शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

सेनेच्या गटनेतेपदाला ग्रहणच!

By admin | Updated: October 9, 2014 23:00 IST

पक्षीय कुरबूर : १९८५ पासूनचा इतिहास आजही कायम

रत्नागिरी : शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात असलेली युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. कोकणात शिवसेना सर्वाधिक रूजली असली तरी महाराष्ट्रातही आपले स्थान बळावले आहे. परंतु तेथेही पक्षांतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:चे अस्तित्व राखण्यात यशस्वी होत असताना सेनेच्या गटनेते पदाला मात्र ग्रहण लागलेले दिसून येत आहे. १९८५पासूनचा इतिहास पाहता सेना गटनेत्यांवर पक्षाबाहेर जाण्याची वेळ आली आहे.माझगाव (मुंबई) येथून सेनेच्या तिकिटावर १९८५ साली छगन भुजबळ निवडून आले होते. १९८६ साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू यांनी बालेकिल्ला जिंकला. मात्र, १९९0च्या निवडणुकीत रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्यामुळे ते अपक्ष लढले. ८६च्या निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे सहा वर्षांसाठी कोर्टाने सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढून घेतला होता. १९९०च्या निवडणुकीत डझनभर आमदारांसह भुजबळांनी बंडखोरी करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सेनाबळ घटल्याने विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्याने गटनेतेपदी गणेश नाईक यांची निवड करण्यात आली होती. १९९५पर्यंत नाईक गटनेते पदी होते. १९९५मध्ये भाजप-सेनेला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. परिणामी गणेश नाईक यांना पर्यावरणमंत्रीपद मिळाले. परंतु पक्षातील नेत्यांशी त्यांचे मतभेद असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९९९मध्ये नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जानेवारी ते आॅक्टोबर १९९९ अखेर नारायण राणे मुख्यमंत्री होते. मात्र, १९९९ ते २००४ पर्यंत राणे विरोधीपक्ष नेते झाले. परंतु जुलै २00५मध्ये राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने त्यांनी थेट काँग्रेस पक्षात उडी घेतली. त्यानंतर रामदास कदम यांची नियुक्ती विरोधी पक्षनेतेपदावर झाली. २००९ च्या निवडणुकीत खेड मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्वच पुसले गेले. दापोली व गुहागर तालुक्यात विभागणी झाली. कदम गुहागरात निवडणूक लढवित असताना पराभूत झाले. सन २०१० मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. मात्र, पराभवानंतर कदम मात्र फारसे सक्रीय दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते लांबच राहिले. सन २००९ मध्ये सुभाष देसाई गटनेते झाले. भाजपशी वर्षानुवर्षे असलेली संगत तोडून सेना सध्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे. कदम यांना मुंबई किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून उमेदवारी देणे सेनेला शक्य होते. मात्र, त्यांच्याबाबत सेनेने स्वारस्य नसल्याचे दाखवले आहे. शिवाय गतवर्षीच्या दसरा मेळाव्यातील मनोहर जोशींचा अपमानदेखील कार्यकर्त्यांनी पाहिला आहे. सुभाष देसाई यांचाही सेनेने पत्ता कापला आहे. एकूणच सेनेच्या गटनेतेपदालाच वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षातील अंतर्गत धुसपूस किंवा नेत्यांमधील स्वार्थीपणा देखील गटनेतेपदी स्थिर राहिलेला नाही. शिवाय गटनेत्यांचा पक्षाने सन्मान केला असला तरी वेळ पाहून नसही कापली आहे, असे म्हणणे उचित ठरेल. (प्रतिनिधी) १९९०मध्ये रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्याने अपक्ष लढले.१९९०च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी डझनभर आमदारांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश.१९९९मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेनेला केला जय महाराष्ट्र.२००५मध्ये नारायण राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने काँग्रेस पक्षात घेतली उडी.आता वेळ रामदास कदमांची?