माजलगाव (जि. बीड) : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट संस्थेच्या माजलगाव शाखेतील ठेवीदारांचे १ कोटी ८५ लाख रुपये न दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात चेअरमन प्रमोद रायसोनीसह दिलीप चोरडीया, मोतीफळ गिरी, सुखलाल माळी, सुरजमल जैन, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉ. हितेंद्र महाजन, इंद्रकुमार ललवाणी, यशवंत जिरी, शेख रमजान अब्दुल नबी , दादा रामचंद्र पाटील या सर्व १३ संचालकांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
बीएचआर मल्टीस्टेटच्या १३ संचालकांना कोठडी
By admin | Updated: December 3, 2015 00:57 IST