शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

ग्रामीण भागातूनही शास्त्रज्ञ उदयास येऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 21:03 IST

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रश्नांकडे पाहताना विविध दृष्टिकोन ठेवून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. असे झाले तर ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ

ऑनलाइन लोकमतखोडद, दि. 28 -  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रश्नांकडे पाहताना विविध दृष्टिकोन ठेवून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. असे झाले तर ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ उदयास येऊ शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्र संस्थेचे संचालक प्रा. संदीप त्रिवेदी यांनी व्यक्त केले.जगातील सर्वाधिक मोठ्या व महाकाय असणाऱ्या खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी प्रकल्पात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित १७ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आता विज्ञानाची गोडी व आवड निर्माण होऊ लागली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. निश्चितच यात खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनीही विज्ञानाकडे किचकट, अवघड व रटाळ म्हणून न पाहता अगदी सहजपणे पाहून विज्ञानातील आपली स्वत:ची प्रयोगशीलता वाढवावी.

(  रामप्रहरी ज्योतिषाऐवजी विज्ञान दाखवा - डॉ. जयंत नारळीकर

( विज्ञान संशोधनात स्त्रिया मागे का? )

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. एस. के. घोष, जीएमआरटी प्रकल्पाचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रो. ईश्वर चंद्रा, जीएमआरटी प्रकल्पाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी उपस्थित होते.प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असूनही देखील सुमारे १० हजार विज्ञानप्रेमींनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली.

( कोलंबस वाट का चुकला ?

( विज्ञान दिनामागचं गुपित! )

 

( अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा )

विज्ञान प्रदर्शनात होमी भाभा केंद्र (मुंबई), बलून फॅसिलिटी (हैदराबाद), कांदा व लसूण संशोधन केंद्र (राजगुरुनगर), आघारकर अनुसंधान संस्था (पुणे), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था - नारी (पुणे), विज्ञान वाहिनी (पुणे), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (पुणे), भूशास्त्र विभाग (पुणे विद्यापीठ), भारत मौसम विभाग, कृषी मौसम विभाग प्रभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय (शिवाजीनगर, पुणे), मॉझिल्ला इंडिया, सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनीअर्स इंडिया, ज्योतिर्विद्या परिसंस्था (पुणे), खगोल विश्व (पुणे), एफटर्स डिजिटल तारामंडल (अहमदनगर), फॉस कम्युनिटी इंडिया, विज्ञान आश्रम (पाबळ), नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन (पुणे), सी-स्काय दुर्बीण (मुंबई), रविवार विज्ञान शाळा (पुणे), आकाश मित्र मंडळ (मुंबई) या संस्थांनी विविध प्रयोग सादर केले आहेत.