शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पालिकेत आता कचरा वाहतूकीतही घोटाळा

By admin | Updated: July 30, 2016 04:26 IST

मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या रस्ते घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आणखी एक नवीन घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे़ दुचाकी व छोट्या वाहनांवरून कचऱ्याची

मुंबई : मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या रस्ते घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आणखी एक नवीन घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे़ दुचाकी व छोट्या वाहनांवरून कचऱ्याची वाहतूक करून फसवणूक केली जात आहे़ १६ हजार टन कचरा उचलून १८ ते १९ हजार टन कचऱ्याची नोंद होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे़ अखेर या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत़ महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रावरून कचरा उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटाप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे तत्कालीन उपप्रमुख अभियंता शेखर चितळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे़ ठेकेदाराला बनावट कार्यानुभव प्रमाणपत्र त्यांनी दिल्याचा आरोप आहे़ त्यांच्या वेतनातून २५ टक्के रक्कम पुढील तीन वर्षे कापून घेण्यात येणार आहेत़ त्याचवेळी ठेकेदारांना मात्र रान मोकळेच आहे़अभियंत्यांवर कारवाई रस्ते घोटाळा प्रकरणाने पालिकेची झोप उडाली आहे. ३५२ कोटींच्या या घोटाळ््यात रस्ते वा दक्षता खात्याचे अधिकारी गुंतले असल्याचे ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. याप्रकरणात आतापर्यंत ‘थर्ड पार्टी आॅडिट कंपनीचे’ २२, पालिकेचे ४ अभियंते निलंबित आहेत. रस्त्याचे तत्कालीन मुख्य अभियंता अशोक पवार, दक्षता खात्याचे उदय मुरुडकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. असा होतोय पालिकेचा कचरा घोटाळा कचरा वाहून नेण्यासाठी पालिकेने डू इट कंपनीला ५५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले़ मात्र या कंपनीकडे १३३ वाहनांपैकी केवळ ८१ वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे आहे़ उर्वरित १३ वाहनांचे क्रमांक चुकीचे आहेत़ इतर दुचाकी आणि लहान वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवून कचऱ्याची वाहतूक केली जात आहे़ या वाहनांवरून १६ हजार टन कचरा उचलला जात आहे़ मात्र नोंद १८ ते १९ हजार टन कचऱ्याची होत आहे़ठेकेदार मोकाटठेकेदाराला कार्यानुभवाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे चितळे यांच्यावर कारवाई झाली़ त्याचवेळी ठेकेदार मात्र मोकाटच आहे़ फसवणुकीप्रकरणी या ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकले नाहीत, असा प्रश्न नगरसेवकांकडून होत आहे़ मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे़ तोपर्यंत या आरोपांच्या चौकशीचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले आहेत़कचराभूमींची केली तपासणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेने ठेकेदारांकडे सोपवली आहे. मात्र, ठेकेदारांनी सादर केले अशा कचरा भूमीच्या मालकांचे न हरकत प्रमाणपत्र घेता बनवत असल्याचे उघडकीस आले आहे. १५० कोटचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर अशा कचरा भूमींची पाहणी करण्यात आली. मात्र त्याठिकाणी ठेकेदारांनी गाळ टाकला असल्याबाबत साशंकता आहे. कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करणार विभाग स्तरावरील काम खिशात घालण्यासाठी ठेकेदारांनी अभियंत्यांशी संगनमत करुन ‘ई टेंडरिंग’मध्ये फेरफार केले होते. मुंबईत दररोज ९ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. यामध्ये डेब्रिज, बायोवेस्ट, ईवेस्ट अशा कचऱ्याचाही समावेश असतो. मात्र, देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे कचऱ्याचा सर्व भर हा देवनारवर आहे. कांजुरमध्ये लवकरच कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प सुरु होत आहे. या काळात पालिकेने स्थानिक विभागातच कचरा प्रक्रिया केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.