शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोल्हापूरचा शाही दसरा..

By admin | Updated: October 3, 2014 00:27 IST

नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतिक म्हणून देशभरातील शक्तीपीठात अंबाबाईला प्रमुख शक्तीपीठ म्हणून मान आहे.

ब्रम्हांड जेव्हा शून्यावस्थेत होते, तेव्हा शक्तीने स्वत:मधून लक्ष्मी, महाकाली आणि सरस्वती या तीन स्त्री देवता आणि ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांची निर्मिती केली ती आदिशक्ती, जगज्जननी म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई. हे शक्तीतत्त्व पृथ्वीवर सर्वात आधी जेथे प्रकटले ते स्थान म्हणजे कोल्हापूर. त्यामुळे पौराणिक ग्रंथांनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र या ठिकाणी पडले. नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतिक म्हणून देशभरातील शक्तीपीठात अंबाबाईला प्रमुख शक्तीपीठ म्हणून मान आहे.  
मूर्तीच्या मस्तकावर नाग, लिंग, योनी ही काल, पुरुष आणि प्रकृती (म्हणजे शिवशक्ती) या तीन तत्त्वांची प्रतिके आहेत. हातात बीजफल आणि औषधी असलेले म्हाळुंग फळ, दुस:या हातात पानपात्र. अन्य दोन हातात गदा, ढाल ही आयुधं आहेत. 
 दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान. त्यामुळे येथे शिव-शक्ती, गणपती, कार्तिकेय असा परिवार आहे. तर विष्णूवर रागावून कोल्हापुरात अंबाबाईच्या आश्रयाला आलेल्या लक्ष्मीचेही येथे अधिष्ठान असल्याने देश-विदेशातील 1क्8, नंतर 51 आणि महाराष्ट्रातील साडेतीन या सर्व शक्तीपीठात अग्रस्थानी असलेले हे क्षेत्र आद्यशक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी तोफेची सलामी झाली की घटस्थापना होवून देवी विराजमान झाली, असे संबोधले जाते. उत्सव काळातील नऊ दिवसांत देवीची देशभरातील विविध स्त्री देवतांच्या, महिषासूरमर्दिनी, अंबारी, झोपाळ्य़ात बसलेली, कामाख्या अशा विविध रूपात पूजा बांधली जाते. देवीची बांधली जाणारी ही पूजा कोल्हापुरातील नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्टय़ मानले जाते. शिवाय उत्सवातील नऊ दिवस रात्री साडेनऊ वाजता विविध आकारात बनवलेल्या पालखीतून देवी मंदिराला प्रदक्षिणा घालते. पालखीच्या पुढे भालदार, चोपदार, रोषणाईक असा शाही लवाजमा असतो. 
  पंचमीला श्री अंबाबाई सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीस जाते. यादिवशी देवीची अंबारीतील पूजा बांधली जाते. यावेळी छत्रपती घराण्याची कुलदैवत तुळजाभवानी आणि गुरू महाराजांच्याही पालख्या असतात. येथे छत्रपतींच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती असलेली पालखी नगरवासीयांना भेटी देत पुन्हा मंदिरात येते. अष्टमीला देवीचा जागर व पहाटेर्पयत होमहवन असे विधी केले जातात. याच दिवशी देवी फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणोला निघते. या अलौकिक सोहळ्य़ाचे दर्शन घेतलेला भाविक कृतकृत्य होऊन जातो. 
कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ्य़ाचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला. त्यावेळी भवानी मातेच्या पादुका हत्तीवरून या सोहळ्य़ाला यायच्या. कोल्हापूर संस्थाच्या छत्रपतींसोबत  भगवी ढाल, भगवी पताका, त्रिपटका, रिसाला, कोटकरी, विटेकरी, बाणदार, गायकवाड, यादव, पंतप्रतिनिदी असे मानकरी, सरदार असा शाही लवाजमा असायचा. करविर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराजांच्या पालख्याही आपल्या लव्याजम्यानिशी येथे दाखल होतात. येथे पोलीस बँड आणि मिलीटरी बँन्डच्या वतीने देवीला मानवंदना दिली जाते. त्यानंतर शाहू महाराज दस:याच्या मुख्य सोहळ्य़ाच्या ठिकाणी येऊन अपराजिता व शमी पूजन करतात, देवीची आरती होते. बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी दिली जाते आणि त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. छत्रपती सर्व मानक:यांना सोने दिल्यानंतर मेबॅक कार मध्ये उभे राहतात आणि सर्व नगरवासियांना सोने देत जुना राजवाडय़ात दाखल होतात. येथे दस:याचा दरबार भरवला जातो. संस्थानच्या सर्व मानक:यांना सोने वाटले जाते. त्यानंतर पंचगंगा नदीतिरावर शिसागर या समाधी स्थळीही सोने दिले जाते.
अंबाबाईची पालखी मात्र नगरवासियांना भेट देत त्यांना दर्शऩ देत मंदिरात येते. सिद्धार्थ नगर, पंचगंगा नदी घाट, शुक्रवार पेठ, गंगावेश, गुजरी मार्गे रात्री पालखी मंदिरात दाखल होते. त्यानंतर पून्हा पालखी सोहळा होतो. अशा रितीने कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा संपन्न होतो.
 
म्हैसूर आणि ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. या तीनही शहरांमध्ये देवीचा दसरा सोहळा आणि राजघराणो यांना एकाच धाग्यात गुंफण्यात आल्याने या सोहळ्य़ाला शाही दसरा असे संबोधले जाते. कोल्हापूरात करविर निवासिनी अंबाबाई, छत्रपती घराण्याची जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, गुरू महाराज यांच्या पालख्या आणि छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा होतो. पूर्वी म्हणजे शके 18क्क् च्या शेवटच्या दशकात हा शाही सदरा सोहळा त्र्यंबोली टेकडीवर व्हायचा. मात्र नंतर ब्रिटिश रेसिडन्सी आणि कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ्य़ाचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला.
 
इंदुमती गणोश