शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

से नो टू टोबॅको

By admin | Updated: May 31, 2014 01:04 IST

पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाईल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणार्‍या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू आणि सिगारेटच्या नादाला लागत आहे.

वाढतेय तंबाखूचे व्यसन : ३३ टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सरनागपूर : पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाईल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी  स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणार्‍या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू आणि  सिगारेटच्या नादाला लागत आहे.  या पदार्थांंंंच्या सेवनामुळे सुमारे ३३ टक्के लोकांना तोडांचा कॅन्सर  होत आहे, यात युवा वर्गाचे प्रमाण मोठे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.     बदलत्या काळानुसार आपल्या देशातील संस्कृतीदेखील बदलत चालली आहे. भारत देश  आपल्या संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे घडत असलेल्या घटनांनी आपल्या  देशातील तरु णाई पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असल्याचा प्रत्यय येऊ लागला  आहे. आजचा तरुण महत्त्वाकांक्षी आहे. स्पर्धात्मक युगात, आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी  त्यांची धडपड सुरू आहे. काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची पारख करून निर्णय घेण्याची क्षमता  त्याच्यात आहे. विशेष म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांंंंचे दुष्परिणाम माहीत आहेत, मात्र तरीदेखील  तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. क्षणभर मिळणार्‍या आनंदासाठी युवावर्ग  आपलं आयुष्य खडतर बनवत आहे.    वाढत्या व्यसनाचं प्रमाण, त्यामुळे होणार्‍या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांबाबत जनजागृती  निर्माण करण्यासाठी १९९५ मध्ये ‘जागतिक आरोग्य संस्थे’ने ‘नो टोबॅको डे’ची निर्मिती केली.  तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी हा दिवस पाळला जातो. परंतु आपल्या देशात हा दिवस नावापुरता  उरला असून तंबाखू सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.तंबाखूमधील चार हजार विविध घटकपदार्थ कॅन्सरला कारणीभूततंबाखूमध्ये तब्बल चार हजार विविध घटकपदार्थ आढळतात. त्यातील एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स,  नायट्रोझन्स, टार इत्यादी पदार्थामध्ये कर्कजन्य गुणधर्म असतात. त्याच्या सान्निध्यामुळे सामान्यत:  तोंडाचा भाग कॅन्सरग्रस्त होतो. म्हणूनच तंबाखू खाणारी व्यक्ती तोंडात ज्या ठिकाणी गोळी ठेवते  तेथूनच कर्करोगाला सुरु वात होते.तंबाखूची अखाद्य पदार्थ                म्हणून नोंद व्हावीडॉ. कांबळे म्हणाले, केरळमध्ये शिक्षित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु येथेही तंबाखूजन्य  पदार्थांंंंचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षणामुळे तंबाखूसारखे व्यसन कमी होत नाही  यावरून दिसून येते. भारतात खाद्य पदार्थांंंंमध्ये तंबाखूचीही नोंद आहे. शासनाने याला अखाद्य  पदार्थ म्हणून याची नोंद करावी व जास्तीत जास्त कर आकारावा. यामुळे काही प्रमाणात यावर  अंकुश लागेल. या उत्पन्नातून शासनाला मिळणार्‍या एका वर्षाचा करातून नवीन अद्यावत कर्करोग  रुग्णालय स्थापन करावे. कर्करोगाच्या वेदनेवर ती फुंकर ठरेल.मुलं अनुकरण करतात घरात वडील किंवा आजोबांना व्यसन असेल तर त्याचं अनुकरण मुलं करतात. ७0 वर्षाचा माणूस  सिगारेट ओढतो आणि त्याला काही होत नाही, तर आपल्याला काय होणार? असा गैरसमज तरु  णांमध्ये निर्माण होत आहे. तरु णांमध्ये व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी पालकांनी मुलांसोबत  सविस्तर चर्चा करणं व शाळा-महाविद्यालयांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणारे उपक्र म  राबवणं गरजेचं आहे असे मत सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे यांनी व्यक्त केले.