शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

घरगुती ग्राहकांना शॉक

By admin | Updated: December 23, 2014 04:40 IST

कृषीसाठीची ९२ कोटींची सबसिडी कायम ठेवली आहे. दुसरीकडे वीज ग्राहकांना मात्र २० टक्के दरवाढीचा फटका बसणार, हे स्पष्ट झाले आहे. एक महिन्यानंतर काय होणार, या ााबत सरकारने काहीही स्पष्ट केलेले नाही.

यदु जोशी, नागपूरचालू महिन्याच्या सुरुवातीला औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांची मासिक ६१४ कोटी रुपयांची सबसिडी काढून घेत ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणा-या देवेंद्र फडणवीस सरकारने आज औद्योगिक वीज ग्राहकांना ३९७ कोटी रुपयांची सबसिडी देऊन किमान एक महिना तरी वीज दरवाढीपासून वाचविले आहे. कृषीसाठीची ९२ कोटींची सबसिडी कायम ठेवली आहे. दुसरीकडे वीज ग्राहकांना मात्र २० टक्के दरवाढीचा फटका बसणार, हे स्पष्ट झाले आहे. एक महिन्यानंतर काय होणार, या ााबत सरकारने काहीही स्पष्ट केलेले नाही. वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) गेल्या मार्चमध्ये लागू केलेल्या २० टक्के वीज दरवाढीचा फटका औद्योगिक आणि ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बसू नये, म्हणून राज्य शासनाने ७०६कोटी रुपयांची मासिक सबसिडी दिली होती. त्यात ९२ कोटी रुपयांच्या कृषी सबसिडीचा देखील समावेश होता. सरकारने महावितरणकडे मासिक ७०६ कोटी रुपये भरायचे आणि वरील वीज ग्राहकांना दिलासा द्यायचा, असा हा निर्णय घेतला होता. आॅगस्टपासून सबसिडीची रक्कम राज्य शासनाने न भरल्याने महावितरणने त्यासाठी तगादा लावला होता. भाजपाचे नवे सरकार सत्तेत आल्यानंतर ही सबसिडी काढून घेण्याची भाषा सुरू झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ही सबसिडी परवडणारी नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे ६ डिसेंबरला एक आदेश काढून ९२ कोटींची कृषी सबसिडी कायम ठेवत ६१४ कोटी रुपयांची सबसिडी रद्द करण्यात आली होती. तथापि, राज्य मंत्रिमंडळाने आज याबाबत निर्णय घेताना कृषीपंपांना एक महिन्यासाठी ९२ कोटींची तर औद्योगिक वीज ग्राहकांना एक महिन्यासाठी ३९७ कोटी अशी ४८९ कोटींची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला.