शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By admin | Updated: July 10, 2017 01:48 IST

पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : तालुक्यात चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम भागातील ओढे-नाले, झरे कोरडे पडले असून भाताच्या लावण्या रखडल्या आहेत. पूर्व भागातील पेरलेले बी उगवण्यासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७५०० हेक्टरवर भातची लागवड केली जाते. त्यासाठी ७०० हेक्टरवर रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण भागात वळवाचे पाऊस झाल्यावरच धूळवाफेवर भाताचे बी पेरले जाते. मात्र, एप्रिल व मे महिन्यात वळवाचे एक दोन पाऊस पडले नाही, त्यामुळे भाताची पेरणी उशिराने झाली. त्यानंतर जून महिन्यात १८ जूनला रिमझिम पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस झालाच नाही. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना डोंगरातील झऱ्यांना पाणीच आले नाही. थाड्या फार प्रमाणात सुरूअसलेल्या पावसावर नीरादेवघर व भाटघर धरण भागातील शेतकऱ्यांनी भाताच्या लावण्या सुरू केल्या होत्या. मात्र, मागील चार दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने खाचरातील पाणी कमी झाल्याने सुरू असलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा रखडल्या आहेत. पूर्व भागात पावसाअभावी उशिराने पेरलेले बी उगविण्यासाठी पावसाची गरज आहे.वेल्हे : तालुक्याच्या पूर्व भागातील अतिपावसाच्या वेळवंडी नदीखोऱ्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून, सतत चालू असणारी संततधार थांबून पावसाने उघडझाप करत बरसण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे भातलागणीवर काहीसा परिणाम होत आहे. तर वेल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भातलागणी खोळंबल्याचे चित्र दिसत आहे.पुणे जिल्ह्यातील ‘प्रतिमहाबळेश्वर’ अशी वेल्हे तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरी ३००० ते ४००० मि.मि. इतक्या विक्रमी पावसाची नोंद होत असल्याने हा परिसर अतिवृष्टी क्षेत्रामधे समाविष्ट होतो. जून ते सप्टेंबर दरम्यान अखंडित पाऊस चालू असतो. यात प्रामुख्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील १८ गावे मावळ भागातील वेळवंडी नदी खोरे, मढेघाट परिसर, मोसे खोरे, पानशेत धरण क्षेत्र या भागात विक्रमी सरासरी ३५०० मि.मि. पाऊस पडतो. वेळवंडी नदीतील सर्व पाणी वाहत जाऊन भाटघर धरणाला मिळते. या धरणातील एकूण पाण्यापैकी ६०% पाणी वेळवंडी नदीतून धरणाला मिळते. तर तालुक्याच्या पूर्व भागातील तोरणा-राजगड किल्ले परिसर, कानंदी नदी खोरे या भागात दरवर्षी सरासरी २५०० मि.मि. पावसाची नोंद होते. आजअखेर वेल्हे तालुक्यात सरासरी ७५० मि.मि. पावसाची नोंद झाली असून, जुलैअखेर २००० मि.मि. पाऊस होणे अपेक्षित आहे. वेल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अद्याप सरासरी पाऊस न झाल्याने भातलागणीची कामे रखडली आहेत. वेल्हे, विंझर, मार्गासनी, दापोडे, अंबवणे या पंचक्रोशीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही काही ठिकाणी लागणी सुरू आहे.पश्चिम भागातील ओढ्याकाठच्या खाचरांना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे. मात्र माळरानावरील खाचरांना पाणीच नसल्याने लागवड करता येत नाही. तर पूर्व भागात पेरलेले बी उगविण्यसाठी पाणी देण्याची धडपड शेतकरी करत आहेत. एकतर पावसामुळे पेरणी उशिरा, लावण्या उशिराने होत असून, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पिकांवर होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या भाताच्या लागवडीसाठी पावसाची अत्यंत गरज असून, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या पाण्यावरच सदरची शेती अवलंबून असल्याने पाऊस पडला तरच शेती पिकणार आहे.