शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

By admin | Updated: February 28, 2016 02:27 IST

तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे.

- सुदीप गुजराथी, नाशिकतमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे. अनेक होतकरू तरुण-तरुणींना निव्वळ जातीच्या दाखल्याअभावी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतावे लागत असल्याने इच्छा असूनही त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तमाशा कलावंतांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांमुळे निदान आपली मुले तरी या व्यवसायात पडू नयेत, असे अनेकांना वाटते. हे कलावंत वर्षातले सहा-आठ महिने फिरतीवर असल्याने दौऱ्यातच त्यांची लग्ने जुळतात आणि त्यांना मुलेही होतात. या कलावंतांत जवळपास सगळेच विवाह आंतरजातीय होतात. अनेकांच्या घरातून लग्नाला विरोध असतो. दोघांचे कुटुंबीय हा विवाह स्वीकारत नसल्याने घरातून कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकदा पुरुष विवाहानंतर महिलांना वाऱ्यावर सोडून देतात. अशा महिला आपल्या मुलांना शाळेत घालताना त्याच्या नावापुढे पतीचे नाव लावतात; मात्र जात स्वत:ची लावतात. या मुला-मुलींना दहावीपर्यंत अडचण जाणवत नाही. महाविद्यालयीन व उच्चस्तरीय शिक्षणात मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य असतो. जातीचा दाखला मिळवण्यासाठी अनुसूचित जाती (एससी) व जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना सन १९४९ पूर्वीचा, भटक्या-विमुक्तांना (एनटी) सन १९६१ पूर्वीचा, तर इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सन १९६७ पूर्वीचा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मतारीख व जातीचा पुरावा आवश्यक असतो. या मुलांच्या पित्याचाच ठावठिकाणा नसल्याने त्यांच्याकडे सध्याची कागदपत्रेही नसतात, तर पन्नास वर्षांपूर्वीची कागदपत्रे कोठून मिळवावीत, असा प्रश्न त्यांना पडतो. अनेकदा शिक्षणाचे शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने तमाशा कलावंतांच्या मुलांवर अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे. राज्यात तमाशाची १० ते १५ मोठी मंडळे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५-२० लहान पार्ट्या आहेत. या सगळ्या कलावंतांच्या मुलांची हीच व्यथा असून, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी किमान ५० वर्षे पूर्वीच्या पुराव्याची अट तरी रद्द करावी, अशी मागणी होत आहे. इच्छा असूनही... सरकार दरबारी हेलपाटे मारल्यावर, जातपडताळणी समितीने गावात येऊन खात्री केल्यानंतर माझ्या मुलांना जातीचा दाखला मिळाला; पण वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशीच तऱ्हा असंख्य कलावंतांच्या मुला-मुलींची आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येतात. सरकारने त्यांच्यासाठी काही अटी शिथिल कराव्यात.- सोनाली महाडिक, नांदूरशिंगोटे