शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना शौर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:52 IST

राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत.यावर्षी यातंर्गत १०७ पोलीसांना पोलीस शौर्य पदक, ७५ पोलिसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६१३ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण ४९ पदकांचा समावेश आहे.राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.पोलीस शौर्य पदक१) एम राजकुमार, आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक. २) संदीप पुंजा मंडलिक, पोलीस उपनिरिक्षक. ३) रमेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस उपनिरिक्षक.४) नानगासू पंजामी उसेंडी, नाईक. ५) निलेश जोगा मडवी, पोलीस शिपाई.६) रमेश नटकू अतराम, पोलीस शिपाई. ८) बबलू पुनगाडा, पोलीस शिपाईपुरस्कार प्रेरणादायी... ज्ञानेश्वर चव्हाण हे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण आहे. आईवडील अशिक्षित असतानाही त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. या पदकाबाबत आनंद झाला असून, अधिक चांगले काम करण्यासाठी यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.३९ जणांना पोलीस पदक१. ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिक्षेत्र-२, दक्षिण विभाग मुंबई. २. महेश उदाजी पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. ३. रवींद्र कुसाजी वाडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग,ठाणे शहर. ४. शांताराम तुकाराम अवसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा,ठाणे शहर. ५. विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड. ६. जर्नाधन जगन्नाथ घाडगे, सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट -३ जालना. ७. संजीवकुमार विश्वासराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोल्हापूर. ८. नेहरू दशरथ बंडगर, पोलीस निरिक्षक, राज्य राखीव पोलीस दल (प्रशिक्षण), दौंड. ९. बाळासाहेब रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष, मुंबई शहर. १०. भीम वामन छापछडे, पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश), पोलीस संचालक (बिनतारी संदेश), पुणे. ११. प्रकाश कचरू सहाणे, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, बुलढाणा. १२. प्रकाश नागप्पा बिराजदार, पोलीस निरीक्षक, वसई-पालघर. १३. संजय रामराव देशमुख, पोलीस निरीक्षक, स्थनिक गुन्हे शाखा, यवतमाळ. १४. शाम सखाराम शिंदे, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर. १५. पांडूरंग नारायण शिंदे, पोलीस निरीक्षक, कुलाबा, मुंबई शहर. १६. सुधीर प्रभाकर असपत, पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे. १७. सायरस बोमन ईरानी, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर. १८. अविनाश लक्ष्मीनारायण आघाव, पोलीस निरीक्षक, औरंगाबाद. १९. सुनील दशरथ महाडीक, पोलीस निरीक्षक, नागपूर शहर. २०. ज्ञानेश्वर रायभान वाघ, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई शहर. २१. सुनिल विष्णुपंत लोखंडे, मुख्य सर्तकता अधिकरी, नागपूर. २२. चंदन शंकरराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई शहर. २३. लहु परशुराम कुवारे, पोलीस उपनिरीक्षक, आतंकवाद निरोधी पथक, मुंबई शहर. २४. अब्दुल गफुर गफार खान, पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल गट-१४, औरंगाबाद. २५. शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, मुंबई शहर. २६. युवराज मोतीराम पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विभागीय गुन्हे शाखा, जळगाव. २७. विक्रम निवृत्ती काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर. २८. जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर. २९. दिलीप पुंडलिक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राख्रीव पोलीस बल गट-६, धूळे. ३०. माताप्रसाद रामपाल पांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर. ३१. सुरेश गुणाजी वारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंधुदूर्ग. ३२. विलास दगडू जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा. ३३. चतुर डागा चित्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नंदुरबार. ३४. प्रदीप काशिराम पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, धुळे. ३५. सोमनाथ रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर. ३६. राशीद उस्मान शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सांगली. ३७. दिलीप वासुदेव वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अमरावती शहर. ३८. दिलीपकुमार बब्रुवान सवाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर ग्रामीण. ३९. नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर, पोलीस शिपाई, पोलीस नियंत्रन कक्ष, नाशिक.

महाराष्ट्रातील ७ तुरूंग अधिका-यांना सेवा पदकनवी दिल्ली : देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांना उल्लेखनीय कायार्साठी बुधवारी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ जणांचा यात समावेश आहे. तुरंगसेवेत कैद्याच्या जीवनात चांगला बदल घडुवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक देण्यात येते. पोलीस उपअधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, तुरुंग आणि सुधारात्मक सेवा कार्यालय सुनील निवृत्ती धामल यांना यंदाचे सेवापदक जाहीर झाले. नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार धर्मराज नामदेव नाघाटे, येरवडा कारागृहाचे सुभेदार आनंद शंकर हिरवे, जालना जिल्हा कारागृहाचे हवालदार जगन्नाथ पांडुरंग खपसे, कोल्हापूर जिल्हा कारागृहाचे हवालदार संजय सखाराम घाणेकर, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार गजानन दिगंबर क्षीरसागर आणि औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई सुभाष तोताराम तायडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले.सीमाशुल्क व अबकारी विभागाच्या महाराष्ट्रातील७ अधिका-यांना राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्र-नवी दिल्ली : सीमाशुल्क आणि अबकारी विभागामधील विशेष उल्लेखनीय सेवेसाठी आज राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली. देशभरातील ४४ अधिका-यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ७ अधिका-यांचा समावेश आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीने बुधवारी विशेष उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली.प्रधान आयुक्त कार्यालयांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील अ‍ॅनालेटिक्स अँड रिक्स मॅनेजमेंट संचालनालयाच्या अतिरीक्त महासंचालक सिमा बीस्ट, रेव्हीन्यु इन्टालीजन्स कार्यालयाचे अतिरीक्त संचालक प्रशांत कुमार यांचा समावेश आहे. मुंबई सीमाशुल्क विभाग १ चे अधीक्षक भारत गाडे, रेव्हेन्यु इन्टलीजन्सचे सिनीयर इन्टलिजन्स अधिकारी मुबीन जुवळे, मुंबई सेंट्रल एक्साईज/टॅक्स अँड जीएसटी झोन कार्यालयाचे अधीक्षक अकिफ हुसैन राजा, डायरेक्टर जनरल आॅफ रेव्हेन्यु इन्टलीजन्स विभागीय कार्यालयाचे सिनीयर इन्टलिजन्स अधिकारी एम.आय.रामचंद्रन आणि डायरेक्टर जनरल गुड्स अँड सर्वीस टॅक्स इन्टलीजन्स विभागीय कार्यालय, पुणे चे सिनीयर इन्टलिजन्स अधिकारी रिपु सुधान कुमार यांचा पुरस्कार यादीत समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस