुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अ‍ॅण्ड मेटल्स कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील मरकी मांगली-१ या कोळसा खाणीसाठी ७१५ रुपये प्रति टन बोली लावली होती. या खाणीसाठी सरकारी किंमत ५०५ रुपये प्रति टन होती. टॉपवर्थ ऊर्जाची बोली सर्वाधिक ठरून लिलावात कायम झाली.‘मरकी मांगली-१ या खाणीत ९.९६ दशलक्ष टन कोळसा असून पुढील ३० वर्षांत कंपनी महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीपोटी ५९७ कोटी रुपये देणार आहे; अशी माहिती टॉपवर्थ समूहाचे अध्यक्ष अभय लोढा यांनी ‘लोकमत’ला दिली. या खाणीसाठी ग्रेस इंडस्ट्रीज व लॉईडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. या कंपन्याही स्पर्धेत होत्या.मरकी मांगली-१ ही खाण बी एस इस्पात या कंपनीला २००८ साली मिळाली होती व गेल्या वर्षी कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्या २०४ खाणींचे वाटप रद्द केले होते, त्यात ही खाणसुद्धा होती.याच बरोबर टॉपवर्थ समूहाची दुसरी कंपनी क्रेस्ट स्टील अ‍ॅण्ड पॉवर कंपनीला छत्तीसगडमधील भास्करपारा ही खाण याच लिलावात मिळाली आहे. या खाणीसाठी सरकारी बोली ५१३ रु. प्रतिटन होती व क्रेस्ट स्टीलची ७५५ रु. प्रति टनाची बोली सर्वाधिक ठरली. या खाणीत २४.०६ दशलक्ष टन कोळसा आहे व त्याच्या रॉयल्टीपोटी कंपनी छत्तीसगड सरकारला पुढील ३० वर्षांत १८१६ कोटी रुपये महसूल देणार आहे. या खाणीसाठी जिंदल स्टील अ‍ॅँण्ड पॉवर व गोदावरी नॅचरल रिसोर्सेस या कंपन्या स्पर्धेत होत्या. भास्करपारा खाण याआधी बी.के. बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीज व इलेक्ट्रोथर्म इंडिया यांना भागीदारीत मिळाली होती.कंपनीचा अ‍ॅल्युमिनियम फॉइल प्रकल्पही उमरेडात- टॉपवर्थ समूहाची कंपनी गुजरात फॉईल्स ही उमरेडमध्ये भारतातील सर्वात मोठा अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा कारखाना उभारणार आहे. १५५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात दरवर्षी ६०,००० टन अ‍ॅल्युमिनियम फॉईल तयार होतील. या फॉईल्स औषधी गोळ्या व कॅप्सूलच्या पॅकिंगसाठी वापरल्या जातात, अशी माहिती गुजरात फॉईल्सचे वित्त अधिकारी जगदीश पारगांवकर यांनी दिली. भारतात औषधी गोळ्या/ कॅप्सूलच्या पॅकिंगसाठी दरवर्षी एक ते सव्वा लाख टन अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स लागतात.- गुजरात फॉईल्सचा १२००० टन प्रतिवर्ष क्षमतेचा एक प्रकल्प अहमदाबादजवळ आहे. परंतु तेवढ्याने बाजारातील मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याने हा विस्तार प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या पाठपुराव्यामुळे उमरेडात टाकण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती टॉपवर्थ ऊर्जाचे संचालक सुरेंद्र लोढा यांनी दिली. यासाठी कंपनीने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे (यूएसएफडीए) मानक प्राप्त केले आहे; त्यामुळे भारतातील बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आमच्या अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स वापरतात, असेही सुरेंद्र लोंढा म्हणाले.