३ जणींचा मृत्यू , संतप्त जमावानी गाडी पेटवली
ऑनलाइन टीम
सोलापूर, दि. ४ - पाणी आणण्यासाठी गेलेल्या ६ मुली बुडाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्हयातील कुडाळ तालुक्यात घडली. या ६ मुलींपैकी ३ मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मुंबईसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. परंतू राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची वणवण सुरूच आहे. कुडाळ तालुक्यात शुक्रवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या सहा मुली बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये तीन मुलींना वाचवण्यात यश आले असले तरी ३ मुलींचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच कुडाळ तालुक्यातील नायब तहसिलदारांनी भेट देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली परंतू संतप्त झालेल्या जमावाने नायब तहसिलदाराची गाडी पेटवून देत आपला संताप व्यक्त केला.