पिंपरी (जि़ पुणो) : मारुंजीतील नवनाथ भानुसे (29) या तरुणाचा स्वाइन फ्लूने शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याची लक्षणो लक्षात घेऊन खासगी रुग्णालयात नवनाथवर उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांनी डेंगीची शक्यता वर्तवली; परंतु प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे 2 ऑगस्टला त्याला चिंचवड येथील दुस:या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी चाचण्या घेतल्यानंतर डॉक्टरांनी स्वाइन फ्लूचे निदान केले. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)