शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी सेवाही पदोन्नतीसाठी गृहीत

By admin | Updated: October 8, 2016 05:55 IST

सरकारी सेवेत केलेली हंगामी सेवा नियमित पदोन्नतीसाठी गृहीत धरण्याचा निर्णय वित्त विभागाने शुक्रवारी घेतला.

यदु जोशी,

मुंबई- सरकारी सेवेत केलेली हंगामी सेवा नियमित पदोन्नतीसाठी गृहीत धरण्याचा निर्णय वित्त विभागाने शुक्रवारी घेतला. याचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे.संप काळात, निवडणूक काळात वा अंशकालीन स्वरूपात हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही भरती अर्थातच लोकसेवा आयोग वा तत्कालीन प्रादेशिक निवड मंडळांमार्फत करण्यात आलेली नव्हती. अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे नियमित करण्यात आल्या. ८० ते ९०च्या दशकात अशी मोठी भरती झाली होती. सेवेत नियमित झाल्याच्या दिनांकापासून १२ वर्षांचा काळ गृहीत धरून नियमित पदोन्नती या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दिली जात होती. काही कर्मचाऱ्यांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. ‘आम्हाला तात्पुरत्या सेवेत घेतले तेव्हापासूनचा काळ हा पदोन्नतीसाठी गृहीत धरावा,’ असे त्यांचे म्हणणे होते. तात्पुरत्या सेवेत रुजू झाल्याचा दिनांक गृहीत धरून वेतनवाढ दिली जाते; मग पदोन्नतीसाठी वेगळा न्याय कशासाठी, असा त्यांचा सवाल होता. मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीसाठीही तात्पुरत्या सेवेत रुजू झाल्याचा दिनांक गृहीत धरण्याचा आदेश दिला. त्या अनुषंगाने आज राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे आधी हंगामी स्वरूपात नोकरीत लागून अखंडित सेवा केल्यानंतर नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. त्यांना पदोन्नतीचा लाभ काही वर्षे आधीच मिळणार आहे. >हंगामी नियुक्तीचा दिनांकएखाद्या कर्मचाऱ्याची हंगामी नियुक्ती १९८७मध्ये झालेली होती. त्याला १९९२मध्ये नियमित करण्यात आले. कालपर्यंत त्याला नियमित पदोन्नती देताना १९९२मधील सेवा नियमित झाला तो दिनांक गृहीत धरला जात असेल; आजच्या निर्णयाने मात्र, १९८७मधील हंगामी नियुक्तीचा दिनांक गृहीत धरला जाईल.